Home वरोरा गणेश विसर्जन मिरवणुकीत भाजपचा मंडप गायब ? शिवसेवा हेल्पिंग हँड ग्रुपने घेतली...

गणेश विसर्जन मिरवणुकीत भाजपचा मंडप गायब ? शिवसेवा हेल्पिंग हँड ग्रुपने घेतली जागा.

मनसे स्थानिक नेते रमेश राजूरकर यांची मंडपाला भेट, भाजप गोटात चर्चेला उधाण.

वरोरा प्रतिनिधी :-

जिल्ह्यात सगळीकडे अनंत चतुर्दशी च्या मुहूर्तावर गणेश विसर्जनाची धूम असते व सगळे राजकीय पक्ष आपापली ताकत दाखवण्यासाठी व गणेश भक्तांचा उत्साह वाढविण्यासाठी त्यांचे स्वागत व सत्कार मिरवणुकीदरम्यान करतात, त्यातच वरोरा शहारात भाजपचे नेहमीच गणेश भक्तांच्या स्वागतासाठी मंडप असायचा पण यावेळी तो मंडपच गायब असल्याने भाजप चे माजी नगरसेवक अनिल साखरिया यांच्या शिवसेवा हेल्पिंग हँड नावांच्या संस्थेद्वारे मंडप उभारून गणेश भक्तांचे स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे मनसेचे स्थानिक नेते रमेश राजूरकर यांनी या स्वागत मंडपाला भेट दिल्याने भाजप च्या गोटात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या चंद्रपूर दौऱ्यांचे नियोजन सुरू असल्याने मनसे तर्फे गणेश भक्तांचे स्वागत मंडप उभारले गेले नसल्याचे बोलल्या जातं आहे, मात्र नेहमी भाजप नेते नगरपरिषद मधे सत्ता असताना पुढे पुढे करायचे तेच नेते सत्ता गेल्यावर कुठे गायब झाले ? हा संशोधनाचा विषय ठरला आहे.

मध्यंतरी भाजपचे नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा होतं होती मात्र भाजपच्या वरिष्ठांनी यावर तात्पुरता तोडगा काढला होता पण वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात पक्षाला स्थानिक नेत्रुत्वच नसल्याने पक्षाचे कारभारी कोण ? व कुणाकडे तक्रार करायची ? याबद्दल संभ्रम नगरसेवक व पदाधिकाऱ्यांत निर्माण झाला आहे. जर अशीच परिस्थिती राहिली तर भाजपाला पुन्हा दहा वर्षांच्या कालखंडात मागे जावे लागेल येवढे मात्र नक्की.

या आयोजनासाठी अनिल साखरिया. किशोर टिपले, सुशील बाकडे, प्रशांत क्षीरसागर, महेश पवार,अँड गजानन बोढाले,आनंद मंजूरकर,कपिल खेकारे, नरेंद्र टेमुर्डे, राहुल बोढे, शुभम गेघाटे,भारत तेला इत्यादींनी प्रयत्न केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here