Home मुंबई कट्टा :- भाजप सोबत युती होऊ नये म्हणून शिवसेनेने खेळलेल्या त्या खेळीचा...

कट्टा :- भाजप सोबत युती होऊ नये म्हणून शिवसेनेने खेळलेल्या त्या खेळीचा अजूनही संताप.

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीचा सांगितला किस्सा.

राजकीय कट्टा :-

शिवसेनेत मोठी बंडाळी होऊन आमदार खासदार यांसह इतर शिवसैनिक शिवसेनेला जय महाराष्ट्र करत आहे तर दुसरीकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख आजही बंडखोरांना परत येण्याची हाक देत आहे, अशातच भाजप नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन तब्बल दीड तास चर्चा केली त्यामुळे महाराष्ट्रात भाजप मनसे युतीची चर्चा होत असून याकडे सगळ्यांच्या नजारा लागल्या आहे दरम्यान स्वर्गिय बाळासाहेबांनी हिन्दुत्वाच्या अतुट शिवबंधन धाग्याने बांधलेला शिवसैनिक आज सैरावैरा होऊन शिवसेना पक्षप्रमुखाना आव्हानं देत आहे त्यामुळे सहाजिकच अनेकांना शिवसेनेची झालेली ही केविलवाणी अवस्था बघून वाईट वाटत आहे. पण ह्याच शिवसेनेच्या गद्दारिचा इतिहास अजूनही काही जन विसरले नाही त्यातच सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत भाजप ने युती तोडली होती तेंव्हा मनसेला भाजप ने सोबत घेऊ नये म्हणून खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांना युतीचा प्रस्ताव देऊन निवडणुक फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत ताटकळत ठेऊन दगा दिला एवढेच नव्हे तर ठाणे महानगरापालिकेत शिवसेनेला मदत करणाऱ्या मनसेच्या मुंबई महानगरापालिकेतील सहा नगरासेवकांना फोडून गद्दारी केली याबद्दल मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.

मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले, मला आजही ती तारीख आठवते. 23 सप्टेंबर 2014ला उद्धव ठाकरे यांचा मनसे प्रमुख राज ठाकरे यांना फोन आला. ते म्हणाले, आपल्या दोघांना भेटायला पाहिजे. एकत्र बोलायला पाहिजे. त्यानुसार राज ठाकरे यांनी मला बोलावून घेतले. मला घडलेले संभाषण सांगितले. मला राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंकडे जायला सांगितले. त्यानुसार मी शिरीष सावंत यांना बोलावले. आणि काही मंडळींसह राजगडवर आम्ही एकत्रित बसून जागा वाटपा विषयी मसुदा तयार केला. मी रात्रभर जागा होतो.

ते पुढे म्हणाले की 24 सप्टेंबर 2014 ला सकाळी बाजीराव दांगट, देशमुख साहेब व राज ठाकरे यांच्यात पुन्हा चर्चा झाली. मी त्या रुमच्या बाहेर बसलो होतो. ते दोघे शिवसेनेकडून निरोप घेऊन आले होते. मी म्हंटलो राज साहेब तुम्ही तुमच्या मोठ्या भावाशी बोलून घ्या. त्यानुसार राजसाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरेंशी बोलले. त्यानुसार चर्चा झाली. उद्धव ठाकरे म्हणाले माझ्याकडून अनिल देसाई बोलतील. राजसाहेब ठाकरे म्हणाले आमच्याकडून बाळा नांदगावकर बोलतील. दोघांनीही सहमती दर्शविली. 26 सप्टेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता.मी अनिल देसाईंना फोन केला. त्यानुसार त्यांनी उद्धव ठाकरेंशी बोलून सांगतो असे सांगितले. 25 सप्टेंबरला मी देसाईंना फोन केला तर ते म्हणाले बोलतो आणि सांगतो. 25 तारखेला राज ठाकरेंनी मला बोलावून घेतले. आमचे उमेदवारांना देण्यासाठी एबी फॉर्म तयार होते. सर्व एबी फॉर्मवर माझ्या सह्या होत्या. महाराष्ट्रभरातील उमेदवार फॉर्मची वाट पाहत होते. राजसाहेब ठाकरे म्हणाले काय झाले. मी म्हणालो देसाई म्हणालेत भेटतो बोलतो पण अजून काहीच नाही, असे सांगितले. त्यानुसार राजसाहेब ठाकरेंनी एबी फॉर्म वाटप करण्यास मला सांगितले. मात्र मी तसे केले नाही. देसाईंच्या निरोपाची वाट पाहिली. एबी फॉर्म थांबविले.

त्यावेळी मी निवडणूक लढवायची अथवा नाही हे स्पष्ट नव्हते. मात्र राजसाहेब ठाकरेंनी मला निवडणूक लढवायला सांगितले. माझ्या एकट्याच्या एबी फॉर्मवर राजसाहेब ठाकरेंची सही होती. आम्ही 26 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत फॉर्म भरले. आम्हाला या बाबीचे वाईट वाटले. याचा अर्थ आम्ही भाजप बरोबर जाऊ नये यासाठी खेळलेले ते राजकारण होते. एवढे न कळायला आम्ही काय दूधखुळे होतो. त्यांनी गोड बोलून गळा कापण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही नांदगावकर यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here