Home वरोरा ब्रेकिंग :- जुगार खेळताना सरपंचासह अकरा जुगारीना शेगांव पोलिसांनी केली अटक.

ब्रेकिंग :- जुगार खेळताना सरपंचासह अकरा जुगारीना शेगांव पोलिसांनी केली अटक.

सरपंचांनी गावातच भरवला होता जुगार, गावांतील वातावरण झाले गरम.

वरोरा प्रतिनिधी :

सरपंच हा गावांचा कारभारी असतो व त्यांच्या सल्ल्यानेच गावांतील सामाजिक व्यवस्था चालत असते पण तो गावांचा कारभारीच जुगार भरवत असेल व स्वतः खेळत असेल तर त्या कारभाऱ्याचा कारभार किती चुकीचा व भ्रष्ट असेल ? याचा विचार न केलेलाच बरा. अशीच एक घटना वरोरा तालुक्यातील सालोंरी या गावांत घडली असून या गावांचा करभरि सरपंचच जुगार खेळताना पोलिसांच्या जाळ्यात सापडला असून त्यांच्यासह तब्बल अकरा जुगारांना शेगांव पोलिसांनी अटक केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

सालोरी गावाचे सरपंच जीवनदान बावणे हे गावाच्या एका व्यक्तीच्या घरी जुगार भरवून खेळत असल्याची माहिती शेगांव पोलिसांना माहिती होताच त्यांनी त्या घरांवर आज दिनांक 25 ला दूपारी 12.30 च्या दरम्यान धाड टाकून मुद्देमालासह चौदा आरोपींना अटक केली. दरम्यान सरपंच बावणे यांना अटक झाल्यामुळे गावांत वातावरण गरम झालं असल्याचं बोलल्या जातं आहे.

या कारवाईमधे सरपंच जीवनदान बावणे यांच्यासह विलास शेलोटकर बाळू चौधरी, दिनेश जिवतोड, संदीप मुरकुटे,अविनाश नन्नावरे, विशाल ढोणे, शरद शेलकर व अन्य यांच्यावर जुगार प्रतिबंधककायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया बातमी लिहिस्तोवर सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here