Home वरोरा खळबळजनक:- मुलीच्या जन्म दाखल्यामधे सरपंच भोयर यांनी चक्क आजोबाला वडील बनवले ?

खळबळजनक:- मुलीच्या जन्म दाखल्यामधे सरपंच भोयर यांनी चक्क आजोबाला वडील बनवले ?

सन 2003 मधे दुसऱ्या पत्नीपासून जन्मलेल्या ममता या मुलीच्या जन्म दाखल्यात वडिलांच्या जागेवर आजोबा भदुजी यांचे नाव ?

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा तालुक्यातील येन्सा या गावाचे सरपंच रवि पंढरी भोयर (वय 48 वर्ष) यांना दोन पत्नी पासून तीन अपत्य आहे मात्र ग्रामपंचायत निवडणूक लढताना तीन अपत्य हा अडथळा ठरतो त्यामुळे त्यांनी दुसऱ्या पत्नी नंदा पासून जन्मलेल्या ममता या मुलीच्या जन्म दाखल्यात स्वतःच्या नावाच्या ठिकाणी रवि ऐवजी रवींद्र व वडील पंढरी ऐवजी अजोबा भदुजी हे नाव नोंदवून शासन प्रशासनाच्या डोळ्यात धूळ झोकण्याचे काम केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

रवि उर्फ रवींद्र पंढरी भोयर यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्या नामनिर्देशन अर्जात फक्त दोन अपत्य असल्याची माहिती भरून ममता नावाची तिसरी मुलगी लपवली आहे. व त्यांनी स्वयंघोषित अपत्य प्रमाणपत्र यामध्ये मला केवळ दोनच अपत्य असल्याचे दाखवले आहे, त्यामुळे भारतीय दंड संहिता 1960 चे कलम 199 व 200 नुसार रवि उर्फ रवींद्र भोयर हे शिक्षेला पात्र असून त्यांचे सदस्यत्व रद्द होऊ शकते.

काय आहे पूर्ण स्टोरी ?

वरोरा तालुक्यातील येन्सा या ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच रवि उर्फ पंढरी भोयर यांना वेणू नावाच्या पहिल्या पत्नी पासून रंजीत रवींद्र भोयर (जन्म दिनांक: 19/7/1999) नावाचा मुलगा आहे ज्यांचे नाव येन्सा प्रभाग क्रमांक -1 यादी भाग क्रमांक 83-1 व अणुक्रमांक -96 आहे तर नंदा या दुसऱ्या पत्नी पासून रुपाली ( जन्म दिनांक 24/8/2001) व ममता (जन्म दिनांक :-14/9/2003) नावाच्या दोन मुली आहे. ज्यांची नावे शिधावाटप पत्रिका म्हणजे राशन कार्डवर आहे. पण ग्रामपंचायत निवडणुकीत तीन अपत्य असल्यामुळे उमेदवारी अर्ज भरता येत नाही त्यामुळे रवि पंढरी भोयर यांनी नंदा या दुसऱ्या पत्नीपासून असलेल्या ममता या मुलीच्या जन्म दाखल्यावर स्वतःचे नाव रवि ऐवजी रवींद्र व वडिलांचे पंढरी ऐवजी आजोबा भदुजी असे नमूद केले जेणेकरून त्यांना निवडणूकीत अपात्र करण्यात येऊ नये. रवि पंढरी भोयर यांच्या दुसऱ्या पत्नी नंदा हिच्या पासून असलेल्या दोन मुलींच्या जन्म दाखल्यावर नावाबाबत भिन्नता असली तरी पत्नी म्हणून नंदा हे नाव दोन्ही दाखल्यावर नमूद आहे व राशन कार्डवर रवींद्र भोयर, पत्नी नंदा रवींद्र भोयर, मुली रुपाली व ममता रवींद्र भोयर असे नमूद आहे. त्यामुळे रवि भोयर यांनी नामनिर्देशन अर्जात केवळ दोन अपत्य दाखवले आहे व प्रत्यक्षात तीन अपत्य असल्याने त्यांनी शासन प्रशासनाची दिशाभूल आणि फसवणूक केली आहे त्यामुळे त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व व सरपंच पद रद्द करण्यात यावे अशी मागणी येन्सा या गावातील सामाजिक कार्यकर्ते वामन काळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

Previous articleदुर्दैवी :- कोंढा येथील वर्षा मंगाम हिचा शेतात वीज पडून दुर्दैवी मृत्यु.
Next articleचक्रधर स्वामी अष्टशताब्धी महोत्सव अटगाड टेकडी(चिंचोली) येथे उत्साहात साजरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here