Home महाराष्ट्र दिल्लीच्या धर्तीवर महाराष्ट्रात घरगुती १०० यूनिट वीज माफीची होणार घोषणा ?

दिल्लीच्या धर्तीवर महाराष्ट्रात घरगुती १०० यूनिट वीज माफीची होणार घोषणा ?

महाराष्ट्राचे नवीन वीज धोरण ठरणार!

मुंबई वार्ता :-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. दिल्लीच्या धर्तीवर राज्यातील सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी तयारी सुरू असल्याची माहिती असून घरगुती वापरासाठीची किमान १०० यूनिट वीज माफ करण्याचा निर्णय लवकरच मंत्रिमंडळ घेणार असल्याची माहिती आहे.  महाराष्ट्र शासन राज्यात नवे वीज धोरण आणण्याच्या तयारीत असून राज्यात सर्वसामान्य वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी १०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. याबाबतचे धोरण लवकरच आणण्यात येईल, अशी घोषणा ऊर्जा मंत्री नितीन राऊत विधानपरिषदेत केली.
घरगुती वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज देण्यासाठी एक समिती अभ्यास करत आहे. या समितीचा अहवाल तीन महिन्यांत प्राप्त झाल्यानंतर याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे नितीन राऊत यांनी मंगळवारी विधानपरिषदेत स्पष्ट केले. राज्यातला वीजदर कमी व्हावा, यासंदर्भात अभ्यास करून हे नवे वीज धोरण राज्यात आणले जाईल. तसेच त्यात १०० युनिटपर्यंत मोफत देणे आणि शेतकऱ्यांना दिवसा शेतीसाठी चार तास वीज देण्याचं प्रस्तावित असल्याचं ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विधान परिषदेत एका लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले.

Previous articleब्रेकिंग न्यूज :- होळीच्या उत्सवाला येणारी ४२ लाखांची  दारू पडोली पोलिसानी पकडली,
Next articleधक्कादायक :-धारीवाल कंपनीमधील जनक राणे नावाच्या कामगाराचे प्रेतच केले गायब? आकस्मिक अपघाताची नोंद,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here