Home लक्षवेधी ब्रेकिंग :- मंत्रिमंडळ विस्तारानंतर एकनाथ शिंदे शिलेदारांमधे बंड होणार ?

ब्रेकिंग :- मंत्रिमंडळ विस्तारानंतर एकनाथ शिंदे शिलेदारांमधे बंड होणार ?

ज्याला फोन आला तो खुश बाकी फोन च्या प्रतीक्षेत. नाराजीचा सूर व बंडाचा धूर कुठून निघणार ?

लक्षवेधक :-

महाराष्ट्रातील बहुप्रतिक्षेत असणारा शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या होणार असून ज्या बंडखोर आमदारांना शिंदे फडणवीस यांचा फोन आला तो खुश आहे तर काही बंडखोर हे फोन च्या प्रतिक्षेत आहे, दरम्यान मंत्रिमंडळ विस्तारामधे ज्यांची नावे आली नाही त्यांचा नाराजीचा सूर निघणार आहे तर त्यामुळे बंडाचा धूर सुद्धा निघू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.

आज नवीन मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला संधी मिळेल याबद्दल सर्वच न्यूज चैनेल मधे बातम्या सुरू आहे त्यात भाजप कडून कोण मंत्रिमंडळात शपथ घेइल तर शिंदे गटातील कोण शपथ घेणार याचा अंदाज जरी वर्तवला जातं असला तरी वेळेवर कुणाचा पत्ता कट होईल ? याचा नेम नाही, कारण भाजप मधे ज्या आमदारांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार त्यात चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार सह अनेक आमदार आहेत जे मोठी असा लावून आहे की माझी वर्णी लागावी पण भाजपच्या 106 आमदारामधे जवळपास 9 आमदारांचाच मंत्रिपदासाठी विचार सद्ध्या केला जाणार आहे तर शिंदे गटात चाळीस व अपक्ष मिळून 50 पैकी केवळ पाच ते सहा आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो त्यामुळे उर्वरित आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण होऊन ते बंड करू शकतात असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. अर्थात शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सरकार साठी धोकादायक तर ठरणार नाही ना ?असा प्रश्न राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेत आहे.

अब्दुल सत्तार यांचा कसा केला गेम ?...

महाराष्ट्रात शिवसेना फोडण्याची भाजपाची रणनीती सटीक झाली पण या शिंदे गटात अब्दुल सत्तार यांची एन्ट्री भाजपच्या पंचनी पडली नाही त्यामुळे भाजप श्रेष्टीच्या अटीप्रमाणे अब्दुल सत्तार ला मंत्रिमंडळात घ्यायचं नाही पण शिंदेचे म्हणणं आहे की तो आमच्या सरकारमध्ये मंत्री होता त्यामुळे त्याला आता टाळता येणार नाही, पहिल्या गाडीने तो माझ्यासोबत आलाय, तो इथे कॅबिनेट मंत्रिपदाच्या आशेने आलाय पण शहाचा स्पष्ट आदेश आहे की सत्तारला मंत्रिमंडळात सहभागी करून घेतलं तर देशभरात एक वेगळा मेसेज जाईल.. आमच्या हिंदुत्ववादी प्रतिमेला कुठेतरी तडा बसेल..

यावर तोडगा कसा काढायचा असा पेच दिल्लीत सुरु होता..आता सत्तारला मंत्रीमंडळात टाळायचं कसं ? तर आज टीईटी घोटाळ्यात सत्तारच्या दोन मुलींची नावे आली आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार चा भाजप ने गेम केला अशी चर्चा सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here