Home चंद्रपूर ब्रेकिंग न्यूज :- होळीच्या उत्सवाला येणारी ४२ लाखांची  दारू पडोली पोलिसानी पकडली,

ब्रेकिंग न्यूज :- होळीच्या उत्सवाला येणारी ४२ लाखांची  दारू पडोली पोलिसानी पकडली,

आतपर्यंतची पडोली पोलिस स्टेशन अंतर्गत मोठी कारवाई, ट्रक फेल झाल्याने डाव फसला,

चंद्रपूर प्रतिनिधी :-

येणाऱ्या होळी च्या उत्सवाला दारूची मोठ्या प्रमाणात होणारी मागणी पूर्ण करण्यासाठी दारू माफियांनी अनेक क्लुप्त्या लढवून लाखों रुपयाची दारू चंद्रपूर जिल्ह्यात आणण्याची कवायद सुरू केली असली तरी पोलिस अधिक्षक मोहेश्वर रेड्डी यांनी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केल्याने व पोलिसांची गस्त वाढविल्याने दारू माफियांच्या मनसुब्यावर पाणी फेरल्या जात आहे.अशीच एक दारू माफियांची कवायद फसली असून पडोली पोलिसांच्या सतर्कतेने जवळपास ४०० पेक्षा जास्त दारूच्या पेट्या भरलेला ट्रक पकडल्या गेला आहे. विशेष म्हणजे ऐन पडोली हद्दीत हा ट्रक फेल झाल्याने मोठ्या प्रमाणात दारू साठ पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या ट्रक मधे ४२० देशी दारूच्या पेट्या पकडल्या गेल्या असून याची किमत ४२ लाख रुपये सांगण्यात येत आहे. ही कारवाई काल रात्री २,०० वाजता करण्यात आली असून युसूफ अन्सारी नावाच्या ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे.
या संदर्भात उपविभागीय पोलिस अधिकारी नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गाईबोले यांनी तपासाची सूत्रे हाती घेऊन कारवाई सुरू केली आहे.

Previous articleगडचांदूर मधील वनपरिक्षेत्र उपविभागीय कार्यालयात एमएसईबीची धाड,
Next articleदिल्लीच्या धर्तीवर महाराष्ट्रात घरगुती १०० यूनिट वीज माफीची होणार घोषणा ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here