Home वरोरा मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची राजूरकर यांच्या घरी सदिच्छा भेट होणार.

मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची राजूरकर यांच्या घरी सदिच्छा भेट होणार.

राजसाहेब ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात मनसेला उभारणी.

वरोरा प्रतिनिधी :-

मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्यामुळे विदर्भात मनसेला नवी उभारी मिळणार असल्याची राजकीय चर्चा आहे, त्यातच वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात मनसेचे जेष्ठ नेते रमेश राजूरकर यांनी मागील विधानसभा निवडणुकीत 35 हजार पेक्षा जास्त मतदान घेतले होते व आता त्यांचा गाव खेड्यावर वाढता जनसंपर्क बघता ही जागा मनसे जिंकेल अशी चर्चा आहे, त्यामुळे पुन्हा या विधानसभा क्षेत्रात मनसेला बळकटी येण्यासाठी स्थानिक मनसे पदाधिकारी पुढे सरसावले असून मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची वरोरा येथील राजूरकर यांच्या घरी दिनांक २० सप्टेंबरला दुपारी १.०० च्या दरम्यान होणारी सदिच्छा भेट ही निश्चितच मनसे कार्यकर्त्यांमध्ये जोश भरणारी व पक्षाला उभारणी देणारी ठरणार असल्याचे मत राजकीय वर्तुळात होतं आहे.

मागील अनेक वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे. जिल्ह्यात पक्षाची मोठी ताकत असली तरी त्यात एकवाक्यता नसल्याने ऐन निवडणुकीच्या वेळी पक्षाला पाहिजे त्याप्रमाणात यश मिळाले नाही मात्र आता वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात मनसेला रमेश राजूरकर सारखा सक्षम व संयमी नेता मिळाला असल्याने व या क्षेत्रात सगळीकडे मनसेच्या शाखा बांधणी सुरू असल्याने वरोरा भद्रावती विधानसभेत मनसेचा उमेदवार निवडून येऊ शकतो अशी परिस्थिती आहे. मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वरोरा येथील भेटीमुळे मनसे कार्यकर्त्यांत मोठा जोश बघायला मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here