Home वरोरा प्रेरणादायी :- मनोरुग्णांना अंघोळ, कपडे घालून मंत्री बच्चू कडून यांचा अनोखा वाढदिवस.

प्रेरणादायी :- मनोरुग्णांना अंघोळ, कपडे घालून मंत्री बच्चू कडून यांचा अनोखा वाढदिवस.

प्रहार च्या किशोर डुकरे यांचा प्रेरणादायी उपक्रम. वैद्यकीय उपचार सुद्धा प्रहार तर्फे देण्यात आल्याने मनोरुग्णांच्या चेहऱ्यावर फुलाला आनंद.

वरोरा प्रतिनिधी :-

तालुक्यात प्रहार जनशक्ती पक्षात किशोर डुकरे यांचे मंत्री बच्चू कडू यांच्या स्टाईलने अनेक आंदोलने शेतकरी, शेतमजूर व बेरोजगार युवकांसाठी होत असतात पण यावेळी मंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवसाला किशोर डुकरे यांनी अनोखा उपक्रम राबवून सर्वांचे लक्ष वेधले आहे. मनोरुग्णांना सगळीकडे नजरेने बघितल्या जाते त्यांच्याकडे जाणीवपूर्ण दुर्लक्ष केल्या जाते त्यामुळे त्यांचा आदर सत्कार सार्वजनिकरित्या होत नाही त्यामुळे त्यांचे जीवन म्हणजे जणू नरकात मरण यातना भोगाव्या असेच असतें मात्र रुग्णासेवेचा वसा जोपसणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षातील प्रहार सेवक किशोर डुकरे यांनी अशा मनोरुग्णांना आधार देण्याचा जो उपक्रम राबवला त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला हेच काय ते जनसेवेचे व्रत.

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा विद्यमान राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या 5 जुलैला झालेल्या वाढदिवसाच्या निमित्ताने वरोरा तालुक्यातील काही मनोरुग्ण यांचे इलाज करून त्यांना नागपूर येथे पुढील उपचाराकरिता रेफर करण्यात आले तत्पूर्वी अहिल्या बाई होळकर वृद्धाश्रम येथे मनोरुग्णांना अंघोळ व नवीन कपडे घालून जेवण देण्यात आले. मनोरुग्णांसोबतच त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा या उपक्रमात सहभागी करून घेतल्या गेले. सोबतच उपजिल्हा रुग्णालयात भरती रुग्णांना फळे वाटप करण्यात आली.

या अनोख्या उपक्रमाचे नेतृत्व प्रहार तालुका अध्यक्ष किशोर डुकरे यांच्याकडे होते तर यामध्ये प्रहार सेवक, संदीप झाडे, संदीप वासेकर, स्वप्नील वावरे, आकाश येडेकर, राहुल देठे, ओंकार कांबळे, देवा वाटकर, अक्षय बोण्दगुलवार आदी प्रहार सेवकांनी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here