Home Blog Page 396

जिल्हापरीषद शाळेचे शिक्षक – शिक्षिका रेशनच्या धान्याचे लाभार्थी

अनेक गोरगरीब धान्यापासून वंचित
समाजिक कार्यकर्ते प्रमोद खिरटकर यांची मागणी! 

नांदा फाटा :—-
प्रमोद गिरटकर कोरपना प्रतिनिधी :-

कोरपना तालुक्यातील नांदा येथील रास्तभाव दूकानात चक्क जिल्हापरीषद शाळेचे शिक्षक शिक्षिकेच्या नावावर मागील वर्षभर्‍यापासुन रेशनचे धान्य उचल करीत असल्याची माहीती समोर आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत अाहे याबाबत अन्न पुरवठा विभागाकडे तक्रार करण्यात आली असून कारवाईची मागणी होत आहे

नांदा येथील रास्तभाव दुकानाचा परवाना किसन गोन्डे यांचे नावाने असून ते स्वत: कामकाज पाहतात मागील वर्षी त्यांचे रास्त भाव दुकानाशी संलग्नीत ज्या शिधापत्रिकाधारकांचे वार्षिक उत्पन्न ५९०००/- रुपयाचे अात आहे अशा काही शिधापत्रिका अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट करण्यात आल्या यासाठी विशेष प्रपत्र तयार करुन त्यावर ग्रामपंचायतीचे सरपंचाची स्वाक्षरी घेण्यात आली होती किसन गोन्डे हे आधी अल्ट्राटेक कंपनीत नोकरीवर होते नंतर त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली त्यांचेकडे मोठ्याप्रमाणात शेती आहे त्यांचे स्वत:चे उत्पन्न लाखो रुपये आहे असे असतांना सुद्धा किसन गोन्डे यांनी स्वत:चे नावाने असलेली शिधापत्रिका अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट करवून घेतली किसन गोन्डे यांचा मुलगा विठ्ठल गोन्डे व सुन छाया गोन्डे हे दोघेही जिल्हा परीषदेच्या शाळेवर शिक्षक शिक्षिका अाहेत सद्या दोघही गोंडपिपरी पंचायत समीती अंतर्गत विठ्ठलवाडा व लगाम या शाळेवर कार्यरत आहेत सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतलेल्या माहितीतून माहिती मिळाली की किसन गोंडे हे शिक्षक शिक्षिकेच्या परीवाराचे नावावर धान्याची उचल करीत आहे एकीकडे नांदा गावातील निराधार , वंचित व गोरगरिबांची नावे अन्न सुरक्षा योजनेत नसल्याने त्यांन‍ा धान्य मिळत नाही तर दुसरीकडे शासकीय नोकरीवर असणारे अनेकजण रेशनचे धान्य उचलतात किसन गोन्डे यांनी स्वत:कडे असलेल्या रास्त भाव दुकानाच्या परवान्याचा गैरफायदा घेऊन अनेक गर्भश्रीमंत लोकांची नावे अन्नसुरक्षा योजनेत घेऊन शासनाची दिशाभूल केली असल्याचा आरोप तक्रारकर्त्यांने केला असुन शासनाने चौकशी करुन त्यांचा रास्तभाव दुकान परवाना रद्द करुन महिला बचत गटाला दुकान देण्याची मागणी केली आहेत कोरपना तालुक्याचा अन्नपुरवठा विभाग आता काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहेत

*वारंवार करताहेत काळाबाजारी*

सन २०१५ व २०१७ मध्ये धान्याचा काळाबाजार व अफरातफर केल्याने दोनदा गोन्डे यांचा परवाना रद्द केला होता आयुक्तांनी दुसर्‍यांदा संधी नाकारली किसन गोन्डे मंत्रालयातुन दुकान मिळविण्यात यशस्वी झाले मात्र त्यांनी धान्याची काळाबाजारी करण्याचा उपक्रम बंद करण्या ऐवजी सुरुच ठेवला गावातील कोणती व्यक्ती अन्नसुरक्षा योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे याची माहीती रास्तभाव दुकानदाराला असते ही माहिती अन्नपुरवठा विभागाला दिली पाहिजे पण तसे न करता स्वत:च शासकीय नोकरीवर असणार्‍यांचे नावाने धान्याची उचल करतात हि बाब समर्थनीय नसून फसवणूक करणारी आहे पुरवठा विभागाने कारवाई करायला पाहीजे
सामाजिक कार्यकर्ते प्रमोद खिरटकर
नांदा

एफ.ई एस गर्ल्स महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन कार्यक्रम सपन्न।

प्रमोद गिरटकर कोरपना प्रतिनिधी :-

फिमेल एज्युकेशन सोसायटी चंद्रपुर द्वार संचालित एफ,ई एस गर्ल्स कालेज चंद्रपुर येथील मराठी विभाग व रासेयो विभाग यांच्या सयूकत विधमाने कवी कुसुमाग्रज यांच्या जयंती चे औचित्य साधून मराठी राजभाषा दिन कार्यक्रमाचे आयोजन करणयात आले सदर कार्यक्रमचे अध्यक्ष प्राचार्य ,डॉ सरोज झजाळ तर प्रमुख अतिथि प्रा डॉ देशमुख विचार मंच वर प्रा डॉ मेघमाला मेश्राम ,प्रा डॉ राजेन्द्र बारसागडे रासेयो कार्यक्रम अधिकारी याची उपस्थित होती कार्यक्रम प्रसगी प्राचार्य डाॅ सरोज झंझाऴ मनाले कि 21वया शतकात मराठी भाषा चे संवर्धन करनें काळाची गरज आहे प्रा डॉ देशमुख मनाले कि पेशाने इंग्रजी चा प्राध्यापक आहे परंतु हा माजा व्यवसाय आहे पण मी मराठी आहे माजी मातृभाषा मराठी आहे सदर कार्यक्रम प्रसगी उठाने निबंध प्रतियोगिता वकतूतव सपधा धेणयात आले परिक्षक प्रा मालेकर प्रा,चकोर, प्रा निमगडे प्रा गडमवार हे होते या कार्यक्रम प्रसगी प्रा निमगडे यानी वि ला शिरवाऴकर यांच्या जिवनावर चित्र पीत दाखवीले कार्यक्रम चे सुत्र संचालन कु वूशाली मासकर तर आभार कु तुशना पथाडे यानी केले सदर कार्यक्रम स एवन नेवला, एकता मेश्राम, माधुरी निदेकर या विधाथीनी ने मोलाचे सहकाय केले कार्यक्रम स शिक्षक व शिक्षकतर कर्मचारियों व विधाथिनी उपस्थित होते

अखेर बलात्कारी डॉ. आकाश जीवने यांचे निलंबन,

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कर्डिले यांनी केले निलंबित ! 

कोरपणा प्रतिनिधी :-

कोरपणा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे तत्कालीन डॉ. आकाश जीवनें हे बलात्काराच्या गुन्ह्यात अडकल्या नंतर
सुद्धा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविणे चांगलेच महागात पडले असून अखेर या मुजोर डॉक्टर चे निलंबन करण्यात आले व विभागीय चौकशी व तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा बदलीचे आदेश उपसंचालक आरोग्य विभाग नागपूर यांनी दिले असल्याची माहिती आहे.

सविस्तर माहिती नुसार डॉ आकाश रामदास जीवने, वौद्यकीय अधिकारी, गट -अ (वर्ग -2)प्राथमिक आरोग्य केंद्र नारंडा, जि. चंद्रपूर यांना एका महिलेला अंघोळ करताना गुप्तपणे नग्न अवस्थेतील मोबाईलवर फोटो काढून व फिर्यादी मुलीला ब्लॅकमेल करून जबरदस्तीने वारंवार तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले व बदनामी करून सदर महिलेचे जुडलेले लग्न मोडले आशा आशयाची 28/ 13/2019 ला पोलीस स्टेशन कोरपना येथे भादंवि कलम 276,376(2)(n) व माहिती तंत्रज्ञान( सुधारणा ) अधिनियम 2008 अंतर्गत कलम 68 अन्वय 48 तासापेक्षा अधिक काल पोलीस कोठडीत स्थानबद्ध करण्यात आले होते.

त्यानंतर डॉ. जीवने यांनी आपल्या विरुद्ध या फौजदारी गुन्ह्याबतचे प्रकरण न्यायाधीन असून या 15/01/2020 पासून जमानतीवर असून 17 /01/2020 पासून रुजू होण्यास प्रकरणाबाबत 17/01/2020 लाच वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र देऊन विनंती अर्ज सादर केला होता.

परंतु, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर, श्री.राहूल कर्डीले यांनी महाराष्ट्र नागरी सेवा( शिस्त व अपील ) नियम 1979 मधील भाग 1 सवसाधारण (4) निलंबन (2) (अ) या शासन निर्णयातील तरतुदीनुसार डॉ. जिवने यांचे गैरशिस्त वर्तणूक संबंधाने त्यांचेविरुद्ध शिस्तभंग विषयक कार्यवाही करत त्यांची नारंडा येथून पदस्थापना आरोग्य विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर येथे तात्काळ अंमलबजावणी स्वरूपाने आदेश क्रमांक /आरोग्य /स्था-1/1213/2020 दिनांक 12/02/2020 रोजी आदेश पारित केले होते.

परंतु या आदेशाला केराची टोपली दाखवत डॉ. जीवने यांनी आदेश मिळाला नसल्याची बतावणी करीत अधिकाऱ्यांविरुद्ध मुजोरी सत्र सुरु केले होते. सादर गैरवर्तणुकीची गंभीर दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर, श्री.राहूल कर्डीले यांनी प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, (सेवा -4ब ),मंत्रालय मुंबई यांना पत्र देऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती दिल्यानंतर डॉ. एस. के. जयस्वाल, उपसंचालक, आरोग्य सेवा, नागपूर मंडळ यांच्या मार्फत डॉ. जीवने यांच्या 28/12/2020 पासून निलंबनाचे आदेश पारित केले असून विभागीय चौकशी चालू करण्यात येऊन चौकशी सुरु असेपर्यंत त्यांची नारंडा येथून थेट जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे बदली करण्यात आली आहे.

तात्काळ स्वरूपात डॉ. जिवने यांच्यावर विभागीय चौकशी बसविण्यात आली असून या संबंधात संपूर्ण चौकशी अहवाल सादर करण्याचा आदेशही आरोग्य सेवा आयुक्त श्री. विश्वास कुमावत यांनी उपसंचालक, नागपूर यांना दिले आहेत.

त्यानतंर विषेश म्हणजे उपसंचालकांनी दिलेल्या निलंबन व बदली याही आदेशाची अहवेलना होऊ नये म्हणून आदेश पोहोचताच आदेशाची पोचपावती लेखी स्वरूपात 3 प्रतीत जिल्हा आरोग्य अधिकारी, चंद्रपूर यांचेमार्फत कार्यालयात सादर करण्याचेही वेगळे पत्र काढून उपसंचालक आरोग्य विभाग नागपूर यांनी दिले आहेत.

चंद्रपूर-यवतमाळ जिल्ह्यातील सर्व कोळसा टाल व वे -ब्रिज पोलिसांच्या रडारवर ?

कोळसा चोरी प्रकरण:

सबसिडीचा कोळसा खाजगी कोळसा टालवर आणि तिथून विक्री खुल्या मार्केटमधे? दररोज कोट्यावधीची उलाढाल !

चंद्रपूर :-

सबसिडीचा कोळसा ज्या खाजगी कंपन्यांना सरळ वेकोलि कोळसा खाणीतून मिळत असतो तो कोळसा यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील खाजगी कोळसा टालवर नेण्यात येऊन तिथून तो कोळसा खुल्या मार्केटमधे जादा भावाने विकल्या जात होता व कोट्यावधी रुपयाची हेराफेरी केल्या जात होती, त्याचा नुकताच दिनांक १७ फेब्रुवारीला भंडाफोड झाल्याने वेकोलि ते खाजगी किंव्हा सरकारी कंपन्या यामधील एजंट असलेले कोळसा दलाल आता पोलिसांच्या तावडीत सापडले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ऐकून ३० कोळसा टाल असून यवतमाळ जिल्ह्यात ऐकून १५ कोळसा टाल आहे, त्यापैकी बहुतांश कोळसा टाल हे बेकायदेशीर आहे, शिवाय या कोळसा टाल शेजारी जे मोठमोठे वे-ब्रिज लावले आहे ते सुद्धा बेकायदेशीर आहे, अर्थात या कोळसा टालवर येणारे कोळशाचे ट्रक सुद्धा बेकायदेशीर असल्याचे निष्पन्न होते.त्यामुळे कोळशाच्या या वाहतूक आणि विक्री संदर्भात कोळसा माफियांची संबंधीत कंपन्यांच्या संचालकांसोबत साठगाठ असल्यामुळे शासनाच्या राष्ट्रीय संपत्तीची एक प्रकारे सामूहिक चोरी केल्या जात असल्याचा गंभीर प्रकार चंद्रपूर तालुक्यातील नागाडा येथील कोळसा टालवर पकडलेल्या कोळसा ट्रक गाड्यामुळे उघडकीस आला आहे. या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कोकाटे व त्यांचे सहाय्यक अधिकारी बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोळसा चोरीचे गंभीर प्रकरण चौकशीत असून यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व कोळसा टाल व त्याला लागून असणाऱ्या वे-ब्रिज संचालकांची सुद्धा कसून पोलिस चौकशी होणार असल्याची माहिती आहे.त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील अनधिकृतपणे चालणारे कोळसा टाल हे पोलिसांच्या राडारवर असल्याचे बोलल्या जात आहे.