“अमर उजाला” सर्व्हेच्या अनुषंगाने बाळासाहेबांचे खरे राजकीय वारसदार राजसाहेब करू शकतात महाराष्ट्रात करिष्मा?
लक्षवेधी :-
आंध्र प्रदेशात येडुगुरी संदिंती जगनमोहन रेड्डी उर्फ जगन यांनी भारतीय राजकारणात प्रादेशिक अस्मिता जोपासूनआंध्र प्रदेशात सन 2019 मध्ये जी एकहाती सत्ता निर्माण केली त्यामागची पाश्वभूमी लक्षात घेता महाराष्ट्रात मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे हे सुद्धा येत्या सन 2024 च्या विधानसभा निवडणुकीत करिष्मा करू शकतात हे राष्ट्रीय दैनिक “अमर उजाला” या वर्तमान पत्राच्या सर्व्हेतून स्पष्ट दिसत आहे. कारण खरी शिवसेना नेमकी कुणाची? हा प्रश्न महाराष्ट्रात चर्चेचा असताना शिवसेनेचे नेतृत्व राजसाहेब ठाकरे यांनी आता करावे का? हा प्रश्न अमर उजाला या दैनिकांनी आपल्या वाचकांना विचारला होता त्यात राजसाहेब ठाकरे यांना तब्बल 78 टक्के वाचकांनी “होय” असे उत्तर दिल्याने येणाऱ्या काळात शिवसेनेचा अस्त व मनसेचा उदय होऊन राजसाहेब ठाकरे हे येणाऱ्या सन 2024 च्या बिधानसभा निवडणुकीत करिष्मा करू शकतात अशी राजकीय परिस्थिती आहे.
आंध्र प्रदेशात येडुगुरी संदिंती जगनमोहन रेड्डी उर्फ जगन यांनी भारतीय राजकारणात एक करिष्मा केला. ते आंध्र प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी ह्यांचे पुत्र. त्यांनी २०११ साली काँग्रेसमधून वाय.एस.आर. काँग्रेस पक्षाची स्थापना करून ते पक्षाध्यक्ष बनले. सन 2014 च्या विधनासभा निवडणुकीत त्यांनी कांग्रेस ला मात देऊन आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांना टक्कर दिली व प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका निभावली. येणाऱ्या सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीचा वेध घेऊन त्यांनी अनेक आंदोलणे व रथ यात्रा काढून अख्खा आंध्र प्रदेश पिंजून काढला त्यामुळे त्यांच्या वादळी झंजावाताने २०१९ च्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणूकीमध्ये वाय.एस. जगनमोहन रेड्डी ह्यांच्या नेतृत्वाखाली वाय.एस.आर. काँग्रेस पक्षाने १७५ पैकी तब्बल १५१ जागांवर विजय मिळवून आंध्र प्रदेशमध्ये सत्ता स्थापन केली.
महाराष्ट्रात राजसाहेब ठाकरे हेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे खरे राजकीय वारसदार?
महाराष्ट्रात शिवसेनेला भगदाड पडून एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदार सोबत घेऊन बंडाळी केली व विद्यमान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचले. खरं तर जे आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले त्यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कडवट हिंदुत्वाचा त्याग उद्धव ठाकरे यांनी केल्याने बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवणायासाठी आपण भाजप सोबत गेलो असल्याचे खुलासे दिले. यावरून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व बेगडी आहे ते खऱ्या अर्थाने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने चालत नाही तर ज्या स्वर्गीय बाळासाहेबांनी सांगितले होते की आपण कधीही कांग्रेस सोबत युती किंव्हा आघाडी करणार नाही प्रसंगी निवडणूक लढणार नाही पण सत्तेच्या मोहापायी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना पायदळी तुडवल्याने आपण बाळासाहेबांचे कडवट हिंदुत्व घेऊन सत्ता स्थापन केल्याचे एकनाथ शिंदे गटाने प्रसारामध्यमाना प्रतिक्रिया दिल्या अर्थात आता उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे खरे राजकीय वारसादर नाहीत कारण त्यांच्यात कडवट हिंदुत्वाचा विचार नाही त्यामुळे आता मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे हेच स्वर्गीय बाळासाहेबांचे खरे वारसदार असल्याच्या प्रतिक्रिया समाजामध्यमातून उमटत असताना राष्ट्रीय दैनिक अमर उजाला यांनी जो सर्व्हे केला त्यात बाळासाहेबांची शिवसेना ही खऱ्या अर्थाने राजसाहेब ठाकरे हेच चालविण्यात समर्थ आहेत अशी तब्बल 78 टक्के वाचकांनी प्रतिक्रिया दिल्याने महाराष्ट्रात मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा आंध्र प्रदेश चे मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांच्या झंजावाताप्रमाणे सत्ता स्थापन करण्याचा झंजावात निर्माण होऊ शकतो अशी राजकीय संभावना दिसत आहेत.