Home कोरपणा गडचांदूर मधील वनपरिक्षेत्र उपविभागीय कार्यालयात एमएसईबीची धाड,

गडचांदूर मधील वनपरिक्षेत्र उपविभागीय कार्यालयात एमएसईबीची धाड,

एलेक्ट्रिक चोरी प्रकरण :-

इलेक्ट्रिक चोरी प्रकरणात वनपरिक्षेत्र कार्यालयावर ७० हजारांचा दंड,

गडचांदूर प्रतिनिधी :-

गडचांदूर येथील वनपरिक्षेत्र कार्यालय म्हणजे जणू नेहमीच शुकशुकाट असलेले कार्यालय आहे. कारण इथे कर्मचाऱ्यांची संख्या अतिशय तोगडी असल्याने व वनपरिक्षेत्र अधिकारी हे बहुदा मिटींग आणि दौरे यामुळे ते नेहमीच फिल्डवर्क मधे व्यस्त असल्यामुळे या वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर चार जनांनी अतिक्रमण केले आहे. प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर या वनविभागाच्या कार्यालयातील एलेक्ट्रिक मीटर मधून लाईन घेतल्याचे  एमएसईबी अधिकाऱ्यांनी धाड टाकून केलेल्या कारवाईतून निष्पन्न झाले आहे.
शासनाच्या कार्यालयाच्या इलेक्ट्रिक मीटरमधून विजेचे

कनेक्शन खाजगी दुकानदारा देवून वनविभागाच्या इलेक्ट्रिकचा वापर गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याचे दिसत आहे. एमएसईबीने वनविभागाच्या या  कार्यालयावर धाड टाकून तब्बल ७० रुपयाची दंड आकारणी करण्यात आली आहे, या दुकानदारांमधे सय्यद परवेज, शेख शाहरुख, श्रीराम सठोणे, बालाजी टराले सय्यद हबीब ह्या  चार लोकांनो अतिक्रमण करून महाराष्ट्र शासनाच्या मीटर वरून लाईट घेतल्याने 70000 वनपरिक्षेत्रात अधिकारी ब्रम्हटेके यांना एमएसईबी ने दंड लावल्याने आता हा दंड वनविभाग भरेल की पुन्हा दुकानदार हे पाहणे औस्तूक्याचे ठरणार आहे.

Previous articleअखेर प्रकल्पग्रस्तांना मिळाला न्याय, 16 मार्च पासून करारनामे सुरु, 
Next articleब्रेकिंग न्यूज :- होळीच्या उत्सवाला येणारी ४२ लाखांची  दारू पडोली पोलिसानी पकडली,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here