Home वरोरा स्तुत्य कार्य :- विरांगणा राणी झलकारीबाई संस्थेचा अनोखा उपक्रम

स्तुत्य कार्य :- विरांगणा राणी झलकारीबाई संस्थेचा अनोखा उपक्रम

गोसावी समाजाच्या पालावर  जाऊन महिलांना दिली मराठी नववर्षानिमित्य साडीचोळीची भेट, लहान मुलामुलींना पण दिले कपडे.

वरोरा प्रतिनिधी :-

विरांगणा राणी झलकारीबाई संस्थेचा मराठी नवीन वर्ष व गुडीपाडवा सणानिमित्त अनोखा उपक्रम बघावयास मिळाला असून सामाजिक दायित्व साधून या संस्थेच्या सभासदांनी पोटासाठी भटकंती करणारे व वणवण भटकणारे गोसावी समाजाच्या पालांवर जाऊन तेथील महिलांना साडीचोळीची भेट देऊन गुडीपाडवा साजरा केला.

दि.22 /3/ 2023 रोज मंगळवारला गुढीपाडवा या सणाचे औचित्य साधून भटकंती करणारे पोटासाठी वणवण भटकणारे गोसावी समाज या लोकांच्या पालांवर जाऊन तेथील महिलांना साड्या व मुलांना व मुलींना कपडे वाटप करण्यात आले. गुढीपाडवा हा मराठी लोकांचा सण या सणाला घरोघरी गोड पदार्थ बनवतात गुढी उभारतात त्या गुढीची परंपरेनुसार पूजा करतात पण मात्र हा भटकंती करणारा समाज सण असो की वार असो हा आपल्या पोटाची भूक मिटवण्यासाठी गावोगावी आपले भटकंती करत असतात हा सगळा विचार करता विरांगणा राणी झलकारी बाई बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून व संस्थेच्या अध्यक्षा.सौ रंजनाताई मनोहर पारशिवे यांच्या पुढाकाराने हा खूप छान उपक्रम राबवण्यात आला. रंजनाताई यांनी आपल्या घरी हा सण साजरा न करता या भटकंती करणाऱ्या लोकांच्या पालावर झोपड्यांवर जाऊन सौ.रंजनाताईं पारशिवे यांनी नवीन वर्षाची सुरुवात यांच्या सोबतीने केली. यावेळी सौ.गीता ताई हरीश नवले, सौ.मजुंषाताई गणेश पारशिवे ,सौ.जोशनाताई सुरेश दाते ,सौ.शुभांगी जगदीश मोडक , कुमारी धरती झोटिंग सो.पल्लवी पेचे कुमारी वैष्णवी झोडे ,कुमारी राणी झोडे कुमारी कीर्ती नवले,सौ. उषाताई झोटिंग ,या सर्व महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

Previous articleदखलपात्र:- श्री सिद्धिविनायक सहकारी पतसंस्थेच्या संचालकांवर गुन्हे दाखल होणार?
Next articleचिंताजनक :- सीएसटीपीएस मधील बगीच्यावर कोट्यावधीचा खर्च कशासाठी ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here