Home चंद्रपूर न्यायालयीन व प्रशासनिक लढाई हरल्यानंतर सुद्धा बेकायदेशीर गायत्री टायरचे दुकान तुटणार कधी...

न्यायालयीन व प्रशासनिक लढाई हरल्यानंतर सुद्धा बेकायदेशीर गायत्री टायरचे दुकान तुटणार कधी ?

जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या चुकीच्या भूमिकेने रायपुरे परिवाराचा येण्याजाण्याचा रस्ता बंद

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर शहरातील नागपूर रोड वर असलेले रामचंद्र मसादे यांचे गायत्री टायर नावाचे दुकान रायपूरे या दलित कुटुंबाच्या येण्याजाण्याच्या रस्त्यावर बेकायदेशीर बांधण्यात आल्याने मागील अनेक वर्षांपासून रायपूरे परिवाराला एका छोट्याशा गल्लीतून ये-जा करावी लागते, त्यांच्या दोन चाकी गाड्या पण घरापर्यंत जातं नसल्याने त्यांची पूर्णता कोंडी झाली आहे, या संदर्भात तहसीलदार उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी व निवेदने देण्यात आली शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले पण प्रशासनाने या संदर्भात तात्काळ कारवाई न करता उलट रामचंद्र मसादे यांना त्या जागेचा कायमस्वरूपी पट्टा देण्याचा निर्णय केल्याने हे प्रकरण उच्च न्यायालय व विभागीय आयुक्त यांच्यापर्यंत पोहचले तिथे तत्कालीन तहसीलदार सलामे यांनी सदर बेकायदेशीर केलेले बांधकाम तोडण्याचा जो आदेश देण्यात आला तोच कायम ठेवण्यात आला असल्याने आता हे बेकायदेशीर बांधकाम तब्बल पाच वर्षांच्या न्यायालयीन व प्रशासनिक लढाई तरी पडणार कां ?असा प्रश्न उपस्थित होत आहे.

रामचंद्र मसादे यांचे गायत्री टायर चे दुकान बेकायदेशीर आहे व ते तोडण्याचा आदेश तत्कालीन नायब तहसीलदार सलामे यांनी दिल्यानंतर रामचंद्र मसादे यांनी या आदेशाच्या विरोधात उपविभगिय. अधिकारी जिल्हाधिकारी. दिवाणी न्यायालय जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालय अशी अपील केली परंतु सर्वच ठिकाणी रामचंद्र मसादे यांना हार पत्करावी लागली व आता सुरुवातीचा बेकायदेशीर बांधकाम तोडण्याचा आदेश कायम ठेवण्यात आल्याने तहसीलदार यांनी हे बांधकाम त्वरीत तोडून आम्हच्या ये-जा (रहदारीचा) मार्ग मोकळा करावा अशी मागणी रायपुरे परिवाराकडून करण्यात येत आहे. त्यामुळे रामचंद्र मसादे यांचे बेकायदेशीर बांधकाम तुटणार की वाचणार ?याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here