Home चंद्रपूर लक्षवेधी :- सत्तेसाठी कोलांटऊडी मारणाऱ्या आमदार किशोर जोरगेवार यांची उपलब्धी काय?

लक्षवेधी :- सत्तेसाठी कोलांटऊडी मारणाऱ्या आमदार किशोर जोरगेवार यांची उपलब्धी काय?

नेहमीच बंडाचा झेंडा आणि सत्तेसाठी लाचारी चंद्रपूरकरांना फायद्याची की तोट्याची?

लक्षवेधी :-

एका सर्वासामान्य गरीब कुटुंबातील कार्यकर्ता आमदार बनतो म्हणजे त्या कार्यकर्त्यांनी अपार कष्ट आणि मेहनत करून ती उपलब्धी मिळवली असेल अशी सर्वांची समज असतें आणि चंद्रपूर विधनासभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांच्याबद्दल सुद्धा अशीच सर्वाना आजवर होती परंतु आमदार झाल्यानंतर जोरगेवार यांनी निवडणूकीच्या प्रचार सभामध्ये व आपल्या जाहीरनाम्यामध्ये दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करणे अपेक्षित असताना त्यांनी चंद्रपूरकरांसोबत दगाफटका केला व 200 युनिट वीज बिल माफिच्या प्रश्नाला बगल देऊन फालतूच्या विषयात आपले अडीच वर्ष वाया घालवले हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही.

जिकडे सत्ता तिकडे जोरगेवार हा फॉर्मुला?

सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत किशोर जोरगेवार यांनी शेवटच्या क्षणापर्यंत कांग्रेस च्या उमेदवारीची अपेक्षा असताना उमेदवारी मिळाली नसल्याने बंडाखोरी केली आणि अपक्ष निवडणूक लढवली दरम्यान भाजपचे पार्सल असलेले नाना शामकुळे यांना जनतेने हरवण्याचा चंग अगोदरच बांधला असल्याने किशोर जोरगेवार यांना ऐन वेळेवर भाजप असंतुष्ट व कांग्रेस असंतुष्ट यांची मते मिळाली आणि ते विक्रमी मतांनी निवडून आले. किशोर जोरगेवार हे अपक्ष असल्याने त्यांनी सत्ताधारी भाजप गटासोबत अगोदर हातामिळणी केली व त्यांनी आमदार झाल्याझाल्या भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना सहर्ष समर्थनाचे पत्र देऊन भाजप गटात आपली नोंद केली खरी पण भाजप शिवसेना युती ऐनवेळी तुटल्याने सत्ताभोगी किशोर जोरगेवार यांनी महाविकास आघाडी च्या समर्थनार्थ शिवसेना गटात एंट्री केली.आता पुन्हा शिवसेनेत बंडाळी झाल्यानंतर कुठलीही ऑफर नसताना सवयीप्रमाणे गुहाहाटी मध्ये जाऊन एकनाथ शिंदे यांच्या कंपुत कोलांटउडी घेतली खरं तर सत्ताधारी पक्षात जाऊन आपल्या क्षेत्राचा विकास करावा हे सूत्र खरे जरी असले तरी किशोर जोरगेवार यांनी आजवर घेतलेल्या दोन कोलांटउड्यामुळे चंद्रपूरकरांना काय फायदा झाला? काय त्यांच्या या उड्या मारण्याने चंद्रपूरकरांना 200 नाही तर किमान 100 तरी युनिट वीज बिल माफ करण्यात आले? याचे उत्तर जोरागेवर यांच्याकडे नाही. मग सत्तेसाठी लाचारी कशासाठी? असा प्रश्न चंद्रपूरकरांना पडला आहे.

जोरगेवार यांचे आमदार कळातील प्रश्न काय?

कुठलाही लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक असतो व जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठीच त्यांना निवडून दिल्या जाते पण किशोर जोरगेवार यांनी जनतेला 200 युनिट वीज बिल माफिच्या संदर्भात आश्वासन दिले व सहानुभूती निर्माण करून निवडणूक जिंकली पण ते आश्वासन हवेत गायब झाल्याने त्यांनी चंद्रपूरच्या जनतेसोबत एक प्रकारे दगफटका केला आहे व त्यांनी तो मुद्दा बाजूला ठेऊन दारूबंदीच्या काळात चंद्रपूर मध्ये दारू येते कशी? आरटीओ मधील भ्रष्टाचार आणि रेती संदर्भातील प्रश्न उपास्थित करून स्वतःचे चांगभले करण्याचा सपाटा लावला होता. त्यामुळे मूळ प्रश्नांना बगल देऊन नको त्या प्रश्नांना प्राधान्य देणारे आमदार किशोर जोरगेवार जनतेच्या कसोटीवर पूर्णपणे नापास झाले ही वस्तुस्थिती आहे.

किशोर जोरगेवार फक्त जनतेला शुभेच्छा देण्यासाठीच आमदार झाले काय?

कुठलाही सन असो जयंती असो वा कुणी यश मिळवले असो त्याबद्दल आमदार किशोर जोरगेवार यांचे शुभेच्छा बैनर झळकणारच पण जिथे जनतेवर आपत्ती आली, कोरोना काळातील वीज बिल माफिच्या संदर्भात जनता आस्वतं होती की किशोर जोरगेवार हे 200 युनिट वीज बिल माफी देऊ शकले नाही तर किमान कोरोना च्या काळातील वीज बिल तरी माफ करायला शासनाला भाग पाडतील पण आमदार किशोर जोरगेवार हे केवळ शुभेच्छा बैनर वर झळकत होते आणि इकडे वीज ग्राहकांची वीज तोडल्या गेली त्यामुळे ते आक्रोश करीत होते पण जोरगेवार यांना काहीही फरक पडला नाही हे विशेष मग प्रश्न असा पडतो की यांना केवळ जनतेला शुभेच्छा देण्यासाठीच आमदार बनविल्या गेले का?

Previous articleकौतुकास्पद :- अ‍ॅड. जयंत साळवे यांच्या “मित्रा” पत्रसंग्रहाचे सर्वत्र कौतुक”
Next articleराजकीय :- महाराष्ट्रात १७ जिल्ह्यातील ९२ नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here