Home वरोरा दखलपात्र:- श्री सिद्धिविनायक सहकारी पतसंस्थेच्या संचालकांवर गुन्हे दाखल होणार?

दखलपात्र:- श्री सिद्धिविनायक सहकारी पतसंस्थेच्या संचालकांवर गुन्हे दाखल होणार?

संस्थेच्या ठेवीदारांच्या आमरण उपोषण आंदोलनाला यश, संस्थेच्या संचालकांच्या स्थावर मालमत्ता जप्त होणार?

वरोरा :-

वरोरा शहरातील नेहरू चौक मधील श्री सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्थेतील १७०० पेक्षा जास्त ठेवीदार व ग्राहक यांचे जवळपास १ करोड ५० लक्ष रुपयापेक्षा जास्त रक्कमेच्या ठेवी पतसंस्थेचे अध्यक्ष, सचिव व इतर संचालक यांनी अफरातफर करून पतसंस्था दिवाळखोरीत काढल्यामुळे जनआक्रोश संघटनेचे अध्यक्ष अँड अमोल बावणे व राजू कुकडे यांच्या नेत्रुत्वात दिनांक 21 मार्चपासून ठेवीदारांनी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. दरम्यान या आंदोलनाची दखल घेत तहसीलदार काळे यांनी साहाय्यक निबंधक व पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत उपोषण कर्त्यांच्या बैठक बोलावून ठेवीदारांना न्याय मिळवण्यासंदर्भात साहाय्यक निबंधक यांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे आता संचालकांवर एमपीआयडी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल होऊन त्यांची स्थावर मालमत्ता जप्त होणार असल्याचे बोलल्या जातं आहे.

श्री सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्थेच्या एजंट व ग्राहक यांनी पतसंस्थेचे संचालक मंडळ व कर्मचारी यांचे विरोधात सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तालुका वरोरा या कार्यालयाला दिनांक १५/०७/२०२१ रोजी तक्रार दाखल केल्या व त्यानंतर व संबधीत कार्यालयात विविध ग्राहका कडून व संघटने मार्फत तक्रार दाखल केल्या परंतु सदर सहाय्यक निबंधक येथील सबंधित अधिकारी कर्मचारी हे पतसंस्थेचा भ्रष्टाचार लपविण्याकरीता संचालकांची पाठराखन करीत होते. या प्रकरणात वारंवार तक्रार दिल्या नंतरही कार्यालय कडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नसल्याने ठेवीदार आक्रमक होऊन त्यांनी दि १९ / ११ / २०२१ रोजी साहाय्यक निबंधक कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. तेव्हा पासुन सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून पतसंस्थेवर प्रशासक नियुक्ती करण्यात आली. प्रशासक नेमणूक केल्यानंतर सुध्दा आजपावेतो प्रशासना कडून कोणतेही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नव्हती दरम्यान ठेवीदारांना प्रशासक नियुक्तीच्या वेळी १ महिण्याच्या आत ठेवीची रक्कम मिळवून देणार अन्यथा संबंधीत संचालक मंडळावर ठोस कार्यवाही करणार अशी हमी दिली होती, परंतू ग्राहकांनी तक्रार दिलेल्या दिनांका पासुन २ वर्षाचा कालावधी लोटूनही आजपावेतो या प्रकरणात ग्राहक व ठेवीदार यांची रक्कम देण्यात आली नाही. संबधीत संचालक मंडळ यांचेवर कोणतेही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही.

या संस्थेचे सन २०२० ते २०२१ या कालावधीचे लेखापरिक्षण ऐ. के. माटे, लेखापरिक्षक श्रेणी – २. सहकारी संस्था वरोरा यांनी केले. आता ते ऑडीट खोटे व बनावटीचे दिसुन आले. माटे यांनी संस्थेचा आर्थिक घोटाळा लपविण्याकरीता व संचालक मंडळ यांना वाचविण्याकरीता संचालक मंडळाकडून पैसे घेऊन लेखापरीक्षण तयार केला असल्याचे असे दिसुन आले. त्यानंतर सहकार खाते (लेखा परिक्षक विभाग) जिल्हा विशेष लेखापरिक्षक वर्ग १ सहकारी संस्था चंद्रपूरचे (सांजन किसन साखरे) लेखा परिक्षक श्रेणी १ सहकारी संस्था चंद्रपूर यांचे कडून सन २०१६-१७ ते २०२०-२१ या वर्षांचे फेर लेखापरिक्षण अहवाला वरील प्रशासकीय अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालात महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनिय १९६० व त्या खालील नियम १९६२ चे कलम ६० अन्वये गुतवणूक करण्यात संचालक मंडळाने कसूर केला आहे. असे नमूद आहे त्यामुळे संस्थेचे संचालक दोषी आढळले असल्याने त्यांच्यावर ठेवीदारांचे संरक्षण अधिनियम 1999 अंतर्गत कारवाई होने अपेक्षित होते परंतु निबंधक कार्यालयाकडून या प्रकरणात टाळाटाळ चालवली जातं होती त्यामुळे ठेवीदारांनी आमरण उपोषण उभारले होते व आता त्या आंदोलनाची दखल घेऊन लवकरच संचालकांवर गुन्हे दाखल होऊन त्यांची स्थावर मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करू असे आश्वासन तहसीलदार काळे सह साहाय्यक निबंधक यांनी उपोषणकर्ते व त्यांच्या शिष्टमंडळाला दिले आहे. या आमरण उपोषणाला अँड अमोल बावणे, पुरुषोत्तम पावडे व गुणवंत खिरटकर, रवी मयस्कर, विजय सहत्राबुद्दे, कोलारकर , गुणवंत बावणे,ओमदेव दाते , सूरज तडस, सुधा उपरे व इतर महिला बसल्या होत्या या उपोषण आंदोलनासाठी अँड अमोल बावणे यांना मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी पाठिंबा दिला होत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here