Home महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांचा बाप काढणाऱ्या सुषमा अंधारे यांनी राजसाहेब ठाकरे यांना शिकवू...

उद्धव ठाकरे यांचा बाप काढणाऱ्या सुषमा अंधारे यांनी राजसाहेब ठाकरे यांना शिकवू नये.

राष्ट्रवादी व्हाया शिवसेनेत आलेल्या सुषमा अंधारे यांचा प्रशिद्धि करिता राजसाहेब ठाकरे यांच्यावर शाब्दिक हल्ला योग्य नाही.

न्यूज नेटवर्क :-

राजसाहेब ठाकरे हे भाजपाचा अजेंडा चालवत आहेत. बाळासाहेबांनी निर्माण केलेली प्रादेशिक अस्मिता आणि त्यांचा पक्ष संपवण्यासाठी कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत, अशी टीका शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. त्या पुण्यात बोलत होत्या. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर मनसेने टीका केली होती. वारसा हा वास्तूचा नसून विचारांचा असतो, असे म्हणत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर टीका केली होती. त्याला सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सध्या शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात सामना पाहायला मिळत आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला अद्याप परवानगी मिळालेली नाही. शिंदे गटही मेळावा घेणार असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून होत आहे. अशावेळी इतर पक्षही शिवसेनेवर हल्लाबोल चढवित आहेत.

कोण हय़ा सुषमा अंधारे ?

परळी येथे 2009 मध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढविणाऱ्या सुषमा अंधारे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार सभा घेतल्या स्वतःला पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारवंत म्हणून मिरविनार्या सुषमा अंधारे राष्ट्रवादीच्या त्या प्रचारक होत्या. मात्र आपलं पुरातत्व बाजूला शिवसेनेत आल्या मागील निवडणुकीत जितेंद्र आव्हाडांच्या प्रचारासाठी त्यांनी सभा घेतली होती. या सभेत त्यांनी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर अत्यंत गंभीर टीका केली होती. त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. पण सरड्यासारख्या राजकीय पक्ष बदलवुन व स्वतःचे पुरोगामी विचार गुंडाळून हिंदुत्वाची कास धरणाऱ्या शिवसेनेत आलेल्या सुषमा अंधारे यांची राजसाहेब ठाकरे वर टीका करण्याची लायकी आहे कां ?हे जरा सुषमा अंधारे यांनी समजून घेणे गरजेचे आहे.

मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे अंधारे यांच्या अंधपणाला भाव देईल ?

संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर अख्ख्या देशात “लाव रे विडियो” म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर धुवांधार भाष्य करत भाजप ची कोंडी केली होती. राजसाहेब ठाकरे यांच्या भाषणाच्या क्लिप देशातील सर्वच राज्यात त्या त्या प्रादेशिक भाषेत डबिंग करण्यात आल्या होत्या. एक नेता अख्ख्या देशात गर्जत होता. ती लोकप्रियता क्वचितच कुणाच्या वाटेला येईल पण स्वर्गिय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा खरा वारसा हा फक्त आणि फक्त राजसाहेब ठाकरे हेच चालवू शकतात हे आता केवळ महाराष्ट्रातील जनता नाही तर देशातील जनता म्हणायला लागली आहे पण सुषमा अंधारे यांना ही गोष्ट खोडून काढायची आहे त्यामुळे त्यांनी दसरा मेळाव्याच्या निमित्याने जी चढाओढ सुरू आहेत त्यात प्रशिद्धि मिळविण्यासाठी राजसाहेब ठाकरे यांच्यावर टीका केली असल्याची चर्चा आहे. पण राजसाहेब ठाकरे सुषमा अंधारे सारख्या विचार भटकलेल्या अंध विचारांच्या व्यक्तीच्या बोलण्याला भाव देईल अशी शक्यात फार कमी आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा बाप काढणाऱ्या सुषमा अंधारे यांनी राजसाहेब ठाकरे यांना शिकवू नये असे आवाहन महाराष्ट्र सैनिक करत आहे.

Previous articleब्रेकिंग :- हॉटेल एन्जाय रेस्टारेंटला बार चा परवाना मिळाल्यास आंदोलन.
Next articleदुर्दैवी :- कोंढा येथील वर्षा मंगाम हिचा शेतात वीज पडून दुर्दैवी मृत्यु.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here