Home वरोरा मनविसेच्या शाखा फलकांचे आनंद निकेतन महाविद्यालयासमोर थाटात उद्घाटन.

मनविसेच्या शाखा फलकांचे आनंद निकेतन महाविद्यालयासमोर थाटात उद्घाटन.

महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना राज्य उपाध्यक्षा रिटा गुप्ता व राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी यांची उपस्थिती.

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखा बांधणीचा कार्यक्रम सतत सुरू असून आता हा मोर्चा विद्यार्थी सेनेच्या शाखा बांधणीकडे सुद्धा वळला आहे, वरोरा येथील पद्मश्री बाबा आमटे यांच्या आनंद निकेतन महाविद्यालयासमोर मनविसे शाखा फलकांचे उद्घाटन नुकतेच दिनांक 10 ऑगस्ट ला दुपारी 1.00 वाजता महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना राज्य उपाध्यक्षा रिटाताई गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मनसे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी,मनसे स्थानिक नेते रमेश राजूरकर, मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार, मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार,मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, जिल्हा सचिव विनोद सोनटक्के, तालुका अध्यक्ष वैभव दहाने, तालुका उपाध्यक्ष प्रशांत बदकी मनविसे शहर उपाध्यक्ष सत्या मांडवकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

मनविसे वरोरा तालुका अध्यक्ष दीपक देशमुख यांच्या नेतृत्वात वरोरा तालुक्यातील विद्यार्थ्यांचे संघटन तयार करण्यास सुरुवात झाली आहे, त्यांनी अल्पावधीतच आनंद निकेतन महाविद्यालयातील विद्यार्थ्याना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत आणून महाविद्यालयात मनविसे अध्यक्ष अमितसाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असणारी विद्यार्थी संघटना उभारण्याचे कार्य सुरू केले आहे. या शाखा कार्यकारणी मधे मयुर बुरांडे, साहील सरपाते, नुपुर पाउलकर, समीर तुराले, शिवा पंधरे, चेतन जेऊरकार, गणेश घेडे, नैतीक तुराठे, निकेश दडमल, अमीत खाडे, शुभम देवतळे यांचा समावेश आहे.

Previous articleसालोरी ग्रामपंचायतच्या बोगस कारभाराविरोधात मनसे कार्यकर्त्यांचा एल्गार.
Next articleराजकीय कट्टा :- महाराष्ट्रात नव्या मंत्रिमंडळातील कुणाला कोणते खाते मिळाले ते नक्की वाचा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here