Home भद्रावती दुर्दैवी :- कोंढा येथील वर्षा मंगाम हिचा शेतात वीज पडून दुर्दैवी मृत्यु.

दुर्दैवी :- कोंढा येथील वर्षा मंगाम हिचा शेतात वीज पडून दुर्दैवी मृत्यु.

जिल्ह्यातील ही चवथी घटना, निसर्गाचा शेतकऱ्या सह शेतमजूर यांच्यावर पण कोप.

भद्रावती प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी वरोरा तालुक्यातील वायगाव येथील एकाच कुटुंबातील चार महिलांचा शेतात वीज पडून दुर्दैवी मृत्यु झाला होता तर माढेळी जवळ एका शेतात वीज पडून एकाचा मृत्यु तर चार जन जखमी झाले होते आता कोंढा येथे शेतात काम करीत असताना कोंढा या गावाच्या शेत शिवारात वीज पडून वर्षा ओंकार मंगाम वय 32 हया महिलेचा दुपारी तीन ते साडेतीन च्या दरम्यान जागीच दुर्दैवी मृत्यु झाला. त्यामुळे निसर्ग आता शेतकऱ्यासह शेतमजूर यांच्यावर कोपला कां ?असा प्रश्न निर्माण होतं आहे.

या वर्षी संततधार पाऊस व त्यामुळे आलेला जोरदार पूर यामुळे शेतकऱ्यांची पिके वाहून गेली तर काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्याने त्यांची पिके खराब झाली त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे असतांना शेतकऱ्यांकडे पैसे नाही तर मग दुबार पेरणी शेतकरी करणार कसा ? या विवंचनेत शेतकरी हवालदिल झाला असल्याने काही शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही अशी स्थिती आहे पण शिंदे फडणवीस सरकार शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्यास तयार नाही त्यातच आता विज पडून शेतातील शेतकरी शेतमजूर मरत असल्याने आता शेतकरी कसा जगेल ?हा प्रश्न उभा राहत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here