Home वरोरा दुर्दैवी :- बेरोजगारीला कंटाळून उच्चशिक्षित दिनेश चौखे या युवकांची आत्महत्या.

दुर्दैवी :- बेरोजगारीला कंटाळून उच्चशिक्षित दिनेश चौखे या युवकांची आत्महत्या.

सालोरी गावात पसरली शोककळा, वाढती महागाई व बेरोजगारीमुळे तरुणांची मानसिकता ढासळली.

वरोरा प्रतिनिधी:-

तालुक्यातील मोठ्या गावांपैकी एक असलेले सालोरी हे गाव मोलमजुरी करून जगणारे गांव आहे, कारण इथे फार कमी लोकांकडे शेती असून जास्तीत जास्त लोकं ही शेतात नौकरी किंव्हा तालुक्यातील इतर कंपन्यात व वरोरा शहरात दुकानावर काम करतात अशातच दिनेश मारोती चौखे वय 37 वर्ष हा उच्च शिक्षीत तरुण नौकरीच्या शोधत असताना त्याला नौकरी मिळाली नसल्याने तो आर्थिक विवंचनेत होता व भविष्याची चिंता तो करायचा, तसा तो सामाजिक कार्यकर्ता होता व गावांत सामाजिक कार्यांत तो नेहमीच अग्रेसर असायचा पण बेरोजगारी ही त्याच्या मानगुटीवर बसून असल्याने व समोर काही मार्ग दिसत नसल्यामुळे त्यांनी आज स्वतःला संपवून टाकण्याचा निर्णय घेतला आणि गावांतील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आकस्मिक आत्महत्त्यामुळे सालोरी गावात शोककळा पसरली असून एक उमद्या तरुणाने अशी आत्महत्या करावी हे मोठं दुर्भाग्य आहे अशी चर्चा होतं आहे.

वरोरा तालुक्यात रोजगाराची अनेक साधनं आहेत पण जी मुलं उच्चशिक्षित आहेत त्यांना त्यांच्या लायकीचे रोजगार मिळत नसल्याने कित्तेक तरुण हे स्वतःच्या आईवडील यांच्या मिळकतीवर जीवन जगत आहे दरम्यान शासनाचे धोरण यासाठी कारणीभूत असून स्वयंरोजगाराच्या संधी असल्या तरी राष्ट्रीयकृत बैंका कर्ज देत नसल्याने तरुणांपुढे बेरोजगारी हा भयंकर प्रश्न आंवासून उभा आहे. त्यातच वाढती महागाई व बेरोजगारीमुळे तरुणांची मानसिकता ढासळली असल्याने तरुणांची फरकट होतं आहे.

Previous articleचिंताजनक :- सीएसटीपीएस मधील बगीच्यावर कोट्यावधीचा खर्च कशासाठी ?
Next articleसीटीपीएस मधील मुख्य अभियंत्यांच्या निविदा घोटाळ्याची एसीबी चौकशी हवी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here