Home महाराष्ट्र राजकीय :- महाराष्ट्रात १७ जिल्ह्यातील ९२ नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर.

राजकीय :- महाराष्ट्रात १७ जिल्ह्यातील ९२ नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर.

राजकीय नेते व कार्यकर्त्यांच्या निवडणूक जिंकण्याच्या तयारीला सुरुवात. शिवसेना उमेदवा्रांमध्ये संभ्रम.

मुंबई न्यूज नेटवर्क :-

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आता महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला असून १७ जिल्ह्यातील ९२ नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असल्यानं राज्यातील जनतेचं निवडणुका कधी जाहीर होणार याकडे लक्ष लागलं होतं. अखेर निवडणूक आयोगानं ९२ नगरपालिकांची निवडणूक जाहीर केली आहे. आता १८ ऑगस्ट रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल आणि त्यानंतर १९ ऑगस्ट रोजी निकाल जाहीर करण्यात येईल. १७ जिल्ह्यातील कमी पाऊस पडणाऱ्या नगरपालिका क्षेत्रांमध्ये निवडणूक पार पडणार आहे.

या निवडणुकीचा कार्यक्रम स्थानिक जिल्हाधिकारी कार्यक्रम जाहीर करणार आहे त्यात २० जुलै उमेदवारी अर्ज उपलब्ध होईल तर २२ ते २८ जुलै अर्ज स्वीकारण्याचा कालावधी असेल व अर्जाची छाननी २९ जुलैला होणार आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत ही ४ ऑगस्ट दुपारी ३ पर्यंतअसेल तर उमदेवारी अर्जावरील आक्षेप ८ ऑगस्ट ला असेल मतदान १८ ऑगस्टला तर मतमोजणी आणि निकाल १९ ऑगस्टला असेल.

कुठे कुठे असेल निवडणूक?

अ वर्ग नगरपालिका.

पुणे : बारामती
सोलापूर : बार्शी
जालना : जालना
बीड : बीड
उस्मानाबाद : उस्मानाबाद
जळगाव : भुसावळ.

ब वर्ग नगरपालिका.

नाशिक : मनमाड, सिन्नर, येवला
धुळे :दोंडाईचा बरवाडे, शिरपूर वरवाडे
नंदूरबार : शहादा
जळगाव : अमळनेर, चाळीसगाव
अहमदनगर : संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर
पुणे : चाकण, दौंड
सातारा : कराड, फलटण
सागंली : इस्लामपूर, विटा
सोलापूर : अक्कलकोट, पंढरपूर, अकलूज
कोल्हापूर : जयसिंगपूर
औरंगाबाद : कन्नड पैठण
बीड : अंबेजोगाई, माजलगाव, परळी-वैजनाथ
लातूर : अहमदपूर
अमरावती : अंजनगाव सूर्जी

क वर्ग नगरपालिका.

नाशिक : चांदवड, नांदगाव, सटाणा, भगूर
जळगाव : वरणगांव, धरणगाव, एंरणडोल, फैजपूर, पारोळा, यावस, अहमदनगर : जामखेड, शेवगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, राहता, राहुरी, पुणे : राजगुरुनगर, आळंदी, इंदापूर,जेजुरी, सासवड, शिरुर
सातारा : म्हसवड, रहितमपूर, वाई
सांगली : आष्टा, तासगाव, पलूस,
सोलापूर : मोहोळ, दुधनी, करमाळा, कुर्डूवाडी, मंदगी, मंगळवेढा, सांगोला. कोल्हापूर : गडहिंग्लज, कागल, कुरुंदवाड, मुरगूड, वडगाव
औरंगाबाद : गंगापूर, खुल्ताबाद,
जालना: अंबड, भोकरदन, परतूर
बीड : गेवराई, किल्ले धारुर, उस्मानाबाद : भूम, कळंब, मुरुम, नळदूर्ग, उमरगा, परंडा, तुळजापूर
लातूर : औसा, निलंगा,
अमरावती : दर्यापूर
बुलडाणा : देऊळगाव राजा.

नगरपंचायत निवडणूक:-

अहमदनगर : नेवासा
पुणे : मंचर, माळेगाव बुद्रुक
सोलापूर : अनगर.

शिवसेना उमेदवा्रांमध्ये संभ्रम.

महाराष्ट्रात सगळीकडे राजकारण नगरपरिषदा निवडणूकीच्या अनुषंगाने तापले असताना शिवसेनेत झालेल्या बंडाखोरीमुळे व शिंदे आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाच्या दाव्यामुळे शिवसेना उमेदवारांमध्ये सभ्रम राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here