Home गडचिरोली धक्कादायक :- कुरखेडा वनपरीक्षेत्राधिकारी यांनी वरिष्टांची परवानगी न घेता विकली झाडे.

धक्कादायक :- कुरखेडा वनपरीक्षेत्राधिकारी यांनी वरिष्टांची परवानगी न घेता विकली झाडे.

वनपरीक्षेत्राधिकारी मनिषा (धांडे) कुंभलकर यांचा प्रताप, चौकशीची मागणी.

कुरखेडा प्रतिनिधी :-

कुरखेडा वनपरीक्षेत्रात भ्रष्टाचाराची जणू वाळवी लागली की काय? असाच जणू प्रश्न निर्माण होत असून वृक्ष लागावाडीच्या कामात भ्रष्टाचार होत असल्याचे समोर आल्यानंतर आता झाडे कटाई बेकायदेशीर होत असल्याने वनपरीक्षेत्र अधिकारी मनीषा कुंभलकर यांच्या संपूर्ण कामकाजाची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे,

वनपरीक्षेत्राधिकारी मनिषा (धांडे) कुंभलकर यांनी वरिष्ठ कार्यालयाची परवानगी न घेता शेतकऱ्यांच्या शेतातील वृक्ष तळेगाव येथील सुरेश फर्निचर मार्ट ला परस्पर विक्री केल्याचे आता समोर आले आहे. नियमानुसार शेतकऱ्यांच्या शेतातील वृक्ष तोडण्यासाठी विभागीय वनाधिकारी यांच्याकडे रितसर परवानगी घ्यावी लागते मात्र वनपरीक्षेत्राधिकारी यांनी कुठलीही परवानगी न घेता ती झाडे परस्पर तोडण्यात आली आहे.दिलीप गोपीचंद सहारे यांच्या शेतातील आंजण या प्रजातीचे झाडे तोडण्यात आली.२ झाडे कापण्यात आल्याचे दाखविण्यात आले परंतु १० झाडे कापून परस्पर विक्री करण्यात आली आहे.त्यामुळे वनपरीक्षेत्राधिकारी मनिषा (धांडे) कुंभलकर यांनी आतापर्यंत कितीतरी झाडांची विक्री केली असेल याची स्पष्टता दिसून येत असल्याने त्याच्या कामकाजाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

Previous articleखळबळजनक :- कुरखेडा वनपरिक्षेत्रातील कामात पुन्हा भ्रष्टाचार?
Next articleप्रेरणादायी :- मनोरुग्णांना अंघोळ, कपडे घालून मंत्री बच्चू कडून यांचा अनोखा वाढदिवस.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here