स्ट्रीट लाईटचे वीज बिल थकवुन ग्रामस्थांच्या जीवनाशी खेळणाऱ्या सरपंच सचिवांचा खेळ संपणार ?
वरोरा प्रतिनिधी :-
तालुक्यातील मोठ्या खेड्यापैकी एक असणारे सालोंरी गाव मागील दोन महिन्यांपासून अंधारात असून सरपंच उपसरपंच व सचिव हे येथील ग्रामस्थांच्या जीवनाशी जणू खेळ खेळत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखा पदाधिकाऱ्यांनी या विरोधात एल्गार पुकारून गावातील नागरिकांना सुरक्षा देण्यासाठी पंचायत समिती संवर्ग विकास अधिकारी यांना निवेदन दिले की सालोरी गावातील स्ट्रीट लाईट चे वीज बिल थकीत आहे व गावातील रस्ते नाल्या हय़ा पूर्णता उध्वस्त झाल्या आहे शिवाय सांडपाणी रस्त्यांवर आल्याने नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे तरी आपण या प्रकरणी तात्काळ उपाययोजना करा व येथील नागरिकांच्या समस्या सोडवा अन्यथा ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यात येईल.
हे निवेदन देऊन अख्खा महिना लोटला तरी ग्रामपंचायत प्रशासन जागले नाही त्यामुळे मनसे तर्फे गावात पावसाळ्यात लोकांनी आपल्या सुरक्षा व आरोग्याची काळजी घ्यावी यासाठी जनजागृती पदयात्रा काढून लोकांना आवाहन केले व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सालोरी गावात स्ट्रीट लाईट सुरू करण्यासाठी प्रयत्न करेल असा विश्वास दिला दरम्यान महावितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता भोयर यांना भेटून सालोरी गावात स्ट्रीट लाईट सुरू करण्यासंदर्भात मदत करण्याचे आवाहन केले त्यामुळं त्यांनी तुम्ही केवळ एका महिन्याचे सुरू वीज बिल भरा मी लाईट सुरू करून देतो असे आश्वासन दिले. मनसेने हा मोर्चा संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडे वळवला व त्यांच्याकडे तगादा लावला की आपण या प्रश्नावर गांभीर्याने विचार करून सालोरी ग्रामपंचायत चे स्ट्रीट लाईट बिल भरण्यास सांगा अन्यथा आम्ही लोकवर्गणी करून लाईट बिल भरू. त्यांवर संवर्ग विकास अधिकारी यांनी तात्काळ विस्तार अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनी वर बोलून सालोरी गावाच्या वीज बिल संदर्भातील प्रश्न त्वरीत निकाली काढण्याचा आदेश दिला. दरम्यान विस्तार अधिकारी यांनी ग्रामपंचायत सचिव अशोक सुखदेवे यांना पंचायत समिती मधे बोलावून घेतले असल्याची माहिती असून आता सालोरी गावाची स्ट्रीट लाईट लवकरच सुरू होईल अशी शक्यता आहे. या संदर्भात स्वतः मनसे नेते रमेश राजुरकर जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे जिल्हा सचिव विनोद सोनटक्के संदीप मोरे. शुभम वाकडे, रंगनाथ पवार व इतर शाखा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले आहे. आता सरपंच सचिव यांच्या विरोधात मनसे ने पुकारलेला एल्गार सालोरी गावात लाईट आणून देणार की स्ट्रीट लाईटचे वीज बिल थकवुन ग्रामस्थांच्या जीवनाशी खेळणाऱ्या सरपंच सचिवांचा खेळ संपणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.