Home वरोरा मनसेची आगामी नगरापरिषद व जिल्हापरिषद निवडणूक तयारीकरिता वरोरा येथे उद्या बैठक.

मनसेची आगामी नगरापरिषद व जिल्हापरिषद निवडणूक तयारीकरिता वरोरा येथे उद्या बैठक.

मनसे जिल्हा अध्यक्ष दिलीप रामेडवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत मनसे नेते रमेश राजूरकर यांची उपास्थिती राहणार.

वरोरा प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकाऱ्यांचे येणाऱ्या स्थानिक नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समित्या निवडणुकीत उमेदवार उभे करून ते निवडून आणण्यासाठी प्रयत्न सुरु असून संघटनात्मक दृष्टीने मजबूत असलेल्या वरोरा तालुक्यात मनसेची जोरदार तयारी सुरु आहे, दिनांक 31 जुलै रोज रविवारला दुपारी ठीक 12.30 वाजता मनसे जेष्ठ नेते रमेश राजूरकर यांच्या स्नेहनगर अभ्यंकर वार्ड येथील कार्यालयात मनसे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

ही बैठक मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार यांच्या अध्यक्षतेखाली व मनसे नेते रमेश राजूरकर. मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार. जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे. जिल्हा सचिव विनोद सोनटक्के. महिला सेना जिल्हाध्यक्षा सुनीता गायकवाड. जनहित विधी कक्ष विभाग जिल्हाध्यक्षा कु. अँड मंजू लेडांगे. जिल्हाध्यक्ष सुनील गुडे. जिल्हा सचिव उमाशंकर तिवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून या बैठकीला वरोरा तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील सर्व मनसे पदाधिकारी तथा महाराष्ट्र सैनिक व शाखा कार्यकारणी पदाधिकारी व सदस्य यांनी उपास्थित राहावे असे आवाहन मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे जिल्हा सचिव विनोद सोनटक्के तालुका अध्यक्ष वैभव डहाने यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here