Home चंद्रपूर क्राईम ब्लास्ट :- दीपक बार मालकांची बाजू घेणाऱ्या ठाणेदार कोंडावार यांच्यावर कारवाई...

क्राईम ब्लास्ट :- दीपक बार मालकांची बाजू घेणाऱ्या ठाणेदार कोंडावार यांच्यावर कारवाई करा.

डिजिटल मीडिया असोसिएशनविशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजेयांच्याकडे मागणी, पोलीस अधीक्षक साळवे यांच्याकडे पण तक्रार.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

पोलीस प्रशासन हे जनतेच्या हक्क अधिकाराचे रक्षण करण्यासाठी आहे की स्वतःचे आर्थिक हित साधून “सदरक्षणाय खलनिग्रहणाय” या पोलीस ब्रीद वाक्याला पायदळी तुडविण्यासाठी आहे हेच कळायला मार्ग नसून आता या पोलिसांचे करायचे काय? यांना कोण वठनिवर आणेल? हा प्रश्न समोर असताना विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे हेच आता यावर अंकुश लावतील अशी अशा असल्याने पत्रकार अनुप यादव यांच्यावर जीवघेना हल्ला करणाऱ्या दीपक बार मालकाची बाजू घेणाऱ्या ठाणेदार महेश कोंडावार यांच्या विरोधात डिजिटल मीडिया असोसिएशन ने निवेदन देऊन त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी उठल्यानंतर बिअर बार मालकांची दादागिरी मोठया प्रमाणात वाढली असून त्यांच्या बार मध्ये येणाऱ्या ग्राहकांना सुविधा देताना वेटर कमी पडले किव्हा पैशाच्या बाबतीत असमज तयार झाला तर स्वतः बार मालक दादागिरी वर उतरून ग्राहकांना शिवीगाळ व मारहान करतात अशी नेहमीच ओरड होत असतें अशातच पडोली स्थित दीपक बार चे मालकांनी कित्तेक ग्राहकांना अशीच मारहान केल्याची बाब उघड झाली असून दिनांक 13 जून ला पडोली येथील दीपक बार मालक अगदी बार च्या समोर काही ग्राहकांना मारहान करतानाचा प्रकार ग्लोबल महाराष्ट्र न्यूज पोर्टल चे संपादक अनुप यादव यांनी उघडकीस आणण्यासाठी व्हिडीओ शूट केला मात्र आपली पत्रकार पोल खोलेल या भीतीने दीपक बार मालकाच्या मुलाने अनुप यादव यांच्या डोक्यावर व इतर दहा ते बारा ठिकाणी स्टील च्या रॉड ने वार करून गंभीररित्या जखमी केले व त्यांच्याकडील मोबाईल हिसाकावून घेतला,

ग्लोबल महाराष्ट्र न्यूज पोर्टल चे संपादक अनुप यादव यांच्यावर झालेल्या या प्राणघातक हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला व पायावर गंभीर जखमा असल्याने सात ते आठ टाके लागले व पायाची हड्डी क्रॅक झाली पण दोन दिवस उलटून सुद्धा ठाणेदार कोंडावार यांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला नव्हता तर उलट पत्रकार कसे दोषी आहे व त्यांच्या विरोधात दीपक बार चे मालक कशी तक्रार देऊ शकतात याचा त्यांनी पत्रकारासमोरच पाढा वाचला दरम्यान पत्रकारांनी आक्रमक पवित्रा घेऊन तुम्हचे असे म्हणणे तुम्हाला सोभते का असा सवाल केल्याने ते नरमले व सावरासावर केली. आता ठाणेदार योग्य तो न्याय देणार नाही म्ह्णून डिजिटल मीडिया असोसिएशन चे पत्रकारांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले व कोंडावार यांची तक्रार केली असता तत्कालीन प्रभारी पोलीस अधीक्षक यांनी ठाणेदार कोंडावार यांची चांगलीच खरडपट्टी काढली तेंव्हा कुठे ठाणेदार यांनी जखमी अनुप यादव यांच्या घरी जाऊन त्यांची तक्रार घेतली परंतु अगोदरच दीपक बार मालकांची बाजू घेऊन असणाऱ्या ठाणेदार कोंडावार यांनी दीपक बार मालकावर केवळ भांदवी 394 कलमाअंतर्गत गुन्हा नोंद करून वेळ मारून नेली.

अनुप यादव यांच्यावर जीवघेना हल्ला करणाऱ्या दीपक बार मालकांना ठाणेदार कोंडावार संरक्षण करीत असल्याने पुन्हा परत डिजिटल मीडिया असोसिएशन च्या पत्रकारांनी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे व जिल्हा पोलीस अधीक्षक साळवे यांच्याकडे कोंडावार यांच्यावर कारवाई करून आरोपी दीपक बार मालकावर कलम 307 394 सह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. आता ठाणेदार कोंडावार यांची या प्रकरणात काय कोंडी होते व पत्रकार अनुप यादव यांना काय न्याय मिळतो? हे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ छेरिंग दोरजे यांच्यावर अवलंबून असून त्यांच्या निर्णयाकडे सर्व पत्रकारांचे लक्ष लागलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here