नाफेड च्या वरिष्ठ अधिकऱ्यांकडून शेतकऱ्याची गळचेपी.
वरोरा प्रतिनिधी :-
शासकीय यंत्रणा असलेल्या नाफेड या संस्थेद्वारे चणा खरेदी मागील दीड ते दोन महिन्यापूर्वी केली होती पण या चणा खरेदी ची रक्कम अजूनही शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने शेतकरी ऐन शेती च्या पेरणीच्या काळात आर्थिक अडचणीत सापडला आहे. दरम्यान प्रहार जनशक्ती पक्षाचे वरोरा तालुका अध्यक्ष किशोर डुकरे यांनी या संदर्भात पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना नाफेड च्या चणा खरेदी ची रक्कम मिळावी म्हणून नाफेड च्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधला तर पुन्हा आठ दिवस पैसे मिळण्यासाठी लागतील अशी माहिती मिळाली.
प्रहार चे तालुका अध्यक्ष किशोर डुकरे यांची स्वतःची चणा खरेदी ची रक्कम नाफेड कडे असल्याने त्यांनी संबंधित अधिकारी कैलास बनसोड यांना फोन वरून विचारपूस केली असता त्यांनी वरिष्ठ अधिकारी Dmo यांना विचाराण्याची माहिती दिली व मग चंद्रपूर च्या कार्यालयात संपर्क केला असता आणखी आठ दिवस लागते असे बोलले याचा अर्थ नाफेड च्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या शेती हंगामाची पर्वा आहे की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे.