Home वरोरा दखलपात्र :- सालोरी गावांत घरकुल घोटाळा गावकऱ्यांनीच आणला समोर.

दखलपात्र :- सालोरी गावांत घरकुल घोटाळा गावकऱ्यांनीच आणला समोर.

गावकऱ्यांना घेऊन मनसे शाखा पदाधिकारी यांनी घेतली सरपंचाची शाळा.

वरोरा प्रतिनिधी :-

तालुक्यातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या सालोरी या गावात सद्ध्या घरकुल घोटाळा व ग्रामपंचायत चा भोंगळ कारभार याबाबात गावातील नागरिक संतापले असून तीन दिवसांपूर्वी गावांत घेतलेल्या बैठकीत मनसे शाखा पदाधिकारी यांनी गावातील नागरिकाना घेऊन चक्क सरपंचाची शाळा घेतल्याची चर्चा होतं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार तीन दिवसांपूर्वी यशवंतराव चव्हाण घरकुल योजने अंतर्गत जे लाभार्थी निवडल्या गेले त्यात मोठा घोळ झाला असल्याबाबत चर्चा करण्यासाठी गांवकरी ग्रामपंचायत आवारात उपस्थित झाले त्यात महिलांचा मोठा सहभाग होता. ग्रामपंचायत सरपंच, ग्रामपंचायत चा ऑपरेटर व ग्रामपंचायत सदस्य यांच्या व जवळच्या नातेवाईकांना यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेच्या मंजूर यादीत नाव आल्याने गावकऱ्यांमधे संताप व्यक्त होतं होता कारण ज्यांना खरोखर घराची आवश्यकता आहे ज्यांची घरे पडकी आहे त्यांना घरे मिळत नाही आणि ज्यांच्या घराची चांगली अवस्था आहे त्यांना घरकुल मंजूर होते म्हणजे घरकुल लाभार्थी निवडताना सरपंच सचिव सदस्य व ग्रामपंचायत ऑपरेटर यांनी घोळ केला हे स्पष्ट होते त्यामुळे मंजूर झालेली घरे रद्द करा व ज्यांना खरोखर घरकुलाची आवश्यकता आहे त्यांना घरे द्या ही मागणी घेऊन मनसे शाखां पदाधिकारी यांनी यांनी गावकऱ्यांना घेऊन ग्रामपंचायत आवारात सरपंचाला जबाब विचारला मात्र सरपंच ग्रामपंचायत मधे बसून होते त्यामुळे संतापलेल्या लोकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली दरम्यान परिस्थिती बिघडत असल्याची माहिती मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांना मिळताच त्यांनी शेगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार मेश्राम यांना भ्रमणध्वनीवरून फोन करून सालोरी गावांत पोलीस पाठवण्याची विनंती केली व पोलीस सुद्धा तात्काळ पोहचले पण सरपंच बावणे हे जगाचे हलायला तयार नव्हते त्यामुळे परत मनसे पदाधिकारी आक्रमक झाले व सरपंचाना बाहेर काढून गावकऱ्यांना उत्तर देण्यास भाग पाडा अशी विनंती पोलिसांनी केली तेंव्हा कुठे सरपंच बाहेर आले.

ग्रामपंचायत सालोरी अंतरंग येणाऱ्या सालोरी सह खातोडा वलनी या गावाची सुद्धा वाईट स्थिती असून भर पावसाळ्याच्या दोन महिने या तिन्ही गावांत स्ट्रीट लाईट बंद होती ती स्ट्रीट लाईट मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नाने सुरू झाली पण गावात रस्ते उखडले आहे नाल्या चोकअप झाल्या आहे सगळीकडे दुर्गंधी पसरली असताना ग्रामपंचायत सरपंच किंव्हा सदस्यांनी याबाबत कुठलीही उपाययोजना केली नाही त्यामुळे मनसेच्या स्थानिक पदाधिकारी संदीप मोरे, शुभम वाकडे, रंगनाथ पवार, राजू रंदई व इतर पदाधिकाऱ्यांनी स्वखर्चाने गावांत जंतुनाशक फवारणी केली होती दरम्यान गावांत होतं असलेली अव्यवस्था व ग्रामपंचायत कामात होतं असलेला भ्रष्टाचार याबाबत गावकऱ्यांचा संताप असताना आता यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेत सुद्धा मोठा घोळ सरपंच सदस्य व काम्पुटर ऑपरेटर यांनी केल्याने यांची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी व गावकऱ्यांकडून मंजूर झालेले घरकुल रद्द करून ज्यांना घराची आवश्यकता आहे त्यांनाच घरकुल मंजूर कऱण्यासाठी ग्रामसभा घ्या अशी विनंती गावकऱ्यांनी केली मात्र अजुनपर्य ग्रामपंचायत मधे ग्रामसभेचा नोटीस लागला नसल्याने गावकरी आता संवर्ग विकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे ही मागणी करणार असल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here