Home चंद्रपूर खळबळजनक – चंद्रपूर जिल्ह्यात नकली सुगंधीत तंबाखू व पानमसाल्याची सर्हास विक्री ?

खळबळजनक – चंद्रपूर जिल्ह्यात नकली सुगंधीत तंबाखू व पानमसाल्याची सर्हास विक्री ?

अन्न औषध प्रशासन व पोलिसांचा अर्थपूर्ण आशीर्वाद. कर्करोगाच्या प्रमाणात मोठी वाढ. यासाठी कोण जबाबदार ?

लक्षवेधी भाग -1

चंद्रपूर जिल्ह्यात अनेक अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात राजरोसपणे सुरू असून नकली सुगंधीत तंबाखू व पानमसाला सुद्धा सर्हासपने विकल्या जातं आहे. याबाबत अन्न औषध प्रशासन साखर झोपेत जणू मौन धारण करून आहे तर पोलीस प्रशासन आपल्या माल सूतो अभियानात मदमस्त आहेत. तंबाखू हा कर्करोगाला निमंत्रण देणारा पदार्थ असून आज जिकडे तिकडे कर्करोगाचे प्रमाण दिवसेगणिक वाढत असल्याची माहिती आहे तर मग जिल्ह्यात मोठ्या  प्रमाणात नकली सुगंधीत तंबाखू ची विक्री करून जिल्ह्य़ातील जनतेला कर्करोगाच्या खाईत टाकण्याही मोहीम तर सुरू नाही ना ? असा प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान भाजप या राजकीय पक्षातर्फे कर्करोग मुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प घेऊन चंद्रपूर शहारात जी बैनेरबाजी झाली होती ते बघून भाजप च्या पदाधिकाऱ्यांना जिल्ह्य़ातील नकली सुगंधीत तंबाखूची अवैध विक्री कळली नसावी कां ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सर्वच कर्करोगाला तंबाखू सेवन हेच कारण नसले तरी जवळपास 60 टक्के कर्करोग हे तंबाखू किंव्हा तंबाखूजन्य असलेल्या रासायनिक पदार्थांच्या सेवनामुळे होतात, त्यामुळे महाराष्ट्रात तंबाखू विक्रीवर पूर्णता बंदी आहे. तर मग या ज्वलंत प्रश्नावर येथील अन्न औषध प्रशासन काय झोपा काढत आहे कां ? याबद्दल आश्चर्य व्यक्त केल्या जातं आहे.

कोण करताहेत नकली सुगंधीत तंबाखूची अवैध विक्री ?

चंद्रपूर जिल्ह्यात दररोज लाखों रुपयांचा सुगंधीत तंबाखू हा खर्यांत वापराला जातं आहे, तो सुगंधीत तंबाखू नेमका कुठून येतो? तो कोण आणतोय? यांची चौकशी केली असता वसीम झिंगरी चंद्रपूर, जयसुख ठक्कर बल्लारपूर व गणेश (ध्रुव) गुप्ता चंद्रपूर रयतवारी हे तीन महारथी मागील अनेक वर्षांपासून अवैध सुगंधित तंबाखूच्या धंद्यात असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या तिन्ही लोकांनी सुगंधीत तंबाखू ची विक्री कोण कुठे करणार व कुणाला किती पैसे द्यायचे याबद्दल अगोदरच ठरवून घेतले आहे. यामध्ये अन्न औषधी विभाग व पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मैनेज केल्याने त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात आपलं अवैध नकली सुगंधित तंबाखूच जाळं उभं केलं आहे.

प्रत्तेक नकली सुगंधीत तंबाखूच्या पेटीमागे 5 हजार कुणाकुणाचे ?

जिल्ह्यात वसीम झिंगरी जयसुख ठक्कर व गुप्ता यांच्या माध्यमातून जो नकली तंबाखू चा धंदा सुरू आहे त्यात अन्न औषधी प्रशासन, पोलीस प्रशासन, राजकीय नेते व पत्रकारांना मैनेज करण्यासाठी प्रत्तेक नकलि सुगंधीत तंबाखू च्या पेटीमागे 5 हजार रुपये राखून ठेवले असल्याने दररोज लाखों रुपयांचा हवाला होत असल्याची चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here