Home गडचिरोली खळबळजनक :- कुरखेडा वनपरिक्षेत्रातील कामात पुन्हा भ्रष्टाचार?

खळबळजनक :- कुरखेडा वनपरिक्षेत्रातील कामात पुन्हा भ्रष्टाचार?

एका वनपरीक्षेत्राधिकारी यांच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होऊन त्यांच्यावर निलंबणाची झाली होती कारवाई.

कुरखेडा प्रतिनिधी :

कुरखेडा वनपरिक्षेत्रातील एका वनपरीक्षेत्राधिकारी यांच्या कार्यकाळात झालेल्या भ्रष्टाचाराच्या बातम्या भूमिपुत्राची हाक न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांच्यावर विभागीय चौकशी लावली होती व त्या चौकशीत त्यांच्या भ्रष्टाचाराची पोल खुलली होती आणि त्यांचे त्यात निलंबन झाले होते. आता त्याच भ्रष्टाचाराची री ओढत वनपरीक्षेत्र अधिकारी मनीषा (दांडे) कुंभलकर यांनी जाभुळखेडा वनपरीक्षेत्रात रोपवनांची थातूरमातूर कामे करून लाखोंचा भ्रष्टाचार केला असल्याची खळबळजनक माहिती समोर आल्याने आता विद्यमान वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यावर कारवाई होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महत्वाची बाब म्हणजे याच वनपरिक्षेत्रातील तात्कालीन वनपरीक्षेत्राधिकारी यांच्या भ्रष्टाचाराचा पाढा भूमिपुत्राची हाक न्यूज पोर्टल वर लावून धरल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली होती व शासनाला लाखो रुपये त्यांना भरून द्यावे लागले होते. त्याचा धडा घेऊन आता तरी येथील अधिकारी सुधारतील अशी अपेक्षा असताना विद्यमान वनपरिक्षेत्रातील अधिकारी पुन्हा माल सुतो अभियानात सक्रीय झाले असल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.

कुरखेडा वनपरिक्षेत्राअंतर्गत येणारे जांभुळखेडा परीक्षेत्रातील कक्ष क्रमांक १६१ मधील भाग १ मध्ये २५ हजार हेक्टर मध्ये ५ हजार रोपे लावण्याचे काम विभागामार्फत देण्यात आले आहे.५ हजार रोपे लावण्यासाठी १८ लाख रुपये विभागामार्फत देण्यात आले आहे. मात्र वनपरीक्षेत्राधिकारी यांनी ठेका पध्दतीने २० रूपये खड्डा याप्रमाणे देऊन फक्त वरवर काम करून घेण्यात आले आहे.नियमानुसार झाडे लावण्यासाठी खोल खड्डा तयार करावा लागतो मात्र पैसे कामावण्याच्या नादात हे सर्व केले जात असल्याची माहिती आहे.चैनींग फिक्सिंग (कुंपन तार) गेट,पोल गाळण्यासाठी कंत्राट देण्यात आले. पण कंत्राटदारांनी वरवर खड्डे खोदून पोल आणि गेट लावण्यासाठी काॅक्रींट टाकून निकृष्ट दर्जाचे काम केल्या जात आहे, त्यामुळे या सर्व कामात मोठा भ्रष्टाचार होत असल्याने या कामाची विभागीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here