Home वरोरा ब्रेकिंग :- हॉटेल एन्जाय रेस्टारेंटला बार चा परवाना मिळाल्यास आंदोलन.

ब्रेकिंग :- हॉटेल एन्जाय रेस्टारेंटला बार चा परवाना मिळाल्यास आंदोलन.

प्रस्तावित हॉटेल एन्जायच्या बार विरोधात आझाद प्रभाग, जिजामाता वार्ड येथील नागरिकांचा एल्गार !

वरोरा प्रतिनिधी :-

जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात बेकायदेशीर “बार” चे परवाने वाटप केल्याची ओरड जिल्ह्यात होतं असतांना आता वरोरा शहरातील गजानन मंदिरा जवळ प्रज्वल हरेन्द्र अंड्रस्कर यांच्या एन्जाय रेस्टारेंटला “बार” चा परवाना मिळत असल्याची माहिती मिळताच जिजामाता वार्ड व आझाद प्रभाग येथील नागरिकांनी या बार च्या विरोधात एल्गार पुकारला आहे.

प्रज्वल हरेन्द्र अंड्रस्कर या व्यक्तीचे मौजा वरोरा येथे गजानन मंदिर जवळ, जिजामाता वार्ड, आझाद प्रभाग या ठिकाणी हॉटेल एन्जाय रेस्टारेंट असून त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग यांचेकडे बार चे परमिट मिळण्याकरिता अर्ज सादर केलेला आहे. मात्र वरील प्रभागातील लोकांचा या हॉटेलला व बारचे परमिट मिळण्याकरिता आक्षेप असून त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे आक्षेप अर्ज दाखल केला आहे. त्यांनी आपल्या आक्षेप अर्जात म्हटले आहे की कोणत्याही बारचे परमिट देतांना धार्मिक स्थळापासून सदरचे बार हे ७५ मिटर अंतराचे दुर असावयास पाहिजे असा नियम आहे. परंतू सदर हॉटेल हे गजानन मंदिराला लागून आहे. इतकेच नव्हे तर सदर गजानन मंदिरामध्ये अनेक धार्मिक कार्यक्रम होतात व त्यासाठी स्त्रीया व पुरुष तसेच भाविक मंडळी सदर मंदिरात येत असतात. त्यामुळे सदर बारचे वातावरणामुळे व बारमधून दारू पिवून निघणाऱ्या दारूडयामुळे या स्त्रीया व पुरूषांना अश्लिल शिवीगाळ व असभ्य वागणूक मिळण्याची शक्यात आहे त्यामुळे मंदिराच्या धार्मिक अस्मिता आणि अस्तित्वाला धोका निर्माण होण्याची शक्यात आहे. या मंदिर परिसरात व मंदिराचे आवारात लहान मुलांचे खेळणे लागलेले आहे. त्या ठिकाणी येणाऱ्या लहान बालकांच्या मनोवृत्तीवर सदर बारमधील दारूडयामुळे विपरीत परिणाम होवून येणारी भावी पिढी सुद्धा बरबाद होण्याची शक्यता आहे. होईल.

निवासी जागेवर वाणिज्य वापर कसा ?

हॉटेल एन्जाय रेस्टारेंट हे भरवस्ती म्हणजे निवासी जागेवर असून सदर हॉटेल ज्या इमारतीत सुरू करण्यात येत आहे. ती इमारत सुरुवातीला निवास होती परंतु सदर इमारत आता बेकायदेशीर वाणिज्य प्रयोजनार्थं बदल केलेला आहे त्यामुळे हॉटेल एन्जाय रेस्टारेंट हे नियमबाहय आहे. भरवस्तीत असलेल्या सदर हॉटेल मुळे आजबाजुच्या घरी राहणाऱ्या सभ्य नागरिकांची सदर बारमधून निघणाऱ्या दारूडयामुळे मनस्थिती खराब होईल. तसेच सदरचे हॉटेलच्या सभोवताल सदर दारूडे हे अश्लिल भाषेत बोलतात त्यामुळे आजूबाजूच्या घरातील स्त्रीयांची मानखंडना होईल. तसेच अश्लिल भाषेला तोंड दयावे लागेल व आपले घराचे बाहेर निघणे कठीण होईल त्यामुळे निवासी परिसरात अशा प्रकारचे बार ला परवाना देऊ नये अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा सदर वार्डातील नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे.

नगरपरिषद प्रशासनाची एनओसी कशाच्या बळावर ?

ज्याअर्थी हॉटेल एन्जाय रेस्टारेंट हे निवासी जागेवर आहे व त्याच्या हाकेच्या अंतरावर गजानन मंदिर हे धार्मिक स्थळ आहे त्याअर्थी नगरपरिषद प्रशासनाने कुठल्या निकषांवर हॉटेल एन्जाय रेस्टारेंट एनओसी दिली याबाबात आश्चर्य व्यक्त केल्या जातं असून ते नगरपरिषद प्रशासनाचे कोणते अधिकारी आहे ? ज्यांनी एनओसी साठी सहकार्य केले याचा शोध घेणे गरजेचे झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here