Home चंद्रपूर महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या आढावा बैठकीत कलकाम गुंतवणूकदार धडकले

महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या आढावा बैठकीत कलकाम गुंतवणूकदार धडकले

मनसे महिला सेना राज्य उपाध्यक्षा रिटा गुप्ता यांनी कलकाम गुंतवणूकदार यांना न्याय मिळवून देण्याची दिली हमी.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा सुनीता गायकवाड यांच्या नेत्रुत्वात राज्य उपाध्यक्ष तथा मनसे सरचिटणीस रिटा गुप्ता व मनसे सरचिटणीस हेमंत गडकरी यांचा प्रमुख उपस्थितीत चंद्रपूर जिल्ह्यातही स्थानिक विश्रामगृह येथे महिला सेनेची आढावा बैठक घेतण्यात आली. या बैठकीत कलकाम कंपनीच्या गुंतवणूकदार महिलांनी धडक देऊन आपल्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला व आम्ही महिलांनी कलकाम कंपनीत गुंतवलेले पैसे परत मिळवून देण्याची मागणी केली होती त्या मागणीची गंभीर दखल घेत मनसे सरचिटणीस तथा महिलां सेना राज्य उपाध्यक्षा रिटा गुप्ता यांनी आम्ही सर्व मनसे पदाधिकारी आपल्या सोबत आहो जी मदत लागेल ती आम्ही देऊ प्रसंगी आपण मुंबई ला या आपण कलकाम कंपनीच्या संचालकांवर योग्य ती कारवाई करायला भाग पाडू असे आश्वासन दिले.

या आढावा बैठकीत महिलांना येणाऱ्या समस्या, महिलांसाठी असलेल्या विविध योजना ह्या सामान्य महिलांपर्यंत पोहचाव्या तसेच महिलांना रोजगार स्वयंरोजगार यावर भर देऊन स्वतःच्या पायावर उभे होऊन सक्षम करण्यासाठी महिला सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे असे आवाहन सरचिटणीस रिटा गुप्ता यांनी केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन महिला सेनेच्या जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड व जिल्हाउपाध्यक्ष शोभाताई वाघमारे, नगरसेवक सीमा रामेडवार यांनी केले होते.

यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, कामगार सेना जिल्हाध्यक्ष रविष सिंग, अरूणा श्रीकुंडावार,सुचिता रामेडवार, वाणी सादलावार, वर्षा भोमले, वर्षा पडगीलवार,प्रियंका चहारे, शामिम खान,अर्चना आमटे,प्रीती रामटेके, विमल लांडगे, राजिद शेख मनसे, सरू चतुलवार, मंगला चांदेकर,योगिता धोपटे, तालुका अध्यक्ष कल्पना पोतरलावार, शहर उपाध्यक्ष अर्चना वासनिक, विभाग अध्यक्ष मीनाक्षी जीवने, शहर उपाध्यक्ष रोशनी आमटे,सचिव किशोर मडगुलवार, जिल्हाउपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, ग्राम. सदस्य विवेक धोटे, तालुकाध्यक्ष प्रकाश नागरकर, करण नायर, मयूर मदनकर, ग्राम.पं. सदस्य नितीन टेकाम, मनोज तांबेकर, सुयोग धनवलकर, पियुष धुपे, राज वर्मा व असंख्य महिला यावेळी उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here