Home चंद्रपूर भयंकर :- ट्रकची दुचाकीला जबर धडक, पतीचा जागीच मृत्यू तर पत्नी गंभीर...

भयंकर :- ट्रकची दुचाकीला जबर धडक, पतीचा जागीच मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी.

चंद्रपूर घुग्गुस मार्गावरील धानोरा फाट्याजवळ भीषण अपघात.

चंद्रपूर –

आज दुपारी १. ३० वाजताच्या सुमारास चंद्रपूर-घुग्घुस मार्गावरील धानोरा फाट्यावर भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाली. मृताचे नाव सपन संतोष गाईन (४०) तर मंजू गाईन असे जखमी महिलेचे नाव आहे. हे दाम्पत्य श्याम नगर चंद्रपूरचे रहिवासी आहे.

गाईन दाम्पत्य दुचाकी क्रमांक एमएच ३४ एझेड १०८६ ने धानोरा गावाकडे जात होते. विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक क्र. टीएन ३७ डीएक्स ८१७६ ने जबर धडक दिली. त्यात संतोष गाईन यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची पत्नी मंजू गंभीर जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच घुग्घुस पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी मंजूला दवाखान्यात दाखल केले.

या प्रकरणी ट्रकचालक सादिक अहमद (रा. आवारपूर) याला पोलिसांनी अटक केली आहे. या मार्गावर नेहमी अपघात होत असतात, अशी माहिती नागरिकांनी दिली.

Previous articleगडचांदूर न.प कर्मचारी कृपिल नलेवार,प्रमोद वाघमारे यांच्यावर कारवाई करा.
Next articleएसआरके कंपनीच्या चुकीमुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे लाखोंचे नुकसान.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here