दुबार पेरणीनंतर सुद्धा अतिवृष्टीने पीक खरडलं, कर्जबाजारी शेतकऱ्यांची शेती पडित राहण्याची चिंता.
प्रतिनिधि खाबाडा:-
(मनोहर खिरटकर)
यावर्षी जेमतेम पेरण्या आटोपल्या आणि पीक अंकुरताच होणार्या अतिवृष्टीमुळे होत्याचे नव्हते झाले.मध्यंतरी काही दिवस थोडा पाऊस होता त्यामुळे शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली पण पुन्हा अतिवृष्टी झाली आणि शेतात तळे निर्माण झाले तर नदी नाल्यांच्या काठावर असलेल्या शेतजमिनी पुराच्या पाण्यात बुडाल्या. खरं तर गत दशकानंतर अशी परिस्थिती शेतीव्यवस्थेवर ओढवल्याने शेतकरी हतबल आणि हवालदिल झाला आहे. दुबार पेरणीनंतर सततच्या अतिवृष्टीमुळे शेती पुराने खरडली, हजारो हेक्टर शेतजमिनी पाऊसाने बाधित झाल्यामुळे आता शेतीत काहीच उरले नाही. त्यामुळे खरीपाचा हंगाम हातून गेला, आता कोणत्या पिकांची पेरणी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असून कृषीतज्ञांनो आता शेतीत पेरायचे काय ? असा सवाल शेतकरी करीत आहे.
सतत आठवडाभर नदीला आलेल्या पुराने व आठवडाभर पुराचे पाणी शेतात साचुन राहिल्याने जागीच सडून गेले त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात आता पीक उभे नाही शिवाय खरीप हंगाम निघून गेल्याने शेती पडीक ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.दरम्यान आता कोणते बियाणे पेरावे हय़ा विवंचनेत शेतकरी शासनाच्या मदतीची अपेक्षा ठेवत आहे. अशातच खांबाडा येथील शेतकरी शंकर देठे यांनी शासनाकडून तात्काळ मदत मिळावी अशी मागणी केली आहे
नाल्याकडेची १० हजार हेक्टर जात आहे. मधील पेरलेली पीक जमीनदोस्त झाला हा महसूल विभागाचा प्राथमिक अंदाज अंदाज असून सर्व्हेक्षणाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. काही ठिकाणी दुबार पेरणी करून पिक पुराच्या वेढयाने आणि पुराचे पाणी साचल्याने जळाली. शेतजमीन ओसाड पडल्याने कोणती बियाणे पेरावी यासाठी शेतकरी तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. परिणामी बियाणे वेळेवर उपलब्द न झाल्यास शेतजमिनी पडीक ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. कृषी विभागाने ऑगस्ट महिन्यात पेरली जाणारे आणि कमी कालावधीत येणारे बियाणे पुरवावे अशी मागणी शेतकरी वर्गातून केली.
मान्सूनचा उशिरा आल्याने २० ते ३० जून दरम्यान तालुक्यातील शेतकन्यांनी पेरण्या केल्या. जेमतेम पीक जमिनीवर येताच दोन ते २८ जुलैपर्यंत पावसाने दमदार हजेरी लावली. या काळात वारंवार अतिवृष्टी झाली. नदी नाले तुडुंब वाहल्याने शेतजमिनी जलमय झाल्या. पिके पिवळी पडली. काही भागात पाऊस गेला मात्र पाणी शेतात आहे. परिणामी यावर्षी उत्पादनात कमालीची घट होणार असून उत्पादन खर्च निघेल का नाही यात शंका आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकन्यांची आहे.
“ पोथरा नदीच्या प्रवाहाने शेतातील पीक जमीदोस्त झाली. चार पाच एकरातील पीक कायम पुराने जळाले. महसूल विभागाने पाहणी केली. मदत तातडीने करायला हवी. यातून पुढील हंगामातील नियोजन करणे सोयीचे होईल. – मयुर दसुडे गौल शेतकरी
मी चार एकरातील सोयाबिन पेरणी केली पण पाऊसामुले बियाणे अंकुरलेच नाही आणि पिकाची दुबार पेरणी झाली. दरम्यान तेहि गेले आणि आता माझी चार एकर जमीन पडिक राहिली आता कोणते पीक पेरावे समजेनासे झाले. विनाकारण शेत पडीक राहील. कृषी तज्ञांनी सल्ला द्यावा. अशी मागणी खांबाडा येथील
शालिक धोटे या शेतकऱ्याने केली आहे.
१० हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान.
वरोरा तालुक्यात अतिवृष्टीमुळे जवळपास १० हजार हेक्टर मधील पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तालुक्यातील सर्व मंडळात नुकसानीचे पंचनामे करणे सुरू आहे. दोन तीन दिवसात अंतिम नुकसानीचा अहवाल मिळेल. तातडीने वरिष्ठांकडे पाठविला जाईल-वरीष्ठ अधिकारी महसुल विभाग वरोरा
मी। एक विधवा महिला शेतकरी उसनवारी करून तथा बँकेकडून कर्ज काढुन बिबियाणे खरेदि केले चांगले अंकुरले बुद्धा पण अति पाऊसामुले शेताचे बांध फुटले आणि संपुर्ण पिक खरडून गेले मादे पंच्याहत्तर टक्के नुकसान झाले पण कृषि विभागाला मान्य नाहि तर समोरील येणारे दिवस मी कशी काय निभवणार यावर उत्तर शासन देईल का? असा सवाल फत्तापूर येथील महिला शेतकरी
ईदुं बुर्हाण यांनी केला आहे.