Home वरोरा एसआरके कंपनीच्या चुकीमुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे लाखोंचे नुकसान.

एसआरके कंपनीच्या चुकीमुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे लाखोंचे नुकसान.

मनसे चा कंपनी कडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी एल्गार.

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा चिमूर रोडच्या संथगती कामामुळे व एसआरके कंपनीच्या चुकीच्या नियोजनामुळे मागील पावसात शेतकऱ्यांचे शेतात अतिरिक्त पाण्याचा प्रवाह गेल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले पण स्थानिक प्रशासन व कंपनी च्या व्यवस्थापनांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक भुर्दंड बसला त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे व जिल्हा सचिव विनोद सोनटक्के यांच्या नेत्रुत्वात कंपनीच्या व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले.

मागील दोन महिन्यांपासून संततधार पावसाने अगोदरच शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठे नुकसान झाले असताना वरोरा ते चिमूर रोडच्या संथ गती व चुकीच्या नियोजनाचा मोठा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे. यामध्ये सालोरी, परसोडा, वलनी,खातोडा, खैरगाव, बांद्रा, बोरगांव इत्यादी गावातील शेतकऱ्यांच्या शेतपिकांचा समावेश आहे.

सालोरी या गावालगत असलेल्या धानाच्या शेतपिकांत जवळील नाल्यांच्या वरील बांधकामाच्या चुकीच्या नियोजनाने अख्खे धान पीक कपाशी व सोयाबीन ची पिके पाण्याच्या प्रवाहाने खरवडून नेले आहे तर बाकी गावातील शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे सुद्धा मोठे नुकसान यामुळे झाले आहे. त्यामुळे कंपनी कडून या सातही गावातील बाधित झालेल्या शेतपिकांच्या शेत पिकांचे सर्व्हे करून शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार नुकसान भरपाई द्यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकऱ्यांच्या न्यायिक हक्कांसाठी आपल्या कंपनी विरोधात तीव्र आंदोलन करेल असा इशारा मनसे तर्फे कंपनीला देण्यात आला आहे. यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, जिल्हा सचिव विनोद सोनटक्के, रंगनाथ पवार. राजू रंदई व शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here