Home क्राईम स्टोरी या तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार.संभाव्य धोके टाळण्यासाठी उशीर.

या तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार.संभाव्य धोके टाळण्यासाठी उशीर.

मंत्री होण्याची आस लावून असलेले बंडखोर आमदार नाराज. तर यामुळे शिंदे सरकार कोसळण्याचीही शक्यता.

राजकीय कट्टा :-

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना बंड करायला लावून उद्धव ठाकरे सरकार पाडलं. त्यामुळे शिवसेनेतून बंडखोरी केलेले आमदार आणि भाजप एकत्र येत राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण गेल्या 27 दिवसांपासून मंत्रिमंडळाचा विस्तार अजुनही झालेला नाही. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांची नाराजी शिंदे सरकारच्या धोरणावर असून जर लवकर मंत्रिमंडळ विस्तार येत्या 9 ऑगस्ट पूर्वी झाले नाही तर हे सरकार कोसळू शकते अशीही शक्यात निर्माण झाली आहे.

मंत्रिमंडळाचा मुहूर्त लांबल्याने शिंदे गटात अंतर्गत नाराजी पसरल्याची माहिती मिळत आहे. ईच्छुक आमदारांच्या मतदारसंघात नाराजी पसरली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यांचा शपथविधी झाल्यानंतर लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अस सांगण्यात आले होते, पण अजुनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. मतदारसंघात नाराजी पसरल्याची माहिती एकनाथ शिंदे यांना आमदार देत आहेत.

सरकार स्थापन होऊन 27 दिवस होऊन गेला तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे राज्यात चर्चा सुरू आहेत. विस्तार लवकरच होईल असं बोलले जात होते, पण अजुनही झालेला नाही, त्यामुळे शिंदे गटातील आमदार रोज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन खंत व्यक्त करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

भाजपच्या हायकमांडकडून मंत्रिमंडळ विस्ताराला अजुनही हिरवा सिग्नल मिळालेला नाही. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार लांबला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिंदे गटात अंतर्गत नाराजी पसरली आहे. त्यामुळे आता शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

6 ते 8ऑगस्टच्या दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चिन्हे.

मंत्रिमंडळ विस्ताराला दिल्लीतून हिरवा कंदील मिळाला असून 60:40 च्या फॉर्म्युल्यानुसार खातेवाटप निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभुमीवर पावसाळी अधिवेशन पुढील आठवड्यात घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पावसाळी विधानसभेचे अधिवेशन 9 ऑगस्टपासून मुंबईत होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. यापूर्वी पावसाळी अधिवेशन 25 जुलै रोजी होणार होते, मात्र सत्ताबदल आणि मंत्रिमंडळ विस्तारामुळे अधिवेशन लांबले. पण पावसाळी अधिवेशन पूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करणे आवश्यक असल्याने हा विस्तार 6 ते 8ऑगस्ट ला होण्याची शक्यता वर्तवली जातं आहे.

दरम्यान, गेल्या काही आठवड्यात एकनाथ शिंदे यांनी पाच वेळा दिल्लीला भेट दिली, मात्र त्यानंतरही मंत्रिमंडळ विस्ताराचे गणित बसताना दिसत नाही. याला अनेक कारणे जबाबदार आहेत. यातील एक कारण सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीशी संबंधित आहे. न्यायालयातील याचिकेमुळे कायदेशीर गुंतागुंत निर्माण होऊन सरकारला धोका निर्माण होऊ शकतो, असे मानले जात आहे. त्याचवेळी आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्नही अद्याप सुटलेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here