Home चंद्रपूर दुःखद :- राष्ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांचे दुःखद निधन.

दुःखद :- राष्ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांचे दुःखद निधन.

अनेक रुग्णांचे अगदी स्वस्तात उपचार देऊन प्राण वाचविणरे डॉ.सच्चिदानंद मुनगंटीवार यांनी घेतला अखेरचा निरोप.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे वडील, राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे माजी विभाग संघचालक तथा चंद्रपूरातील प्रसिध्‍द डॉक्‍टर सच्चिदानंद सांबशिव मुनगंटीवार यांचे काल दिनांक ३ जुन २०२२ रोजी सायं. ७.१४ वाजता नागपूर येथील किंग्‍जवे या रूग्‍णालयात प्रदीर्घ आजाराने व आकस्मिक हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.

मृत्‍युसमयी डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार हे ९१ वर्षाचे होते. राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे विभाग संघचालक, लोकमान्‍य टिळक स्‍मारक मंडळाचे अध्‍यक्ष, चिन्‍मय मिशनचे अध्‍यक्ष, डॉ. हेडगेवार जन्‍मशताब्‍दी सेवा समितीचे अध्‍यक्ष अशा नानाविध जबाबदा-या त्‍यांनी समर्थपणे सांभाळल्‍या. १९६७ मध्‍ये त्‍यांनी भारतीय जनसंघातर्फे चंद्रपूर विधानसभेची निवडाणूक देखील लढली होती. विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार हे त्‍यांचे ज्‍येष्‍ठ चिरंजीव तर चंद्रपूरातील प्रसिध्‍द नेत्रतज्ञ डॉ. संदीप मुनगंटीवार हे त्‍यांचे कनिष्‍ठ चिरंजीव होत. त्‍यांच्‍या पश्‍चात दोन मुले, मुलगी सुचिता चकनलवार, स्‍नुषा, जावई, नातवंड असा मोठा आप्‍त परिवार आहे.

त्‍यांचे पार्थीव आज शनिवार दिनांक ४ जून २०२२ रोजी सकाळी १०.३० वा. चंद्रपूर येथे आणण्‍यात येईल. त्‍यांची अंत्‍ययात्रा सायं. ४.३० वा. त्‍यांच्‍या कस्‍तुरबा चौक निवासस्‍थानाहून निघेल. शांतीधाम येथे त्‍यांच्‍यावर अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात येतील अशी त्यांच्या परिवाराच्या सदस्यांकडून प्राप्त झाली आहे.

Previous articleएसीसी सिमेंटच्या “नॉट फॉर सेल सिमेंट बैगा चोरी प्रकरणात कंपनीच्या अधिकाऱ्यांवर प्रथम कारवाई करा.
Next articleविजयानंद :- टेमुर्डा विविध कार्यकारी सहकारी संस्थेवर शेतकरी परिवर्तन पैनेलचा झेंडा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here