पोलिसांना चकमा देत भद्रावती वरोरा क्षेत्रात सुगंधित तंबाखू विक्रीचे विणले जाळे?
भद्रावती प्रतिनिधी ;-
जिल्ह्यात राजकीय पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने सगळीकडे अवैध धंदे फोफावले असून कोळसा चोरी, अवैध रेती उत्खनन व वाहतूक, सट्टापट्टी व आता सुगंधित तंबाखू विक्रीचा धंदा राजकीय वरहदस्त असलेल्या लोकांनी चालवला आहे. दरम्यान भद्रावती मधील एका स्विकृत सदस्य (नगरसेवक) यांनी सुगंधित तंबाखू चा अवैध व्यवसाय पोलीस प्रशासनाच्या आडून मोठ्या प्रमाणांत भद्रावती व वरोरा तालुक्यात चालवला असल्याची खळबळजनक चर्चा सर्वत्र सुरू आहे.
भद्रावती शहरात व तालुक्यात सुगंधित तंबाखू विकणारे पटेल, रंगारी व गायकवाड हे पोलिसांच्या अन्न औषधी विभागाच्या परवानगीने हप्ते ठरवून काम करतात अशी माहिती आहे मात्र स्विकृत नगरसेवक कुणालाही हप्ता न देता आपली अवैध सुगंधित तंबाखू विक्री जोरात करत असल्याची चर्चा आहे. दरम्यान आता नवीन ठाणेदार इंगळे याकडे कोणत्या नजरेने बघतात हे महत्वाचे असून राजकीय वरहदस्त असलेल्या या अवैध सुगंधित तंबाखू विक्रेता माजी नगरसेवक यांच्यावर काय कारवाई होईल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.