Home चंद्रपूर क्राईम :- सुगंधीत तंबाखू किंग जयसुख च्या अड्ड्यावर एलसीबीची धाड ?

क्राईम :- सुगंधीत तंबाखू किंग जयसुख च्या अड्ड्यावर एलसीबीची धाड ?

दिवाळीच्या आधीच एलसीबी सह अन्न औषध प्रशासन यांनी धाडी टाकून केला पाडवा ?

क्राईम रिपोर्ट :-

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर स्थानिक गुन्हे शाखा Local Crime Branch द्वारे जिल्ह्यातील कुविख्यात सुगंधीत तंबाखू तस्कर जयसुख यांच्या अड्ड्यावर धाड टाकून मोठी रक्कम घेतल्याची व एकूणच दिवाळीचा जल्लोष केल्याची सनसनिखेज खबर चर्चेत आहे. ही घटना १९ ऑक्टोंबर ला रात्रीच्या सुमारास झाल्याची विशेष सूत्राची माहिती असून १० ऑक्टोंबर ला अन्न औषधी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा जयसुख ने हप्ता पाठवला नाही म्हणून धाड टाकली पण त्यांच्या हातात काही लागले नाही मात्र हप्ता वसुली झाल्याची स्वतः जयसुख यांनी काही पत्रकारांना सांगितल्याचे पुरावे आहेत. याचा अर्थ जिल्ह्यातील सुगंधीत तंबाखू विकणाऱ्या व्यापाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखा व अन्न औषधी प्रशासन मेहरबान आहे आणि त्यांनी दिवाळीचा पाडवा धाड टाकून साजरा केला असल्याची पण माहिती आहे आणि म्हणूनच संपूर्ण जिल्ह्यात जयसुख द्वारे खुलेआम सुगंधीत तंबाखू विकला जाऊन खर्हा विक्री जोरात आहे.

जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी अन्न औषधी प्रशासन मंत्रालयाचे मंत्री संजय राठोड यांचा दौरा झाला होता व त्या दौऱ्यात त्यांनी जिल्ह्यातील सुगंधीत तंबाखू विकणाऱ्या व्यापाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल असं म्हटलं होतं पण खरं पाहता मकोका हया कायद्यांतर्गत कारवाई म्हणजे संघटित गुन्हेगारीवर आळा बसविण्याची कारवाई समजल्या जाते मग संघटित गुन्हेगारी कोण वाढवत आहे ? याचा शोध घेतला तर सुगंधीत तंबाखू व्यापाऱ्यांकडून हप्ता घेणारे पोलीस आणि अन्न औषधी विभागाचे अधिकारी हेच खरे आरोपी दिसत आहे , त्यामुळे सुगंधीत तंबाखू व्यापाऱ्यांवर मकोका लावण्याअगोदर प्रथम पोलीस आणि अन्न औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करणे आवश्यक आहे. शिवाय त्यांच्यावर कारवाई करताना आधी पोलीस प्रशासन व अन्न औषधी प्रशासन यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.

जिल्हा पोलीस रवींद्रसिंह परदेशी दखल घेणार कां ?

जिल्ह्यातील सुगंधीत तंबाखू विक्रीतून पोलीस प्रशासन, अन्न औषधी प्रशासन राजकीय पुढारी व काही पत्रकारांचा फायदा होतं असल्याच्या चर्चा आहेत याचा अर्थ सुगंधीत तंबाखू विक्रीचा जो गुन्हा व्यापारी करताहेत तो गुन्हा संघटित गुन्हेगारीत मोडतो त्यामुळे या धंद्यात जे जे गुंतले आहेत त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई होणे आवश्यक आहे, ती कारवाई नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी करणार कां ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here