Home भद्रावती खळबळजनक :- मुलाच्या प्रेमप्रकरणाचा वचपा काढण्यासाठी बापाची हत्त्या.

खळबळजनक :- मुलाच्या प्रेमप्रकरणाचा वचपा काढण्यासाठी बापाची हत्त्या.

हत्या करून मृतदेह नाल्यात फेकले.पोलीसांनी ठोकल्या आरोपीला बेड्या.

माजरी प्रतिनिधी दि.२३.७.२२

माजरी- दोन दिवंसापूर्वी माजरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरोरा-वणी महामार्गावरील कुचना-पाटाळा दरम्यान कोराडी नाल्यावरील पुलाखाली एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. त्यानीही ही हत्याच असल्याची माहिती दिली होती.

या व्यक्तीची ओळख पटविण्याचे आव्हान पोलीसांसमोर होते. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करून उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे पथकाचे गठन करून तपासाला सुरुवात केली होती. अखेर या हत्येचे गूढ उकलण्यात पोलीसांना यश आले असून, या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पोलीसांकडून अनोळखी मृतकाचे ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु असतानाच सिकंदर रामभाऊ पाटील रा. माजरी याने पोलीसांनी प्रसिद्ध केलेल्या शोधपत्रिकेनुसार मृतकाचे प्रेत पाहुन ओळखले व सदर व्यक्ती त्याचे वडिल रामभाऊ ज्ञानेश्वर पाटील (५०) रा. आंबेडकर वार्ड माजरी कॉलरी हेच असल्याचे स्पष्ट सांगितले. त्यानंतर सदर गुन्ह्याच्या पुढील तपासादरम्यान मृतकाचा मुलगा सिकंदर यास पोलीसांनी विचारपुस केली असता त्याने सांगितले की, माजरी कॉलरी येथील रहिवाशी पिंटू पेटकर याचे पत्नीसोबत माझे प्रेमसंबंध असल्याचा संशयातून पिंटू पेटकर हा नेहमी आमचे सोबत वादविवाद करत होता. मला व माझ्या कुटुंबाला मारण्याची धमकी देत होता असे सिकंदरने सांगितले. यावरून आशीष उर्फ पिंटू पेटकर (३२) रा. आंबेडकर वार्ड याला पोलीसांनी ताब्यात घेतले. त्यास सदर गुन्ह्यासंबंधाने पोलिसी खाक्या दाखवून विचारले असता त्याने मृतकाचा मोठा मुलगा सिकंदर रामभाऊ पाटील याने माझ्या पत्नीसोबत प्रेमसंबंध प्रस्तापीत करून पळवून नेले व तो भद्रावती येथे राहत आहे. त्यामुळे तो मला मिळत नव्हता.त्यामुळे त्याचा राग मनात धरुन मी सिकंदरच्या वडिलाला दोन साथीदाराच्या मदतीने महावीर स्कूलमध्ये पुरपीड़ित कैम्पमधून चारचाकी गाडी मध्ये जबरदस्तीने बसवून कोराडी नाल्याचे पुलीयाजवळ नेऊन हत्याराने डोक्यावर मारले व पुलाखाली टाकून दिले. आरोपी पिंटू पेटकर याने अशी कबुली दिली.

याप्रकारणी आरोपी आशीष उर्फ पिंटू पेटकर यांच्या विरुद्ध माजरी ठाण्यात कलम ३०२ भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला न्यायालयात हजर करण्याकरिता भद्रावती येथे नेण्यात आला. मात्र न्यायालय काही दिवंसासाठी बंद असल्याने आरोपीला वरोरा येथील न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणी दरम्यान आरोपीला पाच दिवंसाचा पीसीआर देण्यात आला. दरम्यान आरोपीला वापस माजरी पोलीस ठाण्यात घेवून येत असताना शिरना व कोंढा नाल्यावरील पुल पाण्याखाली आल्याने आरोपीला भद्रावतीच्या पोलीस ठाण्यात हलविण्यात आला.

पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष नोपानी सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा, बाळासाहेब खाडे , स्थानिक पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा चंद्रपुर , पो नि पाटील वाहतुक शाखा चंद्रपुर , सपोनि विनीत घागे , ठाणेदार पो.स्टे माजरी , सपोनी अजितसिंग देवरे , पोस्टे माजरी , सपोनी बोबड़े स्था . गुशा . चंद्रपुर , सपोनि भोयर , सपोनी कापडे व स्थानीक गुन्हे शाखा चंद्रपुर स्टाफ , सपोनी मडावी पो.स्टे वरोरा , पोउपनि कोल्हे पोस्टे भद्रावती , सायबर सेल चंद्रपुरचे पोलीस अंमलदार , पोली स्टेशन माजरी येथील पोहवा हरीदास वोपने , पोहवा गजानन जुगडे , पोहवा बंडु मोहुर्ले , पोहवा सुधाकर घाटे , नापे अतुल गुरनुले नापोअं अनिल बैठा , पोअं गुरु शिंदे , पोअ आकाश चेन्नुरवार , पोअ हरीचंद्र , पोों रविंद्र गिते , मप् अक्षिता , पोस्टे बल्लारशा पोअं शरद कुळे , पोअं संतोष दंडेवार , उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे मन आमने , मधुकर आत्राम यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणला असुन मा . आयुष नोपानी ( भा.पो.से. ) सहाय्यक पो अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरां हे पुढील तपास करीत आहे

Previous articleधक्कादायक :- नुकत्याच ओसरलेल्या महापुरानंतर पुन्हा महापुराचा धोका.वरोरा-भद्रावती तालुक्यात पुन्हा अलर्ट?
Next articleसावली नगरपंचायच्या मुख्याधिकारी यांचा मनमानी कारभार ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here