Home चंद्रपूर चिंताजनक :- सीएसटीपीएस मधील बगीच्यावर कोट्यावधीचा खर्च कशासाठी ?

चिंताजनक :- सीएसटीपीएस मधील बगीच्यावर कोट्यावधीचा खर्च कशासाठी ?

सिजिएम ते एमडी पर्यंत कमिशनखोरीच्या धंद्यामुळे वीज उत्पादन खर्चात मोठी वाढ. यामुळे वीज दर महागले.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र म्हणजे भ्रष्टाचाराने माखलेले कुरण म्हटले तरी वावगे ठरू नये अशी विदारक परिस्थिती आहे, इथे भ्रष्टाचार म्हणजे जणू शिष्टाचार असल्याचे दिसत असून कोळसा घोटाळ्यासह इतर साहित्य घोटाळ्याची गोळाबेरीज केली आणि मैनेज झालेल्या विविध टेंडर च्या आकड्यांची कमिशन रक्कम बघितली तर यांच्या हया घोटाळ्यामुळे वीज उत्पादन खर्चात कमालीची वाढ होऊन त्याचा फटका वीज बिलाच्या रूपाने सर्वसामान्य जनतेवर कसा बसतो यांचे चित्र बगिच्याच्या सौंदर्यीकरण टेंडरच्या माध्यमातून समोर येत आहे.

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात सद्ध्या हे टेंडर निघाली आहे त्यात बगिच्या सौंदर्यीकरण करण्याचे टेंडर असून तब्बल १ कोटी ९७ लाख ३४ हजार ४६५ रुपये त्यात खर्च होणार आहे, हे टेंडर अगोदरच मैनेज करण्यात आले असून गोयल नावांच्या मोठ्या ठेकेदाराला ते टेंडर मिळाले आहे. दरम्यान हे टेंडर चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे सिजिएम ते प्रकाशगड येथील सिएमडी यांच्यापर्यंत मंजुरीसाठी प्रस्तावित आहे आणि हे टेंडर गोयल यांना देण्यात आल्याची माहिती आहे. पण इतर कामे महत्वाची असताना बगिच्याच्या सौंदर्यीकरण यावर कोट्यावधी रुपये खर्च कशासाठी केल्या जातेय आणि यामागे नेमकी कुणाची भूमिका आहे ?याची चौकशी होने गरजेचे आहे.

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र देशातील सर्वाधिक वीजनिर्मिती करणारे केंद्र आहे. या केंद्रातील सात संचातून २ हजार ९०० मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते. सध्या सातही संच कार्यान्वित आहे. दरम्यान या वीज निर्मिती केंद्रात वीज उत्पादन खर्चात मोठी वाढ झाल्याची माहिती समोर येत असताना तो उत्पादन खर्च का वाढत आहे? यांचे आकलन केले असता सिजिएम ते एमडी पर्यंत होतं असलेल्या कार्यालयीन भ्रष्टाचार पूर्णपणे जबाबदार असल्याचे समोर येत आहे कारण इथे संघटित गुन्हेगारी प्रमाणे संघटित ठेकेदारीच्या माध्यमातून संघटितपणे भ्रष्टाचार केल्या जातो असे विशेष सूत्रांकडून कळते. एखादे टेंडर सिजिएम च्या माध्यमातून एकाला देण्याचे ठरले तर त्यात कुणी दुसरा ठेकेदार हस्तक्षेप करत नाही, अर्थात सगळे ठेकेदार हे संघटितपणे एकदुसऱ्यांना सहकार्य करतात व सिजिएम ते एमडी पर्यंत कमिशन वाटप करून संघटितपणे भ्रष्टाचार करतात त्यामुळं कोट्यावधी रुपयांचा अपहार व भ्रष्टाचार होतं असल्याने वीज उत्पादन खर्चात मोठी वाढ होतं आहे पर्यायाने वीज नियामक मंडळाच्या माध्यमातून वीज युनिटच्या किंमतीत मोठी वाढ होतं असल्याने वीज ग्राहकांना त्याचा मोठा फटका बसत आहे.

Previous articleस्तुत्य कार्य :- विरांगणा राणी झलकारीबाई संस्थेचा अनोखा उपक्रम
Next articleदुर्दैवी :- बेरोजगारीला कंटाळून उच्चशिक्षित दिनेश चौखे या युवकांची आत्महत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here