Home चंद्रपूर आक्षेप :- धनोजे कुणबी समाज अध्यक्ष म्हणून आवाजी मताने निवडून आलेल्या अँड...

आक्षेप :- धनोजे कुणबी समाज अध्यक्ष म्हणून आवाजी मताने निवडून आलेल्या अँड सातपुते यांच्यावर आक्षेप ?

काय आहे सामाजिक नेते बळीराज धोटे यांचा आक्षेप ? जाणून घ्या सविस्तर.

चंद्रपूर प्रतिनिधी :

जिल्ह्यात धनोजे कुणबी समाजाची संख्या ही राजकीय द्रुष्टीने फार महत्वपूर्ण असून त्यांचा ज्या उमेदवारांना पाठिंबा तोच उमेदवार निवडून येतो अशी आजवरची राजकीय स्थिती आहे मात्र या समाज संस्थेत विरोधी प्रवाह सुद्धा असून लोकशाही पद्धतीने या समाजाचा अध्यक्ष निवडल्या जातो अशातच सन २०१४ च्या निवडणुकीनंतर राजकीय दृष्टया महत्व प्राप्त झालेल्या या धनोजे कुणबी समाजाच्या आमसभेत समाजाचा अध्यक्ष निवडताना अक्षरक्षः बुथ कॅपचरिंगचा प्रकार घडला असल्याचा आरोप विरोधी गटांकडून करण्यात येत असल्याने समाजात तर्क वितर्क लावल्या जातं आहे.

चंद्रपूर येथील धनोजे कुणबी समाज मंदीर या संघटनेच्या ३२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असा आरोप होतं असून अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आलेल्या अँड पुरुषोत्तम सातपुते यांना शुभेच्छा देण्याऐवजी विरोधकांनी त्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. समाज आणि लोकशाही प्रक्रीयेसाठी अत्यंत चुकीचा आणि घातक पायंडा अँड सातपुते यांनी पाडला अशा संतप्त प्रतिक्रिया विरोधकांनी दिल्या. दरम्यान अँड पुरुषोत्तम सातपुते यांची आक्टोंबर २०१८ मध्ये एकमताने निवड झाली होती व त्यांच्या कार्यकाळात अनेक चांगले उपक्रम व समाजाच्या उत्थानासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते मात्र अँड पुरुषोत्तम सातपुते च कां ? आम्ही कां नाही ? असा काही समाजातील नेत्यांचा सूर होता पण काल बोलावलेल्या आम सभेत आवाजी मताने अँड पुरुषोत्तम सातपुते यांची दुसऱ्यांदा निवड झाल्याने विरोधकांनी निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत संताप व्यक्त केला.

काय म्हणाले बळीराज धोटे ?

दिनांक 28 ऑगस्ट ला घेण्यात आलेल्या बैठकीत विषय क्रमांक ५ मध्ये सन २०२२-२५ या कालावधी न्यासाचा कार्यकारणी निवड एकमताने करणे. एकमत न झाल्यास निवडणुक घेण्याबाबत कार्यक्रम जाहीर करणे, असा विषय होता. एकमत होत नसल्याने निवडणुक होणार व निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल, असे गृहीत धरून बहुतांश समाज सदस्य या आमसभेला आलेच नाही. त्याचाच फायदा घेत अँड. सातपुते यांनी आपली मनमानी केली, असा आरोप बळीराज धोटे यांनी केला.

दरम्यान समाज संघटनेचे पैसे वाचविण्यासाठी आवाजी मतदाने निवडणुक घेतली. ज्यांना कुणाला आक्षेप असेल ते घेवू शकतात असे आवाहन नवनिर्वचित अध्यक्ष अँड पुरुषोत्तम सातपुते यांनी विरोधकांना केले आहे तर हा प्रकार बरोबर नाही. लोकशाही पध्दतीने निवडणुक व्हायला हवी होती. झाले ते अत्यंत दुर्देवी आहे. ‘अशी प्रतिक्रिया विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाहक सुधाकर अडबाले यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here