Home चंद्रपूर आंदोलन :- संजिवनी पर्यावरण सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेश बेले यांचे अन्नत्याग...

आंदोलन :- संजिवनी पर्यावरण सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेश बेले यांचे अन्नत्याग आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरूच.

म्हाडा अंतर्गत नविन चंद्रपूर येथील मलनिस्सारण गटार वाहिनी व एसटीपी २४ एमएलडी कामाच्या निकृष्ट दर्जा बाबत संबधीत म्हाडा अधिकारी व कंत्राटदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी.

चंद्रपूर प्रतिनिधी :

नविन चंद्रपूर परिसरातील रहिवाशांकरीता मलनिस्सारण गटार वाहिनी व एसटीपी २४ एमएलडी व ८ एमएलडी चे काम म्हाडा अंतर्गत ५३ कोटी २९ लाख २२ हजार रुपये खर्चुन करण्यात येत आहे. कोट्यवधी रुपयांच्या कामात निकृष्ठ दर्जाची सामग्री वापरण्यात येत आहे. यामुळे बांधकामात मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहे. निकृष्ट कामावर पांघरुन घालण्यासाठी कंत्राटदाराने भेगा असलेल्या बांधकामाला रंग लावून लिपापोती केल्याची धक्कादायक बाब दिसून येत आहे. सदर निकृष्ट कामाबाबत संजिवनी पर्यावरण सामाजिक संस्थेद्वारे २२ मार्च २०२२ रोजी लेखी तक्रार करण्यात आली. लेखी तक्रारीच्या अनुषंगाने म्हाडाचे कार्यकारी अभियंता व उपकार्यकारी अभियंता यांनी दि. २२/४/२०२२ रोजी मौका पाहणी केली व ९ मे २०२२ ला पाहणी अहवाल सादर केला. सदर पाहणी अहवाल दिशाभुल करणारा असून भ्रष्टाचार करणाऱ्या कंत्राटदार  कंपनी इगल इन्फ्रा इंडिया लि.ची पाठराखण करणारा असल्याचे दिसून येत आहे. यातून कंत्राटदारांची अधिकार्यासोबत साठगाठ असल्याचे स्पष्ट दिसून येते. कंत्राटदार कंपनी इगल इन्फ्रा इंडिया लि.ने तयार केलेले मेनहोलचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केले आहे. यातील २५९४ मेनहोल पैकी १८५० मेनहोलला निकृष्ट कार्यामुळे भेगा पडल्या आहे. तसेच जवळपास ६० ते ७५ किलोमिटर टाकण्यात आलेल्या पाईपलाईनच्या कामात शासनाच्या अटी शर्ती व नियमावलीचे सर्रास उल्लंघन केल्याचे निदर्शनास येत आहे.मलनिस्सारण वाहीनी एसटीपीच्या फिल्टर प्लांटच्या बांधकामात आरसीसी व गिट्टी,रेती,सिमेंटचा वापर योग्य प्रमाणात न केल्याने बांधकामाला मोठ्या प्रमाणात जागोजागी भेगा पडल्या आहे. या भेगा दिसू नये यासाठी कंत्राटदाराने त्यावर रंग मारुन भेगा लपविण्याचा प्रयत्न केला आहे. सदर कामात मोठ्या प्रमाणात भ्रस्टाचार होत असून यात शासकीय अधिकारीही सामील असल्याचे दिसून येत आहे. ईगल इन्फ्रा इंडीया लि. कनत्राटदार कंपनीने देना बँक मधून ४७० कोटी कर्ज फेडण्याचे क्षमता दर्शविणारे प्रमाणपत्र नियमाप्रमाणे नसल्याने त्याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे. याबाबत तक्रार करुनही अद्याप चौकशी केली नाही. शासनाकडून कुठलीही कारवाई न करता भ्रस्टाचाराला मुकसंमती देण्यात येत असल्याने नाईलाजाने अन्नत्याग आंदोलन करण्यात येत असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी व्यक्त केले.

दिनांक ५ जुनपासून चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेकेदाराच्या भ्रस्टाचारामध्ये साठगाठ करणार्या कार्यकारी अभियंत्यांची उच्चस्तरीय चौकशी करुन तात्काळ निलंबनाची कार्यवाही व फौजदारी गुन्हा दाखल करावा,मलनिस्सारण गटार पाईप लाईन एसटीपीच्या कामात निकृष्ट दर्जाची सामुग्री वापरल्याबद्दल ईगल इन्फ्रा इंडीया लि. कंपनी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात याव्या, ईगल इन्फ्रा इंडीया लि. कंत्राटदाराने जोडलेली सालवंशी सर्टिफिकेट व इतर कागदपत्रांची चौकशी करुन फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, संपूर्ण मलनिस्सारण गटार वाहिनी व एसटीपी बांधकामाची त्रयस्त अधिकाऱ्यांकडून उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी आदी मागण्यासाठी ६ जुन पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संजिवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश बेले अन्नत्याग आंदोलन करणार आहे.जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत अन्नत्याग जनआंदोलन सुरू राहील असा इशारा राजेश बेलेयांनी प्रशासनाला दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here