Home Blog Page 395

ब्रेकिंग न्यूज :- होळीच्या उत्सवाला येणारी ४२ लाखांची  दारू पडोली पोलिसानी पकडली,

आतपर्यंतची पडोली पोलिस स्टेशन अंतर्गत मोठी कारवाई, ट्रक फेल झाल्याने डाव फसला,

चंद्रपूर प्रतिनिधी :-

येणाऱ्या होळी च्या उत्सवाला दारूची मोठ्या प्रमाणात होणारी मागणी पूर्ण करण्यासाठी दारू माफियांनी अनेक क्लुप्त्या लढवून लाखों रुपयाची दारू चंद्रपूर जिल्ह्यात आणण्याची कवायद सुरू केली असली तरी पोलिस अधिक्षक मोहेश्वर रेड्डी यांनी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केल्याने व पोलिसांची गस्त वाढविल्याने दारू माफियांच्या मनसुब्यावर पाणी फेरल्या जात आहे.अशीच एक दारू माफियांची कवायद फसली असून पडोली पोलिसांच्या सतर्कतेने जवळपास ४०० पेक्षा जास्त दारूच्या पेट्या भरलेला ट्रक पकडल्या गेला आहे. विशेष म्हणजे ऐन पडोली हद्दीत हा ट्रक फेल झाल्याने मोठ्या प्रमाणात दारू साठ पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या ट्रक मधे ४२० देशी दारूच्या पेट्या पकडल्या गेल्या असून याची किमत ४२ लाख रुपये सांगण्यात येत आहे. ही कारवाई काल रात्री २,०० वाजता करण्यात आली असून युसूफ अन्सारी नावाच्या ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे.
या संदर्भात उपविभागीय पोलिस अधिकारी नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गाईबोले यांनी तपासाची सूत्रे हाती घेऊन कारवाई सुरू केली आहे.

गडचांदूर मधील वनपरिक्षेत्र उपविभागीय कार्यालयात एमएसईबीची धाड,

एलेक्ट्रिक चोरी प्रकरण :-

इलेक्ट्रिक चोरी प्रकरणात वनपरिक्षेत्र कार्यालयावर ७० हजारांचा दंड,

गडचांदूर प्रतिनिधी :-

गडचांदूर येथील वनपरिक्षेत्र कार्यालय म्हणजे जणू नेहमीच शुकशुकाट असलेले कार्यालय आहे. कारण इथे कर्मचाऱ्यांची संख्या अतिशय तोगडी असल्याने व वनपरिक्षेत्र अधिकारी हे बहुदा मिटींग आणि दौरे यामुळे ते नेहमीच फिल्डवर्क मधे व्यस्त असल्यामुळे या वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर चार जनांनी अतिक्रमण केले आहे. प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर या वनविभागाच्या कार्यालयातील एलेक्ट्रिक मीटर मधून लाईन घेतल्याचे  एमएसईबी अधिकाऱ्यांनी धाड टाकून केलेल्या कारवाईतून निष्पन्न झाले आहे.
शासनाच्या कार्यालयाच्या इलेक्ट्रिक मीटरमधून विजेचे

कनेक्शन खाजगी दुकानदारा देवून वनविभागाच्या इलेक्ट्रिकचा वापर गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याचे दिसत आहे. एमएसईबीने वनविभागाच्या या  कार्यालयावर धाड टाकून तब्बल ७० रुपयाची दंड आकारणी करण्यात आली आहे, या दुकानदारांमधे सय्यद परवेज, शेख शाहरुख, श्रीराम सठोणे, बालाजी टराले सय्यद हबीब ह्या  चार लोकांनो अतिक्रमण करून महाराष्ट्र शासनाच्या मीटर वरून लाईट घेतल्याने 70000 वनपरिक्षेत्रात अधिकारी ब्रम्हटेके यांना एमएसईबी ने दंड लावल्याने आता हा दंड वनविभाग भरेल की पुन्हा दुकानदार हे पाहणे औस्तूक्याचे ठरणार आहे.

अखेर प्रकल्पग्रस्तांना मिळाला न्याय, 16 मार्च पासून करारनामे सुरु, 

प्रमोद गिरटकर कोरपना प्रतिनिधी :

धोपताळा ug to oc या नविन प्रकल्पा करीता गेल्या पांच वर्षा पासून समस्त शेतकरी बाँधवातर्फे आंदोलने, मोर्चे, निवेदन दिले गेले,  मात्र वेकोलि बल्लारपुर क्षेत्राअंतर्गत जाणीव पूर्वक प्रकल्पग्रस्तांना नौकरीवर घेण्यास विलम्ब करीत होते. त्या अनुशगाने दि. 2.3.2020 पासून G. M. ऑफिस समोर धरणे आंदोलन पुकारले होते आणि मार्च महिन्याचे उत्पादन ठप्प करण्याची धमकी दिली होती त्यामुळेच  दि 3.3.2020 ला सकाळी 10.30am ला मा. तहसीलदार यांचे दालनात मीटिंग आयोजित केली आणि तहसीलदार च्या समक्ष अखेंर 16 मार्च पासून वेकोलि प्रशासनाने करार नामे सुरु करण्याचे लेखी आश्वासन दिले त्यामुळे समस्त शेतकरी वर्गात उत्साहांचे वातावरण झाले या वेळी प्रकल्प ग्रस्ताचे अध्यक्ष विजय चन्ने यांचेसह  विलास घटे बालू जुलमे सतीश बनकर विनोद बनकर दीपक खनके राकेश घटे पंकज देरकर गणेश पोतराजे प्रकाश चने संजय बेले दिनेश वैरागडे राजू मोहारे सुभाष पोतराजे बालाजी पिम्पलकर दिलीप प्रमोद गिरटकर नरड.देवराव चन्ने हे उपस्थित होते

ब्रेकिंग न्यूज :- कोळसा माफिया गैंगचा वारीस दरगाई खान यांच्यावर जीवघेणा हमला,

क्राईम स्टोरी :-

घूग्गूस पोलिस स्टेशन मधे कोळसा गैंगच्या भीम बिल्डर वर गुन्हा दाखल, सुरक्षा रक्षक कौशल सिंह व वैभव निमकर यांच्यावर झालेल्या हमल्यानंतर पुन्हा एक हमला झाल्याने वेकोलि परिसरात सन्नाटा,

चंद्रपूर प्रतिनिधी :-

कोळसा माफियांनी वेकोलि कोळसा खाणी ह्या बिहार तंत्राचा वापर करून काबीज केल्याचे चित्र असून दिवसेंदिवस कोळसा माफियांच्या ह्या गुंडाराजाने सर्वसामान्य व्यक्ती हा भयभीत झाला असल्याचे विदारक चित्र वेकोलि कोळसा खान परिसरात निर्माण झाले आहे. एवढेच नव्हे तर वेकोलि अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर दबावतंत्राचा वापर करून प्रसंगी त्यांचेवर हमला करून कोळसा माफिया गुंडाची टोळी हीच कैलास अग्रवाल आणि त्यांच्या सहकारी ट्रान्सपोर्टर साठी काम करीत असल्याचे बोलल्या जात आहे. काल दिनांक २ फेब्रुवारीला वैभव निमकर यांचेवर कोळसा माफिया गैंगने हमला केला त्याचे आरोपी अजून सापडले नसतांना आता पुन्हा त्याचं गैंग च्या भीम बिल्डरने हमला करून वारीस खान वर प्राणघातक हमला करून जबर जखमी केल्याने घूग्गूस परिसर हे गुंडागर्दीचे माहेरघर बनले असल्याचे चित्र निर्माण होत आहे, त्यामुळे पोलिस प्रशासनाने या परिसरात कडक बंदोबस्त करून कोळसा माफियांसोबत असलेल्या गुंडाना ठेचून काढणे महत्वाचे झाले आहे. मूळच्या घूग्गूस येथील शास्त्री नगर मधे राहणाऱ्या वारीस खान यांचेवर भीम बिल्डर नामक गुंडानी ट्रक पार्किंगच्या शुल्लक कारणावरून नायगाव चेक पोस्ट येथे मारहाण करून त्याला घूग्गूस येथे आणले व इथे सुद्धा डोक्यावर वार केला असल्याने त्याला घूग्गूस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ नेण्यात आले आहे. व्रुत्त लिहित पर्यंत गुन्हा नोंद करावयाची प्रक्रिया सुरू होती.

ब्रेकिंग न्यूज :-पुन्हा वेकोलि सुरक्षा रक्षक कौशल सिंह प्रमाणे वैभव निमकर यांचेवर प्राणघातक हमला,

कोळसा चोरी प्रकरण :-

कौशल सिंह या सुरक्षा रक्षकांवर झाला होता हमला, त्यातील सहा आरोपी अजूनही फरार, कोळसा तस्कर पुन्हा सक्रिय, घूग्गूस पोलिस स्टेशन मधे गुन्हे दाखल!

चंद्रपूर प्रतिनिधी :

एकीकडे पैनगंगा कोळसा खाणीतील सुरक्षा रक्षक कौशल सिंह यांच्यावर झालेल्या हमल्याची शाई वाळते न वाळते तोच पुन्हा एका वैभव निमकर नावाच्या वेकोलि सुरक्षा रक्षकावर घूग्गूस येथील बँकर जवळ प्राणघातक हमला काल दिनांक २ मार्चला सायंकाळी ४,१५ वाजता झाल्याने कोळशाच्या या धंद्यात बिहारी गुंडाराज सुरू असल्याने या संदर्भात पोलिसांनी कडक पावले उचलण्याची आवशकता आहे.
केवळ सबसिडीचाच कोळसा चोरी केल्या जात नाही तर वेकोलि अधिकाऱ्यांना धमकावून खुलेआम कोळसा खाणीतून आणि कोळसा सायडिंग कोळसा चोरी सुद्धा केल्या जात असतो, त्यामुळे आपली गाडी कोळसा भरण्यासाठी आगोदर लागावी याकरिता काही गुंड सक्रिय असून जर त्यांच्या मतानुसार अधिकारी किंव्हा सुरक्षा रक्षक ऐकले नाही तर त्यांच्यावर हमला करण्यात येतो अशाच माफियांद्वारे मागील वर्षीच्या सप्टेंबर मधे पैनगंगा वेकोलि कोळसा खाणीतून कोळसा लुटीची घटना घडली होती.त्यामधे बेलोरा टी पॉईंट स्थळावर दिवसाढवळ्या कोल माफियांनी बंदूकीच्या नोकवर २० ते २५ लोकांना धमकावले होते. शिवाय पैनगंगा वेकोलितील कौशल सिंह नामक सुरक्षा रक्षकावर तब्बल १२ असामाजिक तत्वांच्या लोकांनी हमला करून गंभीर जखमी केले होते, यामधे ऐकून १२ आरोपी विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते पण अजूनही सहा आरोपी त्या प्रकऱणामधे फरार आहे.
एका महिन्याच्या अंतरात तब्बल दोन गंभीर हमले वेकोलि सुरक्षा रक्षकावर कोळसा माफियांनी केल्यामुळे व नागाडा कोळसा टाल मधे २६ चोरीचा कोळसा वाहतूक करणारे ट्रक पकडल्या गेले असल्याने कोळसा माफिया चंद्रपूर जिल्हाचा बिहार करीत आहे की काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कौशल सिंह यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील आरोपी सह सुरक्षा रक्षक वैभव निमकर यांच्यावर झालेल्या हमल्यातील आरोपींना तत्काळ अटक करून पोलिसांनी या गुंड कोळसा माफियांवर जिल्हाबंदी करावी अशी मागणी आता जोर पकडू लागली आहे.

शेवटी रेती तस्कर आणि पोलिस प्रशासनाने डाव साधला, पत्रकारांना तक्रार मागे घेण्यासाठी खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची दिली धमकी ?

रेती चोरी प्रकरण :-

पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह ? एक रेती तस्कर बोलतो यामावार साहेब आम्हचे सोबत ! 

गडचांदूर प्रतिनिधी :-

कायद्याचे रक्षकच कसे भक्षक असतात याचे मुर्तिवन्त उदाहरण नुकतेच प्रकाशात आले आहे. गडचांदूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रेतीघाटातून बेकायदेशीर रेती तस्करी खुलेआम होत असतांना व जिथे तहसीलदार आणि पोलिस प्रशासन अंध बहीर आणि गुंग झालं असतांना पत्रकारांनी राष्ट्रीय संपत्तीची जी चोरी होते आहे त्याचा भांडाफोड करण्यासाठी  प्रत्यक्ष रेती घाटावर जावून फोटो आणि विडिओ घेतले असता त्यांच्यावरच रेती तस्करानी प्राणघातक हल्ला करून एका हस्तक आडनावाच्या पत्रकाराचा वायरने गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला तर दोन पत्रकारांना धक्काबुक्की करून त्यांच्या गाडीची हवा सोडली आणि गाडीतील पेट्रोल सुद्धा काढले, या संदर्भात पत्रकारांनी पोलिस स्टेशन मधे संपर्क करून पोलिसांची मदत मागितली मात्र अगोदरच पोलिसांची रेती माफियांसोबत साठगांठ असल्याने रेती माफियांवर गुन्हे दाखल होऊ नये याकरिता रेती माफियांना सुद्धा पत्रकारांविरोधात तक्रार दाखल करण्याचा सल्ला पोलिसांनीच दिला होता. इकडे पत्रकारांनी जिल्हा पोलिस अधिक्षक रेड्डी यांना भ्रमणध्वनीवर या प्रकरणाची माहिती दिल्याने त्यांच्या दबावामुळे कसे तरी पोलिस निरीक्षक भारती तय्यार झाले खरे पण उपविभागीय पोलिस अधिकारी यामावार यांच्यासोबत सल्लामसलत झाल्यानंतर हे प्रकरण इथेच थांबवण्यासाठी एका पत्रकाराला व ज्या पत्रकारावर जीवघेणा हमला झाला त्याला पोलिसांनी धमकावून तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला आणि शेवटी जणू आपसात समझोता झाल्याचे चित्र उभे करण्यात आले. विशेष म्हणजे एका रेती तस्करानी उपविभागीय पोलिस अधिकारी आम्हचे सोबत असल्याचे पत्रकारांशी बोलल्यामुळे रेती तस्कर आणि पोलिस प्रशासन चोर शिपायाचा कसा खेळ खेळतात हे दिसून येते,
आवारपूर परिसरातील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात यामावार हे जणू पोलिस महासंचालक असल्याचा आव आणतात, तिथे जाणारे अभ्यागताना सुद्धा जणू आरोपी असल्यागत खालून वरपर्यंत तपासले जाते मात्र त्याचं आवारपूर परिसरात उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या अगदी हाकेच्या अंतरावर खुलेआम दारू विकल्या जाते, तिथे यांची शिस्त कुठे जाते हे कळत नाही, इकडे राष्ट्रीय संपत्तीची खुलेआम तस्करी होतं असतांना त्यांना हे जणू क्लीनचिट देतात मग यांचा “सदरक्षणाय खलनिग्रहनाय” हा धर्म जातो कुठे ? हा प्रश्न पडतो. यामधे पोलिस निरीक्षक भारती सुद्धा बरोबरचे भागीदार आहेतच कारण त्यांनी पोलिस स्टेशनचे सर्व सूत्र स्वतःकडे ठेवून सर्व अवैध व्यावसायिकांसोबत साठगांठ केली असल्याची चर्चा आहे.पोलिस कल्याण निधी करिता आयोजित आर्केस्ट्रा करिता सर्वात मोठी रक्कम जमविण्याऱ्या पोलिस निरीक्षक भारती यांचा सन्मान व्हायलाच हवा पण ही रक्कम नेमकी कुणाकडून जमवली याची माहिती काढली तर सिमेंट कंपन्या सोडून बहुतांश रक्कम ही अवैध व्यावसायिक यांचेकडून जमविल्याचे बोलल्या जात आहे, एकूणच पोलिस प्रशासनाकडून अवैध धंदेवाल्यांना संरक्षण मिळत असल्याने राष्ट्रीय संपत्तीची खुलेआम लूट सुरू आहे , मात्र या विरोधात आवाज उठविणाऱ्या पत्रकारांनाच गुन्ह्यात फसवीण्याचे छडयंत्र पोलिस अधिकारी करीत असेल तर पोलिस प्रशासन देशद्रोह करीत आहे, हे वरील प्रकरणातून दिसून येते.

ब्रेकिंग न्यूज :-कोल माफिया कैलास अग्रवालचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयात, दोन कोळसा तस्कर टोळीचा आपसात ग्यांगवॉर?

कोळसा चोरी प्रकरण :

सत्तूरने हमला केल्याने एक गंभीर जखमी तर तिघांना साधारण मार, कैलास अग्रवालचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयात दाखल, पोलिसांच्या कारवाईकडे प्रसारमाध्यमांचे लक्ष !

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर तालुक्यातील नागाडा कोळसा टाल वरून कोळशाचे पकडलेले २६ ट्रक आणि तिघांवर दाखल केलेले गुन्हे इथपर्यंत प्रकरण सर्वांना माहीत आहे, पण हे प्रकरण त्याहीपेक्षा भयंकर असून कोळशाच्या या व्यवसायात गुंड प्रवृत्तीचे लोक कैलास अग्रवाल यांच्याकडे मोठ्या प्रमाणात असल्याने या कोळसा कांड प्रकरणात अग्रवालच्या दोन गुटात व्यवसायावरून धारदार शस्त्राने टोळीयुद्ध रंगले असून यामधे ट्रान्सपोर्ट युनियनचे सचिव गंभीर जखमी असल्याचे बोलल्या जात आहे, मात्र हे प्रकरण वाढू नये व कुणावरही गुन्हे दाखल होऊ नये याकरिता हे प्रकरण दडपण्याच्या प्रयत्नात अग्रवाल बंधु असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
नुकतेच सोमवार १ मार्च २०२० ला कोळसा चोरीच्या व्यवसायीक वादावरून ट्रक मालकांमध्ये जिवघेणे टोळीयुद्ध घडले. यामधे कोळसा माफिया अग्रवाल बंधु असल्याचे बोलल्या जात आहे, या प्रकरणाची तक्रार होऊ नये, यासाठी अग्रवाल प्रयत्नात होते मात्र पोलिस विभागानी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन पुढील तपास केल्यास कोळसा चोरी प्रकरणाचे खोलवर आणखी धागेदोरे हाती लागु शकेल अशी शक्यता असतांना हे प्रकरण शेवटी आपसात मिटविण्यात आल्याचे कळते.

नुकतेच नागाडा येथे घडलेले कोळसा चोरी प्रकरण राज्यात गाजत असतांना आता कैलास अग्रवालच्या अधिनस्त असलेल्या ट्रान्सपोर्ट युनियनच्या सचीवावर झालेला सत्तूरने प्राणघातक हमला ही बाब पोलिसांनी अतिशय गांभीर्याने घ्यायला हवी होती कारण अगोदरच या कोळसा चोरी प्रकरणात तक्रारदार नाही म्हणून कारवाईसाठी महाराष्ट्र स्टेट मायनिंगच्या अधिकाऱ्यांना समोर करून व कोळसा माफियांच्या दबावाला बळी न पडता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कोकाटे आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक बोबडे यांनी कोळसा माफियांवर भा.द.वी कलम 464,465, 468,471,420, 34 आयपीसी अंतर्गत गुन्हे दाखल केले.

चंद्रपूर न्यायालयात  कैलास अग्रवाल व इतरांचा अटकपूर्व जामीन अर्ज निकालाच्या प्रतीक्षेत ?

कैलास अग्रवाल आणि त्यांच्या सहकारी ट्रान्सपोर्टरवर दाखल केलेल्या गुन्ह्यात स्थानिक चंद्रपूर न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज आरोपींनी दाखल केला आहे, या जामीन अर्जावर न्यायालयाने अजून निकाल दिला नसला तरी तो जामीन अर्ज न्यायालयाकडून फेटाळला जाण्याची शक्यता जास्त आहे, त्यामुळे शेवटी आरोपींना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागेल असे चित्र आहे.

कैलास अग्रवाल यांची चोरीच्या कोळशाची वाहतूक सुरूच ?

नागाडा कोळसा चोरी प्रकरणात काही ट्रान्सपोर्ट धारकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला, त्यांचे मोक्यावरील ट्रक ही ताब्यात घेतले. पण अजूनही अग्रवाल बंधूच्या आशिर्वादाने व संगनमताने हा व्यवसाय सुरूच असून ज्या ट्रक (ट्रान्सपोर्ट) मालकांवर गुन्हे दाखल झाले असल्याचा लाभ घेऊन या  प्रकरणाला अन्य मार्गाने भटकविण्यात यश मिळविले असल्याचे दिसत आहे. कारण ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत ते ट्रक (ट्रान्सपोर्ट) चालक आजही सुरळीतपणे आपला व्यवसाय करीत आहेत. हाती आलेल्या सुत्रांनुसार आजच्या स्थितीत पद्मापूर, डी.आर.सी. या खाणीतून मोठ्या प्रमाणात अग्रवाल यांचा चोरीचा कोळसा वाहतूक केल्या जात आहे. ज्या युनियनचे व मालकांचे ट्रक यापुर्वी पोलिसांनी पकडले होते, तेच ट्रक मालक अग्रवाल यांच्या इशाऱ्यावर जोमाने पुन्हा यात सक्रीय झालेले आहेत.

मिळालेल्या विश्र्वसनीय सुत्रानुसार, नागाडा येथे ज्या नोंदणीकृत ट्रान्सपोर्ट कंपनी चे ट्रक पकडले गेले व त्यांच्यावर पोलिस कारवाई करण्यात आली व जे ट्रान्सपोर्टर कैलास अग्रवाल यांच्या इशाऱ्यावर कोळसा चोरी करीत आहे, त्याच दोन गुटामध्ये चोरीचा कोळसा वाहतुकीवरून नुकतीच धारदार हत्याराने गंभीर स्वरूपाची हाणामारी झाली. यात ट्रान्सपोर्ट कंपनी चा सचिव गंभीररित्या जखमी झाला असून प्रकरण वाढू नये यासाठी अग्रवाल यांनी मध्यस्थी केल्याचे बोलल्या जात आहे.

कैलास अग्रवाल सहित तीन कोळसा माफियां अजूनही फरार ?

कोळसा चोरी प्रकरण :-

महाराष्ट्र स्टेट मायनिंग कॉर्पोरेशन संशयाच्या घेऱ्यात ? 

चंद्रपूर प्रतिनिधी :–

चंद्रपूर तालुक्यातील नागाडा कोळसा टालवर पकडलेल्या २४ ट्रकांची सुरक्षा पोलिसांच्या हाती असून या प्रकऱणामधे कोळसा माफिया कैलास अग्रवाल सह इतर दोन आरोपी अजूनही फरार आहे.मात्र पोलिसांना दिवसरात्र ह्या कोळसा ट्रकांची सुरक्षा करण्यास लावून जो वेळ घालवला आहे व आरोपींना वेळ मिळत आहे त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणात आरोपींना लवकरात लवकर जेरबंद करणे आवशक झाले आहे.
चंद्रपूर जिल्ह्याच्या इतिहातिल सर्वात मोठे कोळसा चोरी रैकेट महाराष्ट्र स्टेट मायनिंग कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माध्यमातून कोळसा माफिया मागील अनेक वर्षांपासून चालवीत असून अखेर हे कोळसा चोरी रैकेट पोलिसांनी उघड करून देशाच्या संपत्तीची चोरी करणाऱ्या कोळसा माफियांवर गुन्हे दाखल केले आहे. परंतु या प्रकऱणामधे महाराष्ट्र स्टेट मायनिंग कॉर्पोरेशन लिमिटेडचे संचालक व अधिकारी गुंतले असल्याची शक्यता असल्याने या प्रकरणाची चौकशी सीबीआय द्वारे करण्याची मागणी आता जोर पकडू लागली आहे, महाराष्ट्र स्टेट मायनिंग कॉर्पोरेशन ही कंपनी खरं तर शासनाची फसवणूक करीत असून वेकोलिप्रशासनाला सुद्धा मूर्ख बनवित आहे. केवळ चंद्रपूर जिल्ह्यातच नव्हे तर यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यातील वेकोली कोळसा खाणीतून सबसिडीचा कोळसा बंद झालेल्या विविध कंपन्याच्या नावावर उचल करायचा आणि तो कोळसा माफियांच्या माध्यमांतून खुल्या मार्केट मधे विकून कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार करायचा हा धंदा गेल्या अनेक वर्षांपासून राजरोसपणे सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांनी खोलात जावून तपास करणे आवश्यक  आहे.

कैलास अग्रवाल सहित तीन कोळसा माफियां अजूनही फरार ?

जब्त झालेल्या कोळसा ट्रकांची विल्हेवाट लागणार कधी ? कोळसा ट्रकांची सुरक्षा करणाऱ्या पोलिसांची ससेहोलपट,

चंद्रपूर प्रतिनिधी :

चंद्रपूर तालुक्यातील नागाडा कोळसा टालवर पकडलेल्या २४ ट्रकांची सुरक्षा पोलिसांच्या हाती असून या प्रकऱणामधे कोळसा माफिया कैलास अग्रवाल सह इतर दोन आरोपी अजूनही फरार आहे.मात्र पोलिसांना दिवसरात्र ह्या कोळसा ट्रकांची सुरक्षा करण्यास लावून जो वेळ घालवला आहे व आरोपींना वेळ मिळत त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणात आरोपींना लवकरात लवकर जेरबंद करणे आवशक झाले आहे.
चंद्रपूर जिल्ह्याच्या इतिहातिल सर्वात मोठे कोळसा चोरी रैकेट महाराष्ट्र स्टेट मायनिंग कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माध्यमातून कोळसा माफिया मागील अनेक वर्षांपासून चालवीत असून अखेर हे कोळसा चोरी रैकेट पोलिसांनी उघड करून देशाच्या संपत्तीची चोरी करणाऱ्या कोळसा माफियांवर गुन्हे दाखल केले आहे. परंतु या प्रकऱणामधे महाराष्ट्र स्टेट मायनिंग कॉर्पोरेशन लिमिटेडचे संचालक व अधिकारी गुंतले असल्याची शक्यता असल्याने या प्रकरणाची चौकशी सीबीआय द्वारे करण्याची मागणी आता जोर पकडू लागली आहे, महाराष्ट्र स्टेट मायनिंग कॉर्पोरेशन ही कंपनी खरं तर शासनाची फसवणूक करीत असून वेकोलिप्रशासनाला सुद्धा मूर्ख बनवित आहे. केवळ चंद्रपूर जिल्ह्यातच नव्हे तर यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यातील वेकोली कोळसा खाणीतून सबसिडीचा कोळसा बंद झालेल्या विविध कंपन्याच्या नावावर उचल करायचा आणि तो कोळसा माफियांच्या माध्यमांतून खुल्या मार्केट मधे विकून कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार करायचा हा धंदा गेल्या अनेक वर्षांपासून राजरोसपणे सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांनी खोलात जावून तपास करणे आवशक आहे.

ब्रेकिंग न्यूज :- रेती माफियांनी केला पत्रकारांवर प्राणघातक हमला,

रेती तस्करामधे अरुण रागीट, रमेश रागीट, संजय खेवले, लीलाधर चटप, काशिनाथ शेटे, राजेंद्र खेडेकर इत्यादींचा समावेश. पोलिस निरीक्षक आणि उपविभागीय पोलिस अधिकारी रेती तस्करावर कारवाई करतील कां ? याबाबत प्रश्नचिन्ह, पत्रकार सरक्षण अधिनियम २०१७ अंतर्गत कारवाई करण्याची मागणी.

कोरपणा प्रतिनिधी :-

तालुक्यातील वर्धा नदीच्या एका लिलाव न झालेल्या रेती घाटावरून रेती तस्करी मोठ्या प्रमाणात होत असून या रेती घाटा वरून अरुण रागीट, रमेश रागीट, संजय खेवले, लीलाधर चटप, काशिनाथ शेटे, राजेंद्र खेडेकर इत्यादी रेती तस्कर दररोज शेकडो टन रेती चोरत असल्याचा गंभीर प्रकार राजरोसपणे सुरू होता, नव्हे या रेती माफियांना प्रशासनाने खुली सूट दिली होती. मात्र या गंभीर प्रकारची पोलखोल करण्यासाठी तीन जॉबाज पत्रकारांनी व्रुत्तसंकलन करण्याकरता मौका चौकशीसाठी रेती घाटावर पाहणी केली असता रेती घाटावर मोठं मोठे खड्डे निर्माण करून रेती तस्करानी मोठ्या प्रमाणात रेती तस्करी केली असल्याचे चित्र होते. मात्र व्रुतसंकलन करणाऱ्या तीन पत्रकारांवर रेती माफियांनी अचानक प्राणघातक हमला केला व एका पत्रकारांचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, या अकस्मात झालेल्या हल्ल्यामुळे पत्रकारांनी स्थानिक पोलिस स्टेशनमधे फोन केला, मात्र पोलिसांनी पाहिजे ती तत्परता न दाखवता जाण्यास उशीर केला आणि रेती तस्कराना एक प्रकारे उलट तक्रार करण्याची संधी दिली , यावरून पोलिस प्रशासन सुद्धा या रेती माफियांकडून हप्ता घेत असेल असा संशय येत आहे.
विशेष म्हणजे एवढे मोठे प्रकरण घडले असतांना पोलिस निरीक्षक गोपाल भारती हे वेगळ्या कार्यक्रमात व्यस्त असल्याचे बोलल्या जात असून उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार यांना एका पत्रकारांनी याबाबत विचारले असता त्यांनी उलट तूम्हचे पत्रकारच त्या रेती माफियांना खंडणी मागायला गेले होते असे सांगून आपण सुद्धा त्या रेती माफियांसोबत असल्याचे दाखवून दिले.खरं तर एवढ्या मोठ्या रेती तस्करीतून शासनाचा महसूल बुडत असतांना तहसीलदार तर गप्प आहेच पण पोलिस प्रशासन सुद्धा बघ्यांची भूमिका घेत असतांना पत्रकार ही बाब उघड करण्यासाठी रेती घाटावर गेले असता त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात जर पोलिस पकडत असतील तर सर्वसामान्य जनतेवर पोलिस प्रशासन किती अन्याय करीत असेल ? हे स्पष्ट होत आहे. मात्र पत्रकार सरक्षण अधिनियम २०१७ अंतर्गत रेती माफियांवर गंभीर गुन्हे दाखल करावे अशी मागणी विविध पत्रकार संघटने कडून होत आहे. सदर व्रुत्त प्रकाशित होईस्तोवर कुणावरही गुन्हे दाखल झाले नव्हते.