Home चंद्रपूर गडचांदूर न.प कर्मचारी कृपिल नलेवार,प्रमोद वाघमारे यांच्यावर कारवाई करा.

गडचांदूर न.प कर्मचारी कृपिल नलेवार,प्रमोद वाघमारे यांच्यावर कारवाई करा.

अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करू ,सामाजिक कार्यकर्ते दीपक वर्भे यांचा इशारा.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

गडचांदूर नगरपरिषद ही नेहमीच वादात गुंतलेली असताना आता या गडचांदूर न.प कर्मचारी कृपिल नलेवार व प्रमोद वाघमारे यांनी खुलेआम प्रतिबंधित असलेले प्लास्टिकच्या वस्तूने (पत्रावळी, द्रोण, गिलास, कटोऱ्या व अन्य) भरलेले बंद पिकअप वाहन पकडल्या नंतर गाडी मालकाकडून दंडाची रक्कम वसूल केली मात्र त्यातून लाखों रुपयांची हेराफेरी केल्याची तक्रार गडचांदूर येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक वर्भे व इतरांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे आणि स्थानिक गडचांदूर न.प प्रशासनाकडे दिली मात्र यावर कुठलीही चौकशी व संबंधितांवर कुठलीही कारवाई केली नसल्याने गडचांदूर न.प कर्मचाऱ्यांना जणू हेराफेरी करण्याची खुली सूट दिली की काय ? असा प्रश्न निर्माण होतं आहे.

महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार संपूर्ण राज्यात प्लॉस्टीक बंदी असून विविध ठिकाणी त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरु आहे. मात्र कोरपना तालुक्यातील नगर परिषद गडचांदूर हद्दीत सदर प्लॉस्टीक बंदीचा पुरता बोजवारा उडाल्याचे स्पष्ट दिसून येते. दरम्यान, दि. २४ ऑगष्ट २०२२ रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास वर्धा येथील सुमित ब्रिजकिशोर नाजोदिया यांचे पिकअप वाहन उल्लेखित प्लॉस्टिकच्या वस्तु भरुण गडचांदूर येथील मे. झुल्लूरवार कॅम्पलेक्समध्ये असलेल्या मे. भवाणी जनरल स्टोअर्स गडचांदूर येथे दाखल झाले. या वाहनात पुर्ण प्लॉस्टीकच्या वस्तु होत्या. त्या वस्तू सदर दुकाणात उतरवणे सुरु असल्याची कुणकुण नगर परिषदच्या काही कर्मचाऱ्यांना लागली. तेव्हा कृपिल नलेवार,प्रमोद वाघमारे हे दोघेही सदर दुकाणात जाऊन त्यांनी कथीत धाडीची थातुरमातूर कार्यवाही केली. दरम्यान, बघ्याची गर्दी वाढल्याने कृपिल नलेवार,प्रमोद वाघमारे यांनी थोडासा प्लॉस्टिक माल वाहनात ठेवून ते वाहन गडचांदूर नगरपरिषदेत नेले. तेव्हा गाडी मालकाशी बोलून नगदी दोन लाख रुपये वसुल केले व पावती क्रमांक ३३३८४ नुसार फक्त पन्नास हजार दाखवून उर्वरित दिड लाखाची त्यांनी अफरातफर केली.

सदर सर्व प्रकरण श्रीशंत झुल्लुरवार आणि भवाणी जनरल स्टोअर्सच्या सिसिटिव्हीत रेकॉर्डींग झाले आहे. पोलीसांकडून हे सारे फुटेज तपासल्यास संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होऊ शकतो. तेव्हा या गंभीर प्ररकणाची तातडीने दखल घ्यावी व कृपिल नलेवार, प्रमोद वाघमारे यांच्यावर निलंबनाची कारवाई करून त्यांच्यावर हेराफेरी केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करावे अन्यथा येत्या 14 सप्टेंबर पासून आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गडचांदूर येथील सर्व सामाजिक कार्यकर्ते आमरण उपोषण करू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते दीपक वर्भे व इतरांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here