अत्यंत दुर्दैवी, व्हायरल विडियो बघून काळीज थरथरले असल्याची प्रत्यक्षदर्शीच्या प्रतिक्रिया.
वरोरा प्रतिनिधी :–
तालुक्यातील वायगाव भोयर येथील शेत शिवारात आज दिनांक 30 जुलै ला दुपारी 3.30 च्या दरम्यान अचानक वीज पडून हिरावती शालीक झाडे. मधमती सूरेश झाडे. पारबता रमेश झाडे व रीना नामदेव गजभे यांचा जागीच म्रुत्यु झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
अचानक झालेल्या या घटनेचे काही प्रत्यक्षदर्शी शेतकरी काही अंतरावर असल्याने सगळीकडे ही माहिती पसरली. मनाला सुन्न करणारी ही घटना असून एकाच परिवारातील तीन महिला सदस्य या घटनेत म्रुत्युमुखी पडल्याने सर्वत्र शोकाकुल वातावरण पसरले आहे. या घटनेची प्रशासनाने त्वरीत दखल घेऊन पिडीत कुटुंबाना सहकार्य करावे अशा भावना या परिसरातील नागरिक व्यक्त करत आहे.