Home महाराष्ट्र राजकीय :- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार या महिन्यात ?

राजकीय :- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार या महिन्यात ?

अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या या निवडणुका कोणत्या कारणाने लांबणीवर ?

न्यूज नेटवर्क :-

दोन वर्षांपासून रेंगाळलेल्या आणि विधानसभा निवडणुकांची रंगीत तालिम म्हणून समजल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांची रणधुमाळी कोणत्या महिन्यात होणार याकडे सर्व राजकीय पक्षांच्या नेते व कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे पण ठाकरे सरकार ने घेतलेल्या निर्णयाला फिरवून शिंदे सरकारने घेतलेले निर्णय व त्या निर्णयाविरोधात महाविकास आघाडी च्या नेत्यांनी केलेल्या अपील यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडत आहे. दरम्यान सुप्रीम कोर्टाने या संदर्भात कुठलाही निर्णय न घेता प्रथम उच्च न्यायालयात या संदर्भात सुनावणी झाल्यानंतरचं कुठलाही निर्णय होईल असं म्हटलं आहे.

दिवाळीनंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हया ‘मिनी’ विधानसभेचा धुरळा म्हणून उडण्याची शक्यता होती व महापालिका नगरपालिकांतील प्रभाग रचनेसह ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटेल, अशी अपेक्षां होती परंतु सर्वोच्य न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा चेंडू हा उच्च न्यायालयात फेकला असल्याने आता या निवडणुका फरवरी मार्च किंव्हा एप्रिल मधे होण्याची शक्यता वर्तवली जातं आहे.

राज्यात २५ जिल्हा परिषदा, २८४ पंचायत समितीसह २२० नगरपालिका आणि २३ महापालिकांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची रणनीती ठाकरे सरकारने आखली होती परंतु राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर व ठाकरे सरकारच्या महाविकास आघाडी सरकारचे संपूर्ण निर्णय शिंदे सरकारने फिरवले असल्याने व त्यांच्या निर्णयानंतर पुन्हा परत महाविकास आघाडी च्या नेत्यांनी याविरोधात सर्वोच्य न्यायालयात दाद मागितली होती पण आता परत मुंबई उच्च न्यायालयात ही सुनावणी होणार असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहे.

Previous articleक्राईम :- सुगंधीत तंबाखू किंग जयसुख च्या अड्ड्यावर एलसीबीची धाड ?
Next articleमोवाडा गावांत भीषण पाणी टंचाई, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरिष्ठांना निवेदन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here