Home वरोरा धक्कादायक :- नुकत्याचझालेल्या  महापुरानंतर पुन्हा महापुराचा धोका? वरोरा-भद्रावती तालुक्यात पुन्हा अलर्ट ?

धक्कादायक :- नुकत्याचझालेल्या  महापुरानंतर पुन्हा महापुराचा धोका? वरोरा-भद्रावती तालुक्यात पुन्हा अलर्ट ?

राज्य शासन यांच्या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक सहकार्यां बाबत जिल्हा प्रशासनाकडे लागल्या पूरपीडितांच्या नजरा.

वरोरा प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या संततधार पावसाने तीन दिवसा आधी अप्पर वर्धा, लोअर वर्धा धरणाचे 31 दरवाजे उघडल्याने धरणाचे पाणी वर्धा नदीत अचानक पणे सोडल्याने पाण्याची पातळी वाढून वरोरा भद्रावती तालुक्यातील वर्धा नदी काठावरील पाटाळा,माजरी सह करंजी, मार्डा ऐकोना चरुरखटी, पांझुर्णी, निलजई आमडी बोरी कोहपरा सोइट बामर्डा अशी अनेक गावे पुराच्या पाण्याने वेढली होती. पुराचे पाणी अनेक घरांमध्ये घुसल्याने नागरिकांना तालुका प्रशासन एन. डी. आर. एफ. आणि भारतीय लष्कराच्या कामठी येथील गार्डस रेजिमेंटच्या 25 लष्करी जवानांनी बोटिंग द्वारे पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले होते. आता पूर ओसरल्याने नागरिक घरी परतू लागले आहे. परंतु अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने सामान खराब झाले झाली आहे. तर कित्येक घरांची पडझड झाली असल्याने या संकटात कसे उभे राहायचे, अशी चिंता पूरग्रस्तांना सताऊ लागली आहे. अशातच आता पुन्हा पावसाने जोर धरला असल्याने पुन्हा महापूर येईल अशी शक्यता आहे त्यामुळे राज्य शासनाने जाहीर केलेल्या मदतीकडे पूरपिडीत मोठ्या आशेने बघत आहे.

मागील चार ते पाच दिवसांपूर्वी वर्धा नदीने रौद्ररूप धारण करताच वरोरा भद्रावती या तालुक्यातील कित्तेक गावांना पुराने वेढले होते. पुरात अडकून पडलेल्या नागरिकांना जवानाच्या माध्यमातून सुरक्षित स्थळी हलविले. दरम्यान दोन दिवस सुरक्षित स्थळी काढल्यानंतर पूर ओसरला आणि स्थिती पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे आश्रित असलेल्या ठिकाणावरून नागरिकांनी आपापल्या घराचा रस्ता पकडला आहे. परंतु पावसाचा जोर काही कमी होण्याचे नाव घेत नसून पुन्हा अशीच पूरपरिस्थिती होईल कां ? याबद्दल आशंका निर्माण झाल्या असल्याने जिल्हा व तालुका प्रशासन यासाठी काय उपाययोजना करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कधी होईल पूरग्रस्त भागाचा सर्व्हे ?

नुकत्याच झालेल्या पुरामुळे वर्धा नदीवरील यवतमाळ -चंद्रपूर जिल्हा जोडणाऱ्या पुलावर मोठे मोठे खड्डे पडल्याने हा मार्ग बंद करण्यात आला आहे. तसेच तेरा गावातील अठरा जनावरे या पुरामुळे दगावले असल्याची माहिती आहे, पुरामुळे अनेक गावातील कित्तेक घरात पाणी घुसल्याने त्यांना इतरत्र राहण्याची व खाण्याची व्यवस्था केली होती, परंतु त्यांचे घरातील धान्य व उपयोगी साहित्य टीव्ही संच यासह इतर वस्तू या पुरामुळे पूर्णपुणे खराब झाल्याने अनेक नागरिकांचे लाखोंच्या घरात नुकसान झाले.यात अनेक घरांची पडझड झाली आहे व आता सुद्धा ती चालू असून सध्या नेमका आकडा समजू शकला नाही पण सध्या गुरुवारी पुराचे पाणी पूर्णपणे उतरल्याने नागरिक आपापल्या घरी परतू लागले असताना आता शुक्रवार पासून परत पावसाने जोर पकडला आहे त्यामुळे पुन्हा पूर आला तर प्रशासनाकडे काय उपाययोजना आहे व या सर्व झालेल्या नुकसानीचा सर्व्हे प्रशासन केव्हा करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

Previous articleराजकीय :- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे आता नव्याने आरक्षण निघणार.
Next articleधक्कादायक :- नुकत्याच ओसरलेल्या महापुरानंतर पुन्हा महापुराचा धोका.वरोरा-भद्रावती तालुक्यात पुन्हा अलर्ट?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here