सुरज निब्रड व राजू आसुटकर यांच्या नेत्रुत्वात 13 पैकी 12 उमेदवारांचा दणदणीत विजय.
वरोरा प्रतिनिधी :-
मागील अनेक वर्षांपासून टेमुर्डा विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्या संदर्भात तालुका व जिल्हा स्तरांवर तक्रारी करण्यात आल्या व प्रत्यक्ष चौकशा पण झाल्या मात्र यावर अंतिम कारवाया संबंधीत प्रशासनामार्फत झाल्या नसल्याने टेमुर्डा विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या संचालकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते, दरम्यान मे 2022 च्या निवडणुकीत पुन्हा त्याच संचालकांना मतदार निवडून देतील की नव्या उमेदवारांना बहुमत मिळेल यांची उत्स्कुता शिगेला पोहचली असताना दिनांक 18 मे 2022 ला संपन्न झालेल्या निवडणुकीत तब्बल तीन सहकार पैनेल निवडणुकीच्या रिंगणात साम दाम दंड भेद या चार चाणक्य नीतीचा अवलंब करत लढत असताना
सुरज निब्रड व राजू आसुटकर यांच्या नेत्रुत्वात शेतकरी परिवर्तन पैनेल ने 13 पैकी तब्बल 12 उमेदवार निवडून आणून प्रस्थापित दोन्ही पैनेल चा दारुण पराभव केला.
नव्याने निवडून आलेल्या सर्वांचे या परिसरात सर्वत्र अभिनंदन करण्यात येत असून शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत लढू असा विश्वास सुरज निब्रड व राजू आसुटकर यांनी व्यक्त केला. निवडून आलेल्या सभासदामधे राजू आसूटकर राजीव तिखट संजय वराटकर वासूदेव जांभूळे सुरज निब्रड नारायण पावडे अविनाश पायपन दिवाकर दडमल देवराव कुरेकार अंकुश चौधरी शीतल पहापळे अनिता वराटकर इत्यादींचा समावेश आहे.