Home वरोरा मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या चंद्रपूर दौऱ्यानिमित्याने वरोरा येथे पदाधिकाऱ्यांची बैठक.

मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या चंद्रपूर दौऱ्यानिमित्याने वरोरा येथे पदाधिकाऱ्यांची बैठक.

खांबाडा ते घोडंपेठ मनसेच्या बाईक मिरवणुकीचे व स्वागताचे होणार आयोजन.

वरोरा प्रतिनिधी :-

अनेक वर्षांपासून मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा विदर्भ दौरा झाला नव्हता पण चंद्रपूर जिल्ह्यात त्यांचा पक्ष स्थापनेनंतर सन 2008 ला झालेला दौरा व वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात आनंदवन चौक, रत्नमाला चौक व भद्रावती येथे झालेले भव्य स्वागत हे येथील महाराष्ट्र सैनिकांच्या डोक्यात आजही आहे त्यामुळे येणाऱ्या 20 सप्टेंबरला राजसाहेब ठाकरे यांचे त्याहीपेक्षा भव्यदिव्य स्वागत व्हावे ही येथील महाराष्ट्र सैनिकांची इच्छा आहे आणि म्हणूनच स्थानिक मनसे जेष्ठ नेते रमेश राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे जिल्हा सचिव विनोद सोनटक्के तालुका अध्यक्ष वैभव डहाने यांच्या नेत्रुत्वात राजसाहेब ठाकरे यांच्या दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी वरोरा तालुक्यातील मनसे पदाधिकारी व शाखा पदाधिकारी यांची संयुक्त बैठक दिनांक 10 सप्टेंबरला स्नेहनगर वरोरा येथील पक्ष कार्यालयात घेण्यात आली.

या बैठकीत राजसाहेब ठाकरे यांच्या नियोजित दौऱ्याचा कार्यक्रम व त्यानुसार पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या विभागून देण्यात आले त्यात स्वागताचे बैनेर व बाईक मिरवणूक याबाबात चर्चा करण्यात आली. त्यासाठी गावागावातील शाखापदाधिकारी यांचेकडे विशेष जबाबदारी देण्यात येऊन खांबाडा, मांगली, टेमुर्डा, येन्सा, मजरा, आनंदवन, रत्नमाला चौक , बोर्डा चौक, नंदोरी अशी बाईक मिरवणूक व त्यांनंतर भद्रावती पदाधिकारी यांच्याकडे सूत्र सोपवले जातील असे ठरले. दरम्यान खांबाडा येथे पहिले स्वागत झाल्यानंतर टेमुर्डा व त्यानंतर आनंदवन आणि रत्नमाला चौकात राजसाहेब ठाकरे यांचं स्वागत करण्याचे नियोजित करण्यात आले.

या बैठकीला मनसे जेष्ठ नेते रमेश राजूरकर, मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे जिल्हा सचिव विनोद सोनटक्के तालुका अध्यक्ष वैभव डहाने, जनहित विधी कक्ष विभाग जिल्हाध्यक्ष सुनील गुडे, जिल्हा उपाध्यक्ष रमेश कालबान्धे, जिल्हा सचिव तिवारीजी, तालुका उपाध्यक्ष प्रशांत बदकी, अरुण महल्ले, तालुका सचिव कल्पक ढोरे विभाग अध्यक्ष, राजेंद्र धाबेकर, निलेश चौधरी. राम पाचभाई, माढेळी शहर अध्यक्ष गजू वादाफळे. वरोरा शहर उपाध्यक्ष कुणाल गौरकर, महिला सेना जिल्हा उपाध्यक्षा मंदा वरखडे, वरोरा शहर अध्यक्षा पौर्णिमा शेट्टी, शहर संघटीका ज्योती मुंजे, प्रियंका पेटकर. मनविसे शहर उपाध्यक्ष सत्त्त्या मांडवकर व इतर शाखा पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here