Home महाराष्ट्र राजकीय कट्टा :- महाराष्ट्रात नव्या मंत्रिमंडळातील कुणाला कोणते खाते मिळाले ते नक्की...

राजकीय कट्टा :- महाराष्ट्रात नव्या मंत्रिमंडळातील कुणाला कोणते खाते मिळाले ते नक्की वाचा.

सुधीर मुनगंटीवार यांना ऊर्जा व वन खाते मिळाल्याने चंद्रपूरात जल्लोष होणार?

मुंबई :-

राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसापूर्वी झाला व राजभवनातील दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नवनियुक्त मंत्र्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. भाजपचे ९ तर शिंदे गटाचे ९ अशा एकूण १८ आमदारांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे.परंतु त्यावेळी कुणाला कोणते खाते याबाबत गोपनीयता ठेवण्यात आली होती दरम्यान एका चर्चे नुसार चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकांमंत्री व राज्याचे माजी अर्थामंत्री यांच्याकडे ऊर्जा व वन खाते आल्याची चर्चा व इतर आमदार मंत्र्यांना कोणकोणती खाती वाट्याला आली याबाबत जवळपास स्पष्ट झाल्याची माहिती आहेत,

मंत्र्यांचे नाव, त्यांचा आणि त्यांचे खाते खालीलप्रमाणे

एकनाथ शिंदे – मुख्यमंत्री – नगरविकासदेवेंद्र फडणवीस – उपमुख्यमंत्री – गृह व अर्थ. राधाकृष्ण विखे पाटील – शिर्डी, अहमदनगर – महसूल. सुधीर मुनगंटीवार – बल्लारपूर, चंद्रपूर – ऊर्जा, वन. चंद्रकांत पाटील – कोथरुड, पुणे – सार्वजनिक बांधकाम. विजयकुमार गावित – नंदुरबार – आदिवासी विकास. गिरीश महाजन – जामनेर, जळगाव – जलसंपदा. सुरेश खाडे – मिरज, सांगली – सामाजिक न्याय. रवींद्र चव्हाण – डोंबिवली, मुंबई – गृहनिर्माण. अतुल सावे – औरंगाबाद पूर्व – आरोग्य. मंगलप्रभात लोढा – मुंबई – विधी व न्याय. गुलाबराव पाटील – जळगाव ग्रामीण – पाणीपुरवठा. दादाजी भुसे – मालेगाव बाह्य, नाशिक – कृषी. संजय राठोड – दिग्रस, यवतमाळ – ग्रामविकास. संदीपान भुमरे – पैठण, जालना – रोजगार हमी. उदय सामंत – रत्नागिरी – उद्योग. तानाजी सावंत – परांडा, उस्मानाबाद – उच्च व तंत्रशिक्षण. अब्दुल सत्तार – सिल्लोड, औरंगाबाद – अल्पसंख्याक विकास. दीपक केसरकर – सावंतवाडी, सिंधुदुर्ग – पर्यावरण, पर्यटन. शंभुराजे देसाई – पाटण, सातारा – उत्पादन शुल्क

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here